(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

उपभोक्त्याचे सार्वभौमत्व (Consumer Sovereignty)

उपभोक्त्याचे सार्वभौमत्व

ग्राहकांच्या इच्छेनुसार वस्तू व सेवा यांचे उत्पादन अथवा पुरवठा निर्धारित करणे, म्हणजे उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व होय. यामध्ये उत्पादकाला ग्राहकांच्या मागणी व ...
उर्जित पटेल समिती (Urjit Patel Committee)

उर्जित पटेल समिती

चलनविषयक धोरणाची रचनात्मक सुधारणा आणि बळकटी यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरविणारी एक संशोधन समिती. या समितीची स्थापना १२ सप्टेंबर २०१३ रोजी ...
ऊर्जेचे अर्थशास्त्र (Economics of Energy)

ऊर्जेचे अर्थशास्त्र

रूढ अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा. ऊर्जेचे अर्थशास्त्राचा उदय आधुनिक काळातला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार एक वेगळी शाखा म्हणून या शाखेचा उदय ...
एडमंड फेल्प्स (Edmund Phelps)

एडमंड फेल्प्स

फेल्प्स, एडमंड : (२६ जुलै १९३३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्यांना देशाच्या अल्प व दीर्घ मुदतीच्या आर्थिक धोरणातील ...
एडवर्ड एच. चेंबरलिन (Edward H. Chamberlin)

एडवर्ड एच. चेंबरलिन

चेंबरलिन, एडवर्ड एच. :  (१९ मे १८९९ – १६ जुलै १९६७). विसाव्या शतकातील एक सुप्रसिध्द अमेरिकन नवअभिजातवादी अर्थशास्त्रज्ञ. ते औद्योगिक ...
एडवर्ड सी. प्रिसकॉट (Edward C. Prescott)

एडवर्ड सी. प्रिसकॉट

एडवर्ड सी. प्रिसकॉट : (२६ डिसेंबर १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. सूक्ष्म अर्थशास्त्र, आर्थिक धोरणातील सातत्य आणि ...
एम. आर. टी. पी. (Monopolistic and Restrictive Trade Practice)

एम. आर. टी. पी.

मक्तेदारी व निर्बंधात्मक व्यापार व्यवहार. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या आर्थिक विकासासाठी शेती आणि औद्योगिक विकास यांबाबत केंद्र व राज्यसरकार यांनी विविध ...
एरिक स्टार्क मॅस्किन (Eric Stark Maskin)

एरिक स्टार्क मॅस्किन

एरिक स्टार्क मॅस्किन : (१२ डिसेंबर १९५०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. मॅस्किन यांना अर्थशास्त्रातील ‘यांत्रिक अभिकल्प सिद्धांत’ ...
एशियन ड्रामा (Asian Drama)

एशियन ड्रामा

आशियायी अर्थव्यवस्थांच्या सखोल अभ्यासावर आधारित एक प्रसिद्ध अर्थशास्त्रीय ग्रंथ. या ग्रंथाचे लेखन १९६८ मध्ये ख्यातनाम स्वीडिश अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञ कार्ल ...
एस्थर डुफ्लो (Esther Duflo)

एस्थर डुफ्लो

डुफ्लो, एस्थर (Duflo, Esther) : (२५ ऑक्टोंबर १९७२). प्रसिद्ध फ्रेंच-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृतीपुरस्काराचे सहमानकरी. जगातील दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या प्रायोगिक ...
ऐतिहासिक सांप्रदाय (Historical School)

ऐतिहासिक सांप्रदाय

एका विचाराने प्रभावित झालेला गट म्हणजे संप्रदाय होय. एखादा काळ, धर्म, भक्ती, कला किंवा विषय अशा अनेक स्वरूपाची विचारसरणी प्रथमत: ...
ऑयलर प्रमेय (Euler's Theorem)

ऑयलर प्रमेय

बदलता उत्पादन घटक असणाऱ्या कोणत्याही आदानाला अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो यांचा खंड सिद्धांत लागू पडतो, असा नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी युक्तिवाद केला आहे ...
ऑलिव्हर इ. विल्यम्सन (Oliver E. Williamson)

ऑलिव्हर इ. विल्यम्सन

ऑलिव्हर इ. विल्यम्सन : (२७ सप्टेंबर १९३२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. विल्यम्सन यांना अमेरिकन राजकीय अर्थतज्ज्ञ इलिनॉर ...
ऑलिव्हर हार्ट (Oliver Hart)

ऑलिव्हर हार्ट

हार्ट, ऑलिव्हर (Hart, Oliver) : (९ ऑक्टोबर १९४८). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. हार्ट यांना करारांच्या माध्यमातून ...
ओपेक (Organization of the Petroleum Exporting Countries - OPEC)

ओपेक

पेट्रोलियम उत्पादन व निर्यात करणाऱ्या देशांची स्थायी संघटना. या संघटनेची स्थापना इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या संस्थापक ...
औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळ (Board of Industrial and Financial Reconstruction – BIFR)

औद्योगिक आणि वित्तीय पुनर्रचना मंडळ

भारतातील आजारी औद्योगिक आस्थापनांचे आजारपण निश्चित करणे आणि संभाव्य आस्थापनांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी निर्माण केलेले मंडळ. १९८०च्या दशकातील भारतातील औद्योगिक ...
कम्युनिस्ट मॅनिफेस्टो (Communist Manifesto)

कम्युनिस्ट मॅनिफेस्टो

राजकीय परिपत्रक म्हणून ओळखला जाणारा एक अर्थशास्त्रीय ग्रंथ. यास ‘साम्यवादाचा जाहीरनामा’ असे म्हणतात. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ व अर्थतज्ज्ञ कार्ल मार्क्स ...
काचेचे छत (Glass Ceiling)

काचेचे छत

पात्रता असूनही स्त्रिया आणि अल्पसंख्यांक यांच्या प्रगतीत येणारे अदृश्य अडथळे काचेचे छत या संज्ञेने नमूद केले जातात. वास्तूशास्त्रात ग्लास सिलिंगचा ...
कार्बन पतगुणांक (Carbon Credit)

कार्बन पतगुणांक

एखाद्या उद्योजकाला उत्पादन घेताना ठराविक प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साईड व इतर हरितगृह वायू उत्सर्जित करण्यास देण्यात येणारी परवानगी. कार्बन पतगुणांक या ...
काळा पैसा (Black Money)

काळा पैसा

अवैधरित्या गोळा केलेला असा पैसा की, ज्याची शासनदरबारी कोणतीही नोंद नसते. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने २०१२ मध्ये काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काळ्या ...