(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद ग्या. गेडाम
कोणत्याही देशाची ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेण्यासाठी त्या देशात विकसित झालेले धर्म आणि तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. धर्मसंकल्पनेतून देशाच्या धारणा ध्यानात येतात, तर तत्त्वज्ञानाद्वारे देशाची वैचारिक समृद्धी व्यक्त होते. सदर ज्ञानमंडळात भारतामध्ये विकसित झालेले आणि प्रचलित असलेले धर्म तसेच तत्त्वज्ञान या दोहोंविषयी नोंदवजा माहिती सादर येणार आहे.
भारतात वैदिक-पौराणिक हिंदू, जैन, शीख इ. धर्म, त्या धर्मांच्या अनुषंगाने उगम पावलेले रितीरिवाज, धार्मिक संकल्पना, विधी, उत्सव, व्रते, संस्कार, कथा, दैवते, प्रमुख ग्रंथ, व्यक्तिनामे, तीर्थक्षेत्रे, यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तसेच भारतामध्ये उगम पावलेली आणि विकसित झालेली आस्तिक व नास्तिक दर्शने, त्यातील प्रमुख तत्त्वे, तत्त्वज्ञ, संकल्पना, पारिभाषिक संज्ञा, महत्त्वपूर्ण ग्रंथ, ग्रंथकार, इ. नोंदप्रकारांचा समावेश करण्यात येईल. नोंदींच्या स्पष्टीकरणासाठी चित्रे, आकृती, तक्ते, नकाशे देण्यात येतील. भारतात रुजलेल्या परंतु विदेशात स्वतंत्रपणे फोफावलेल्या धर्म व तत्त्वज्ञान प्रणालींचा येथे विचार केला जाणार नाही. उदा., जपानमध्ये विकसित झालेला झेन धर्म. त्याचप्रमाणे भारताबाहेर विकसित झालेल्या पण भारतामध्ये रुजलेल्या धर्म आणि तत्त्वज्ञान प्रणालींचा येथे विचार केला जाईल, उदा., सूफी पंथ. भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान या ज्ञानमंडळासाठी वैदिक धर्म आणि तत्त्वज्ञान, देव-देवता, स्मृती व धर्मशास्त्रे, पुराणे, तंत्रशास्त्रे, मंदिरनिर्माण, धार्मिक प्रथा-परंपरांच्या अनुषंगाने विकसित झालेल्या कला व कथा, लोकधर्म, लोकसंस्कृती, पंथ, आस्तिक दर्शने, नास्तिक दर्शने, भक्तिसांप्रदाय, संत व विचारवंत, इत्यादी उपविषय असतील.
पारिभाषिक शब्दांच्या नोंदीमध्ये शब्दाची व्युत्पत्ती प्रथम दिली जाईल, त्यानंतर शब्दाचे स्पष्टीकरण दिले जाईल. ग्रंथाच्या नोंदीबाबतीत ग्रंथाचा काळ, ग्रंथकाराचे नाव, ग्रंथाचा विषय, ग्रंथाची रचना व स्वरूप सादर करण्यात येईल. व्यक्तिनामे असल्यास व्यक्तीचा काळ, संक्षिप्त कौटुंबिक माहिती, कार्यक्षेत्रातील योगदान दिले जाईल. स्थलनामांसाठी नकाशे वापरण्यात येतील.
अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya)

अक्षय्य तृतीया

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी जे काही ...
अग्निपूजा (Agnipooja)

अग्निपूजा

जगातील निरनिराळ्या खंडांमध्ये ज्या प्राथमिक संस्कृती गेल्या दीडशे वर्षांत आढळल्या, त्यांच्यातील बऱ्याच अग्निपूजक आहेत. अग्नी हा राक्षस व पिशाच यांचा ...
अंतःप्रज्ञावाद (Intuitionism)

अंतःप्रज्ञावाद

ज्ञानमीमांसेतील एक उपपत्ती. एका विवक्षित प्रकारच्या विधानांच्या सत्याचे ज्ञान आपल्याला कसे होते, ह्याचा उलगडा करण्यासाठी ही उपपत्ती मांडण्यात आली आहे ...
अथर्ववेदातील सूक्ते (Suktas in Atharva Ved)

अथर्ववेदातील सूक्ते

अथर्ववेदात एकूण २० कांडे, ७३६ सूक्ते आणि ५९७७ मंत्र आहेत. या वेदाचा काही भाग गद्यात्मक तर काही भाग छंदोबद्ध पद्यात ...
अनंत (Infinity)

अनंत

गणितातील व तर्कशास्त्रातील त्याचप्रमाणे तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची संकल्पना. गणितात आणि तर्कशास्त्रात या संकल्पनेला देण्यात आलेले अर्थ आणि संबंधित प्रश्न ह्यांचे ...
अनुमान (Inference)

अनुमान

ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक मानल्या गेलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांपैकी दुसरे प्रमाण म्हणजे अनुमानप्रमाण होय. ‘अनुमितिकरणम् अनुमानम्।’ किंवा ...
अपां नपात् (Apam Napat)

अपां नपात्

अप् म्हणजे जल. अपां नपात् ही एक वैदिक देवता आहे. या देवतेच्या नावाचा अर्थ ‘जलाचा पुत्र’ असा आहे. यालाच अग्नीचे ...
अभाव (Non-Being / Nothingness)

अभाव

तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. ‘अभाव’ याचा अर्थ ‘नसणे’, ‘अस्तित्वात नसणे’ (न+भाव=अभाव) असा होतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात अभावाची कल्पना ‘निगेशन’, ‘नॉन्-बीइंग’, किंवा ‘नॉन्-एक्झिस्टन्स’ ...
अर्हत् (Arhat)

अर्हत्

बौद्ध व जैन धर्मांत अत्यंत पूज्य व्यक्तीस ही उपाधी लावली जाते. व्युत्पत्तीप्रमाणे अर्हत् शब्दाचा अर्थ ‘अंगी योग्यता बाळगणारा’ किंवा ‘पूज्य’ ...
अवकाश (Space)

अवकाश

अवकाश ही एक मूलभूत संकल्पना आहे. भौतिक विश्वासंबंधीच्या मूलभूत संकल्पना सुस्पष्ट, नेमक्या करीत जाणे, त्यांचे परस्परांशी असलेले तार्किक संबंध रेखाटणे, ...
अश्विनौ (Ashwinau / Ashwini Kumar)

अश्विनौ

अश्विनीकुमार : सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वरुण, वायू इत्यादी ३३ मुख्य देवतांपैकी ऋग्वेदातील एक महत्त्वाची युग्मदेवता. ते कायम परस्परांसोबत राहतात ...
अहंकार (Ego)

अहंकार

सांख्यांच्या सृष्ट्युत्पत्तीमधील एक अत्यंत महत्त्वाचे तत्त्व. प्रकृतीत त्रिगुणांची (सत्त्व, रज, तम) उलथापालथ होऊन सत्त्वगुण वरचढ झाला की, बुद्धी किंवा महत् ...
अहंमात्रवाद (Solipsism)

अहंमात्रवाद

‘फक्त मी अस्तित्वात आहे. इतर कशालाही अस्तित्व नाही’ किंवा ‘मी आणि माझ्या अवस्था म्हणजेच सबंध अस्तित्व’ हे तत्त्वमीमांसेतील एक मत ...
आगम (Agam)

आगम

आर्यांच्या पूर्वी भारतात स्थायिक झालेल्या द्रविड, ऑस्ट्रिक इ. वैदिकेतर लोकांच्या धार्मिक परंपरेतून हिंदुधर्मात मूर्तिपूजा, देवळे, उत्सव, सणवार इ. अनेक गोष्टी ...
आजीवक (Ajivika)

आजीवक

भारतातील एक प्राचीन धर्मपंथ. ‘आजीविक’ असेही त्याचे नाव आढळते. हा पंथ आज अस्तित्वात नाही. तो नामशेष होण्यापूर्वी त्याला सु. २,००० ...
आत्मा (Atman)

आत्मा

भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना. आत्मा हा शब्द अत् = सतत चालणे या धातुपासून आला असावा. सतत गतिशील असल्याने त्याला ...
ईशोपनिषद (Ishopanishad)

ईशोपनिषद

ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद. हे महत्त्वाच्या व विश्वसनीय मानल्या गेलेल्या दशोपनिषदांपैकी सर्वाधिक प्राचीन उपनिषद मानले जाते. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा चाळिसावा ...
ईश्वरवाद (Theism)

ईश्वरवाद

ईश्वराची सर्वसंमत अशी व्याख्या करणे कठीण आहे. ईश्वर विश्वाचा निर्माता व नियंता आहे, तो परिपूर्ण आहे. तो सर्वशक्तिमान आहे, सर्व ...
उपमान (Analogy)

उपमान

उपमिती या प्रकारच्या यथार्थ अनुभवाचे साधन म्हणजे उपमान. ज्ञानप्रक्रियेसाठी आवश्यक मानलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांमधील ‘उपमान’ ...
उपवास (Fasting)

उपवास

उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय. या व्रतात ब्रह्मचर्य, मौन इ. निर्बंध शास्त्र वा रूढी जशी ...