(प्रस्तावना) पालकसंस्था : म.रा.म.वि.नि.मंडळ, मुंबई | समन्वयक : वसंत चौधरी | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
आखात (Gulf)

आखात (Gulf)

समुद्राचा किंवा महासागराचा जमिनीकडे आत घुसलेला जलभाग सामान्यपणे आखात या संज्ञेने ओळखला जातो. काही ठिकाणी मात्र अशा जलभागास उपसागर, समुद्र, ...
आँटॅरिओ सरोवर (Ontario Lake)

आँटॅरिओ सरोवर (Ontario Lake)

उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. सुमारे ३१० किमी. लांबीच्या आणि ८५ किमी. रुंदीच्या या अंडाकृती ...
आदीजे नदी (Adige River)

आदीजे नदी (Adige River)

इटलीतील पो (Po) नदीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. लांबी ४१० किमी., जलवहन क्षेत्र १२,२०० चौ. किमी. आल्प्स (Alps) पर्वतात ...
आद्दा नदी (Adda River)

आद्दा नदी (Adda River)

इटलीच्या उत्तर भागातून वाहणारी पो नदीची उपनदी. लांबी ३१३ किमी. नदीखोर्‍याचा विस्तार ७,९७९ चौ. किमी. स्वित्झर्लंडच्या सरहद्दीजवळ रीशन आल्प्स पर्वतात ...
आधारतल (Base Level)

आधारतल (Base Level)

जलप्रवाह आपल्या पात्राचा तळ ज्या निम्‍नतम पातळीपर्यंत झिजवू शकतो, ती पातळी म्हणजे आधारतल. जलप्रवाह समुद्राला मिळत असेल, तर ही पातळी ...
आपीआ शहर (Apia City)

आपीआ शहर (Apia City)

दक्षिण पॅसिफिक महासागरातील सामोआ या द्वीपीय देशाची राजधानी. लोकसंख्या ३७,३९१ (२०२२ अंदाजे). सामोआतील ऊपोलू बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वैसिगॅनो नदीच्या मुखाशी ...
आबूजा शहर (Abuja City)

आबूजा शहर (Abuja City)

आफ्रिकेतील नायजेरिया देशाची राजधानी आणि देशातील एक योजनाबद्ध नगररचना केलेले शहर. लोकसंख्या ९२,४०,००० (२०१६ अंदाज). देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फेडरल ...
आयझॅक इझ्राएल हेझ (Isaac Israel Hayes)

आयझॅक इझ्राएल हेझ (Isaac Israel Hayes)

हेझ, आयझॅक इझ्राएल (Hayes, Isaac Israel) : (५ मार्च १८३२ – १७ डिसेंबर १८८१). अमेरिकन समन्वेषक व शरीरक्रियावैद्य. ते ऑक्सफर्डशर ...
आराकान पर्वत (Arakan Mountains)

आराकान पर्वत (Arakan Mountains)

म्यानमारच्या (ब्रह्मदेशाच्या) पश्चिम भागातील एक पर्वतरांग. तिला आराकान योमा किंवा राकीन योमा किंवा राकीन पर्वत या नावांनीही संबोधले जाते. पश्चिमेकडील ...
आरोह पर्जन्य (Convectional Rainfall)

आरोह पर्जन्य (Convectional Rainfall)

वातावरणातील हवेच्या अभिसरण प्रवाहांमुळे पडणाऱ्या पावसाला ‘आरोह पर्जन्य’ किंवा ‘अभिसरण पर्जन्य’ असे म्हणतात. सौर प्रारणामुळे भूपृष्ठ तप्त झाल्यास निकटवर्ती थरातील ...
आर्कॅन्सॉ नदी (Arkansas River)

आर्कॅन्सॉ नदी (Arkansas River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण-मध्य भागातून वाहणारी आणि मिसिसिपी नदी (Mississippi River)ची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. २,३५० किमी. तिच्या प्रत्येक ...
आल्बानो सरोवर (Albano Lake)

आल्बानो सरोवर (Albano Lake)

मध्य इटलीतील आल्बान टेकड्यांमधील ज्वालामुखी शंकू कुंडात (कटाह/काहील) निर्माण झालेले एक सरोवर (Lake). ते इटलीची राजधानी रोम (Rome) शहराच्या आग्नेयीस ...
आवर्त (Cyclone)

आवर्त (Cyclone)

वातावरणातील तीव्र कमी भाराच्या केंद्राभोवती सभोवतालच्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून मोठ्या प्रमाणावर चक्राकार वारे वाहतात, त्या आविष्काराला वातावरणविज्ञानात ‘आवर्त’ किंवा चक्रवात, ...
आवर्त पर्जन्य (Cyclonic Rainfall)

आवर्त पर्जन्य (Cyclonic Rainfall)

आवर्ताच्या निर्मितीमुळे जो पाऊस पडतो त्यास ‘आवर्त पर्जन्य’ असे म्हणतात. एखाद्या प्रदेशात जेव्हा केंद्रस्थानी निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याभोवती ...
इकॅतरनबर्ग शहर (Ekaterinburg City)

इकॅतरनबर्ग शहर (Ekaterinburg City)

स्वर्डलॉफ्स्क. पश्चिम-मध्य रशियातील स्वर्डलॉफ्स्क प्रांताचे प्रशासकीय केंद्र. प्रसिद्ध औद्योगिक शहर व देशातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक शहर. लोकसंख्या १५,०१,६५२ (२०१८ ...
इजीअन समुद्र (Aegean Sea)

इजीअन समुद्र (Aegean Sea)

भूमध्य समुद्राचा एक फाटा. इजीअन समुद्राच्या पश्चिमेस व उत्तरेस ग्रीस आणि पूर्वेस तुर्की हे देश असून समुद्राची दक्षिणेकडील मर्यादा क्रीट ...
इनारी सरोवर (Inari Lake)

इनारी सरोवर (Inari Lake)

फिनलंडच्या उत्तर भागातील लॅपलँड प्रांतातील सर्वांत मोठे सरोवर. हे सरोवर रशियाच्या सीमेलगत आहे. आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस स. स.पासून ११९ मी ...
इब्राहिम नदी (Ibrahim River)

इब्राहिम नदी (Ibrahim River)

लेबानन देशातील एक लहान, परंतु पौराणिक दृष्ट्या महत्त्वाची नदी. आडोनिस या नावानेही ती ओळखली जाते. लांबी २३ किमी. लेबानन पर्वताच्या ...
इलिनॉय नदी (Illinois River)

इलिनॉय नदी (Illinois River)

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिसिसिपी नदीची एक उपनदी, तसेच उत्तर आणि मध्य इलिनॉय राज्यातील वाहतूकयोग्य मार्ग. ग्रुंडी परगण्यामधील देस्प्लेंझ नदी आणि ...
उत्क्षालित मैदान (Outwash plain)

उत्क्षालित मैदान (Outwash plain)

हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे मैदान. हिमनदी आपल्या तळावरील खडकांचे पृष्ठभाग खरवडून, फोडून निर्माण झालेली डबर (दगड-गोटे, वाळू, रेती इत्यादी ...