(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
भूगोल या नावाने परिचित असलेला विषय ‘भूगोलविद्या’ किंवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणूनही ओळखला जातो. या विषयाची व्याप्ती लक्षात घेता विश्वकोश रचनेमध्ये याचे निश्चितच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘पृथ्वीसंबंधी माहिती देणारे शास्त्र’ अशी जरी याची सुटसुटीत व्याख्या असली, तरी आता ‘जगासंबंधी किंबहुना जगाच्या पृष्ठभागासंबंधी माहिती देणारे शास्त्र’ असे म्हणणे जास्त उचित ठरेल; कारण या विषयामध्ये मुख्यत्वे भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोल व मानव भूगोल असे याचे प्रामुख्याने दोन भाग पाडून भूपृष्टाचे वर्णन केले जाते. प्राकृतिक भूगोलामध्ये विविध भूरूपे, खडक, हवामान, नैसर्गिक संपत्ती-साधने इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो; तर मानव भूगोलामध्ये विविध देश, विभाग, प्राचीन व अर्वाचीन स्थळे, शेती, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध शोध व शोधक यांचीही माहिती समाविष्ट असते. यांशिवाय मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलणारे संबंध व त्यांचे पृथ:करणात्मक विवेचन करणे, हा आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता अन्य सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्त्वाचे मानले जात आहे.
अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थळांपुरतेच मर्यादित होते. त्यानंतर मात्र भौगोलिक अभ्यासाच्या साधनसामग्रीबरोबरच मानवाच्या जिज्ञासेतही वाढ होत गेली. भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आले. त्यातूनच काही विषयांचे भूगोलशास्त्राशी अर्थपूर्ण संयोजन होऊन त्याच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या. उदा., राजकीय भूगोल, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, नागरी भूगोल, वैद्यक भूगोल, पर्यावरण भूगोल, लोकसंख्या भूगोल, वाहतूक भूगोल, लष्करी भूगोल इत्यादी. विसाव्या व एकविसाव्या शतकांत मानव-पर्यावरण, मानवी परिस्थितीविज्ञान, प्रादेशिक भिन्नत्त्व, भू-राज्यशास्त्र इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाऊ लागले आहे.
हे विविधांगी ‘भूवर्णनशास्त्र’ आपल्या भाषेत नुसते वाचून समजून घेण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य तेथे दृक्-श्राव्य स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविता आल्यास ते लवकर आत्मसात होईल, हा मुख्य उद्देश भूगोल ज्ञानमंडळाने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी यथास्थळी चलत् चित्रफिती, ध्वनी, सचेतनीकरण (अॅनिमेशन), आकृत्या इत्यादींद्वारे जिज्ञासूंना अचूक माहिती संगणकाच्या माध्यमातून पुरविण्याचे योजिले आहे. त्यादृष्टीनेच सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक इत्यादींना मराठी विश्वकोशातील भूगोल विषयाच्या या नवीन स्वरूपाचा निश्चितच फायदा होणार आहे.
इनारी सरोवर (Inari Lake)

इनारी सरोवर

फिनलंडच्या उत्तर भागातील लॅपलँड प्रांतातील सर्वांत मोठे सरोवर. हे सरोवर रशियाच्या सीमेलगत आहे. आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस स. स.पासून ११९ मी ...
इब्राहिम नदी (Ibrahim River)

इब्राहिम नदी

लेबानन देशातील एक लहान, परंतु पौराणिक दृष्ट्या महत्त्वाची नदी. आडोनिस या नावानेही ती ओळखली जाते. लांबी २३ किमी. लेबानन पर्वताच्या ...
इलिनॉय नदी (Illinois River)

इलिनॉय नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिसिसिपी नदीची एक उपनदी, तसेच उत्तर आणि मध्य इलिनॉय राज्यातील वाहतूकयोग्य मार्ग. ग्रुंडी परगण्यामधील देस्प्लेंझ नदी आणि ...
उत्क्षालित मैदान (Outwash plain)

उत्क्षालित मैदान

हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे मैदान. हिमनदी आपल्या तळावरील खडकांचे पृष्ठभाग खरवडून, फोडून निर्माण झालेली डबर (दगड-गोटे, वाळू, रेती इत्यादी ...
उत्खातभूमि (Badland)

उत्खातभूमि

ब्लू गेट, उटाह अमेरिका येथील उत्खातभूमीचा भाग अगदी कमी पावसाच्या प्रदेशात पठारी भागापासून मैदानातील एखाद्या नदीकडे उतरत जाणाऱ्या भूप्रदेशाचे स्वरूप ...
उत्तर ध्रुववृत्त (Arctic Circle)

उत्तर ध्रुववृत्त

आर्क्टिक वृत्त. पृथ्वीगोलावरील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील  ६६° ३०’ उ. अक्षांशावरील काल्पनिक अक्षवृत्ताला आर्क्टिक वृत्त किंवा उत्तर ध्रुववृत्त म्हणून संबोधले जाते. पृथ्वीच्या ...
उरल नदी (Ural River)

उरल नदी

रशिया आणि कझाकस्तानमधून वाहणारी नदी. लांबी २,४२८ किमी., जलवाहन क्षेत्र २,३७,००० चौ. किमी. यूरोपमधील व्होल्गा आणि डॅन्यूब या नद्यांनंतरची ही ...
उस्पालाता खिंड (Uspallata Pass)

उस्पालाता खिंड

दक्षिण अमेरिका खंडातील अँडीज पर्वतश्रेणीतील एक खिंड. ही खिंड सस.पासून ३,८१० मीटर उंचीवर आहे. उत्तरेकडील अ‍ॅकन्काग्वा (उंची ७,०३५ मी.) हे ...
एअर सरोवर (Eyre Lake)

एअर सरोवर

ऑस्ट्रेलियातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर. देशाच्या मध्य भागात असलेल्या ग्रेट ऑस्ट्रेलियन द्रोणीच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात हे सरोवर ...
एटना ज्वालामुखी (Etna Volcano)

एटना ज्वालामुखी

मौंट एटना. इटलीच्या सिसिली बेटावरील एक जागृत (सक्रीय, क्रियाशील) ज्वालामुखी. ग्रीक शब्द ऐटने (मी जळत आहे – ‘I burn’) यावरून ...
एडवर्ड जॉन एअर (Edward John Eyre)

एडवर्ड जॉन एअर

एअर, एडवर्ड जॉन (Eyre, Edward John) : (५ ऑगस्ट १८१५ – ३० नोव्हेंबर १९०१). ऑस्ट्रेलियात समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक आणि ...
एन नदी (Aisne River)

एन नदी

फ्रान्समधील एक महत्त्वाची नदी. लांबी सुमारे २९० किमी., जलवाहन क्षेत्र १२,१०० चौ. किमी. फ्रान्सच्या ईशान्य भागातील म्यूझ विभागात असलेल्या आर्गॉन ...
एम्बाबाने शहर (Mbabane City)

एम्बाबाने शहर

आफ्रिका खंडाच्या आग्नेय भागातील एस्वातिनी (स्वाझीलँड) या भूवेष्टित स्वतंत्र राजसत्ताक देशाची प्रशासकीय राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ९४,८७४ ...
एराटॉस्थीनीझ (Eratosthenes)

एराटॉस्थीनीझ

एराटॉस्थीनीझ (Eratosthenes) : (इ. स. पू. सु. २७६—१९४). ग्रीक गणिती, खगोलशास्त्रज्ञ व भूगोलज्ञ. त्यांचा जन्म लिबिया देशात सायरीनी (प्राचीन सायरेनेइकाची राजधानी ...
एरिक द रेड (Erik the Red)

एरिक द रेड

एरिक द रेड (Erik the Red) : (इ. स. ९५०? — १००३?). ग्रीनलंडचा शोध लावून तेथे वसाहत करणारा नॉर्वेजियन व्हायकिंग समन्वेशक ...
एर्नांदो सोतो दे (Hernando Soto de)

एर्नांदो सोतो दे

सोतो, दे एर्नांदो (Soto, de Hernando) : (२७ ऑक्टोबर १४९५? – २१ मे १५४२). मिसिसिपी नदी, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा आग्नेय ...
एल निनो (El Nino)

एल निनो

दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्‍यावरील महासागरी प्रदेश दर काही वर्षांनी असंगत असा उबदार राहतो. या असंगत आविष्काराला महासागरविज्ञान आणि हवामानशास्त्रात ...
एल्ब्रुस शिखर (Mount Elbrus)

एल्ब्रुस शिखर

रशियाच्या नैर्ऋत्य भागात असलेल्या कॉकेशस पर्वतराजीतील, तसेच यूरोपातील सर्वोच्च ज्वालामुखी शिखर. कॉकेशस पर्वतश्रेणी ही यूरोप व आशिया खंडामधील पारंपरिक नैसर्गिक ...
एस्कर (Esker)

एस्कर

फुलुफजेलेट, पश्चिम स्वीडन येथील एस्कर (हॅना लोकरंट्झ) हिमक्षेत्राच्या विशिष्ट तऱ्हेच्या निक्षेपण कार्याने निर्माण झालेले नागमोडी लाबंट आकाराचे उंचवटे वा डोंगर ...
ऑटो फॉन कॉट्सबू (Otto von Kotzebue)

ऑटो फॉन कॉट्सबू

कॉट्सबू, ऑटो फॉन (Kotzebue, Otto von) : (३० डिसेंबर १७८७ – १५ फेब्रुवारी १८४६). रशियन समन्वेषक व नौसेना अधिकारी. त्यांचा ...