(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद ग्या. गेडाम
कोणत्याही देशाची ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेण्यासाठी त्या देशात विकसित झालेले धर्म आणि तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. धर्मसंकल्पनेतून देशाच्या धारणा ध्यानात येतात, तर तत्त्वज्ञानाद्वारे देशाची वैचारिक समृद्धी व्यक्त होते. सदर ज्ञानमंडळात भारतामध्ये विकसित झालेले आणि प्रचलित असलेले धर्म तसेच तत्त्वज्ञान या दोहोंविषयी नोंदवजा माहिती सादर येणार आहे.
भारतात वैदिक-पौराणिक हिंदू, जैन, शीख इ. धर्म, त्या धर्मांच्या अनुषंगाने उगम पावलेले रितीरिवाज, धार्मिक संकल्पना, विधी, उत्सव, व्रते, संस्कार, कथा, दैवते, प्रमुख ग्रंथ, व्यक्तिनामे, तीर्थक्षेत्रे, यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तसेच भारतामध्ये उगम पावलेली आणि विकसित झालेली आस्तिक व नास्तिक दर्शने, त्यातील प्रमुख तत्त्वे, तत्त्वज्ञ, संकल्पना, पारिभाषिक संज्ञा, महत्त्वपूर्ण ग्रंथ, ग्रंथकार, इ. नोंदप्रकारांचा समावेश करण्यात येईल. नोंदींच्या स्पष्टीकरणासाठी चित्रे, आकृती, तक्ते, नकाशे देण्यात येतील. भारतात रुजलेल्या परंतु विदेशात स्वतंत्रपणे फोफावलेल्या धर्म व तत्त्वज्ञान प्रणालींचा येथे विचार केला जाणार नाही. उदा., जपानमध्ये विकसित झालेला झेन धर्म. त्याचप्रमाणे भारताबाहेर विकसित झालेल्या पण भारतामध्ये रुजलेल्या धर्म आणि तत्त्वज्ञान प्रणालींचा येथे विचार केला जाईल, उदा., सूफी पंथ. भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान या ज्ञानमंडळासाठी वैदिक धर्म आणि तत्त्वज्ञान, देव-देवता, स्मृती व धर्मशास्त्रे, पुराणे, तंत्रशास्त्रे, मंदिरनिर्माण, धार्मिक प्रथा-परंपरांच्या अनुषंगाने विकसित झालेल्या कला व कथा, लोकधर्म, लोकसंस्कृती, पंथ, आस्तिक दर्शने, नास्तिक दर्शने, भक्तिसांप्रदाय, संत व विचारवंत, इत्यादी उपविषय असतील.
पारिभाषिक शब्दांच्या नोंदीमध्ये शब्दाची व्युत्पत्ती प्रथम दिली जाईल, त्यानंतर शब्दाचे स्पष्टीकरण दिले जाईल. ग्रंथाच्या नोंदीबाबतीत ग्रंथाचा काळ, ग्रंथकाराचे नाव, ग्रंथाचा विषय, ग्रंथाची रचना व स्वरूप सादर करण्यात येईल. व्यक्तिनामे असल्यास व्यक्तीचा काळ, संक्षिप्त कौटुंबिक माहिती, कार्यक्षेत्रातील योगदान दिले जाईल. स्थलनामांसाठी नकाशे वापरण्यात येतील.
कर्मयोग (Karmayog)

कर्मयोग

‘कर्मयोग’ या शब्दाचा व्युत्पत्यर्थ ‘कर्माची युक्ती’ किंवा ‘कर्माची कुशलता’ असा आहे. कोणतेही युक्त कर्म करण्याचा मार्ग किंवा पद्धती म्हणजे कर्मयोग, ...
कर्मवाद (Karmavaad)

कर्मवाद

सत्कर्माचे व असत्कर्माचे फळ कर्त्याला भोगावेच लागते. कर्ता म्हणजे जीवात्मा; हा या दृश्य भौतिक देहाहून निराळा आहे. कर्माप्रमाणे तो उच्च ...
कर्मेंद्रिये (Karmendriye)

कर्मेंद्रिये

मानवाचा देह (पिंड, क्षेत्र किंवा शरीर) हे एक अद्भुत अस्तित्व आहे. सृष्टीतील पंचभौतिक पदार्थांचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याची पाच ...
काल (Time)

काल

आपल्याला घटनांचा अनुभव येतो, तेव्हा कित्येक घटना इतर काही घटनांच्या पूर्वी किंवा नंतर घडलेल्या असतात, असाही अनुभव येतो. उदा., एखादी ...
केनोपनिषद (Kenopanishad)

केनोपनिषद

सामवेदाच्या तलवकार शाखेचे उपनिषद. हे प्राचीन उपनिषदांपैकी एक असून जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणाचा हा एक भाग आहे. याचा प्रारंभ ‘केन’ या प्रश्नार्थक ...
ख्यातिवाद (Khyativad)

ख्यातिवाद

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात मिथ्या ज्ञानाच्या किंवा भ्रमाच्या विविध उपपत्ती आहेत, त्यांस ‘ख्यातिवाद’ असे म्हणतात. भारतीय ज्ञानमीमांसेतील ख्यातींची उपपत्ती ही एक ...
गुढी पाडवा (Gudhi Padwa)

गुढी पाडवा

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा असे नाव असून या तिथीला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष (इ.स.सु. ७८ वर्षांनंतर) या ...
गुलाबराव महाराज (Gulabrao Maharaj)

गुलाबराव महाराज

श्री गुलाबराव महाराज : (६ जुलै १८८२—२७ सप्टेंबर १९१५). महाराष्ट्रातील विद्वान तत्त्वज्ञ, संत व थोर विचारवंत. त्यांचे पूर्ण नाव गुलाबराव ...
गोंदवलेकर महाराज (Gondavalekar Maharaj)

गोंदवलेकर महाराज

गोंदवलेकर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज : (१९ फेब्रुवारी १८४५ — २२ डिसेंबर १९१३). महाराष्ट्रातील एक संत-सत्पुरुष. त्यांचे पूर्ण नाव गणपत रावजी ...
गौतम (न्यायदर्शन) (Gautam, Nyayadarshan)

गौतम

गौतम : न्यायदर्शनाच्या परंपरेत गौतम या नावाचा उल्लेख दोन प्रकारे येतो. (१) मेधातिथी गौतम, (२) अक्षपाद गौतम. मेधातिथी गौतम हे ...
ग्रामगीता (Gramgeeta)

ग्रामगीता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी (१९०९–१९६८) रचलेले प्रसिद्ध काव्य. ग्रामविकासाच्या उत्कटतेतून ते प्रकट झाले आहे. विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर, वि. स. खांडेकर, ...
चराचरेश्वरवाद (Pantheism)

चराचरेश्वरवाद

धर्म-तत्त्वज्ञानातील एक उपपत्ती. चराचरसृष्टीमध्ये ईश्वर भरून राहिला असून सर्व विश्वच त्याचा आविष्कार किंवा शरीर होय. देवाहून चराचर भिन्न नाही, असे ...
छांदोग्योपनिषद (Chandogyopanishad)

छांदोग्योपनिषद

प्राचीन व विश्वसनीय मानल्या गेलेल्या दशोपनिषदातील हे नववे उपनिषद आहे. ते सामवेदाच्या तलवकार शाखेच्या छांदोग्य ब्राह्मणातील असून प्राचिनता, गंभीरता व ...
जगनाडे महाराज (Jagnade Maharaj)

जगनाडे महाराज

जगनाडे, संत संताजी महाराज : (८ डिसेंबर १६२४—?१६८८?). संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगांचे लेखनिक व संग्राहक; संत तुकारामांच्या भजन-कीर्तनातील १४ ...
जंगली महाराज (Jangali Maharaj)

जंगली महाराज

एक पारंपरिक चित्र जंगली महाराज : (?—४ एप्रिल १८९०). सूफी, दत्त, नाथ आणि वारकरी अशा विविध धर्मसंप्रदायांशी संबंधित असलेले महाराष्ट्रातील ...
जडवाद (Materialism)

जडवाद

ही तत्त्वमीमांसेतील एक महत्त्वाची भूमिका आहे. अचेतन म्हणजे जडवस्तू हेच प्राथमिक किंवा प्रधान अस्तित्व आहे आणि आत्मा, चैतन्य किंवा मन ...
ज्ञानमीमांसा (Epistemology)

ज्ञानमीमांसा

सत्ताशास्त्र (Ontology) व  नीतिशास्त्र (Ethics) यांप्रमाणेच ज्ञानमीमांसा (ज्ञानशास्त्र) ही तत्त्वज्ञानाची एक महत्त्वाची शाखा आहे. माणसाला ज्ञान होते म्हणजे नेमके काय? ...
ज्ञानेंद्रिये (The Senses)

ज्ञानेंद्रिये

ज्ञानेंद्रिये ही संकल्पना इतकी महत्त्वाची आहे की, संस्कृतसाहित्यातील सहा दर्शनग्रंथांतून आणि श्रीमद्भगवद्गीतेतून या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. ज्ञान देणारी इंद्रिये म्हणजे ...
तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj)

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज : (३० एप्रिल १९०९—११ ऑक्टोबर १९६८). महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले ...
तैत्तिरीयोपनिषद (Taittiriyopanishad)

तैत्तिरीयोपनिषद

कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचे हे उपनिषद आहे. या उपनिषदाचे तीन भाग आहेत. त्यांना ‘वल्ली’ असे नाव आहे. त्यांपैकी पहिल्या शिक्षावल्लीत ...
Loading...