(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद ग्या. गेडाम
रने देकार्तला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानले जाते. सतराव्या शतकापासून यूरोपमध्ये देकार्त, स्पिनोझा, लायप्निट्स यांनी बुध्दिप्रामाण्यवाद मांडला; तर लॉक, बर्क्ली, डेव्हिड ह्यूम यांनी अनुभववादाची मांडणी केली. कांटच्या ज्ञानमीमांसेत दोहोंचा समन्वय आढळतो. कांटला म्हणूनच युगप्रवर्तक मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे आधुनिक तत्त्वज्ञान विविध दिशांनी विस्तारलेले दिसते. हेगेल, ह्यूसेर्ल, मार्क्स, हायडेगर यांनी घेतलेला जाणिवेचा वेध कांटहून निराळा व लक्षणीय आहे. तो येथे दिला आहे. तसेच हायडेगरसह किर्केगॉर, सार्त्र, सीमॉन द बोव्हार आदिंच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाची रूपरेषा येथे दिली आहे. मूर, रसेल, व्हिट्गेन्श्टाइन यांचे विश्लेषक तत्त्वज्ञान; श्लिक, कारनॅप, एयर यांचा तार्किक प्रत्यक्षार्थवाद; पर्स, जेम्स, ड्यूई यांचा फल:प्रामाण्यवाद येथे संक्षेपाने येतो व उपयोजित तसेच तौलनिक तत्त्वज्ञानाचाही समावेश आढळतो. एकोणिसाव्या शतकापासून भारतीय जीवनात स्थित्यंतरे होऊ लागली, ती वैज्ञानिक प्रगतीमुळे व त्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे. रेल्वे, टपाल आदी दळणवळणाची तसेच संपर्काची साधने उपलब्ध झाली. शिक्षणासाठी वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये व विश्वविद्यालये आदी संस्थांची स्थापना झाली. पाश्चात्त्य उदारमतवादाचा प्रभाव सुशिक्षितांमध्ये दिसू लागला. परिणामी विज्ञान-तंत्रज्ञान, धर्म-अध्यात्म, ऐहिक-पारलौकिक, नवता-परंपरा, विवेक-श्रध्दा अशा अनेक द्वंद्वांची सांगड आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानात आढळते. किंबहुना, ‘समन्वय’ हे आधुनिक भारतीय तत्त्वज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण होय.

एकविसाव्या शतकात प्रसारमाध्यमांनी क्रांती घडवून आणली. कृषी, उद्योग, कायदा, संगीत, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे काही विशिष्ट प्रश्न निर्माण झाले. अशा मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांचा मागोवा आधुनिक तत्त्वज्ञानात घेतला जातो. एकंदरीत, आधुनिक तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचा व विविध तत्त्वविचारांचा परिचय करून देणे, हे या ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे. तत्त्वज्ञान हा विषय क्लिष्ट मानला जातो. तो शक्य तितक्या सोप्या शब्दांत सर्वसामान्य वाचकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत व संशोधकांपर्यंत पोहोचावा, असे वाटते. पूर्वसूरींचे मार्गदर्शन आहेच. त्याच आधारे हे संचित तात्त्विक प्रसारार्थ खुले करत आहे.

कार्ल यास्पर्स (Karl Jaspers)

कार्ल यास्पर्स

कार्ल, यास्पर्स : (२३ फेब्रुवारी १८८३—२६ फेब्रुवारी १९६९). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचा एक प्रमुख प्रवर्तक. जन्म ओल्डेनबर्ग येथे. त्याने ...
कालिदास भट्टाचार्य (Kalidas Bhattacharya)

कालिदास भट्टाचार्य

भट्टाचार्य, कालिदास : (१७ ऑगस्ट १९११—१५ मार्च १९८४). भारतीय तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म बांगला देशातील बारिसाल येथे झाला. शिक्षण सेरामपूर व ...
कुर्ट गोडेल (Kurt Godel)

कुर्ट गोडेल

गोडेल, कुर्ट : (२८ एप्रिल १९०६—१४ जानेवारी १९७८). प्रसिद्ध गणितवेत्ता व तर्कवेत्ता. जन्म चेकोस्लाव्हाकियात बर्‌नॉ या गावी. रूडोल्फ व मारिएन येथून ...
कॅरल गिलिगन (Carol Gilligan)

कॅरल गिलिगन

गिलिगन, कॅरल : (२८ नोव्हेंबर १९३६). अमेरिकन स्त्रीवादी विचारवंत, जागतिक ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ, नीतितज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखिका. ‘नैतिक समस्यांकडे पाहण्याचा स्त्रियांचा ...
के. सी. भट्टाचार्य (K. C. Bhattacharya)

के. सी. भट्टाचार्य

भट्टाचार्य, के. सी. : (१२ मे १८७५ ‒ ११ डिसेंबर १९४९). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील ...
केंब्रिज प्लेटॉनिस्ट (Cambridge Platonist)

केंब्रिज प्लेटॉनिस्ट

सतराव्या शतकातील इंग्लिश विचारवंतांचा एक गट. ह्यांचे कार्य मुख्यतः धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या क्षेत्रांत आहे. बुद्धी आणि श्रद्धा, विज्ञान ...
केशव लक्ष्मण दप्तरी (Keshav Lakshman Daptari)

केशव लक्ष्मण दप्तरी

दप्तरी, केशव लक्ष्मण : (२२ नोव्हेंबर १८८०—१९ फेब्रुवारी १९५६). प्रसिद्ध भारतीय ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत. ‘भाऊजी दप्तरी’ या नावाने ...
केशव विष्णू बेलसरे (Keshav Vishnu Belsare)

केशव विष्णू बेलसरे

बेलसरे, केशव विष्णू : (८ फेब्रुवारी १९०९—३ जानेवारी १९९८). तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. त्यांचा जन्म सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) येथे एका मराठी ब्राम्हण ...
क्लाइव्ह बेल (Clive Bell)

क्लाइव्ह बेल

बेल, क्लाइव्ह : (१६ सप्टेंबर १८८१—१८ सप्टेंबर १९६४). प्रसिद्ध इंग्लिश कलासमीक्षक, साहित्यसमीक्षक आणि तत्त्वज्ञ. जन्म ईस्ट शेफर्ड, बर्कशर येथे. संपूर्ण ...
क्लिफर्ड गिर्ट्झ (Clifford Geertz)

क्लिफर्ड गिर्ट्झ

गिर्ट्झ, क्लिफर्ड : (२३ ऑगस्ट १९२६‒३० ऑक्टोबर २००६). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाला. त्यांनी ओहायवो येथील ...
गाडगे महाराज (Gadge Maharaj)

गाडगे महाराज

गाडगे महाराज : (२३ फेब्रुवारी१८७६—२० डिसेंबर १९५६). थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. जन्म शेणगाव (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथे ...
गुलाबराव महाराज (Gulabrao Maharaj)

गुलाबराव महाराज

श्री गुलाबराव महाराज : (६ जुलै १८८२—२७ सप्टेंबर १९१५). महाराष्ट्रातील विद्वान तत्त्वज्ञ, संत व थोर विचारवंत. त्यांचे पूर्ण नाव गुलाबराव ...
गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स (Gottfried Wilhelm Leibniz)

गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स

लायप्निट्स, गोटफ्रीट व्हिल्हेल्म : (१ जुलै १६४६—१४ नोव्हेंबर १७१६). थोर जर्मन तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ. जन्म लाइपसिक येथे. त्यांचे वडील नैतिक तत्त्वज्ञानाचे ...
गोंदवलेकर महाराज (Gondavalekar Maharaj)

गोंदवलेकर महाराज

गोंदवलेकर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज : (१९ फेब्रुवारी १८४५ — २२ डिसेंबर १९१३). महाराष्ट्रातील एक संत-सत्पुरुष. त्यांचे पूर्ण नाव गणपत रावजी ...
गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar)

गोपाळ गणेश आगरकर

आगरकर, गोपाळ गणेश : (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब ...
ग्रामगीता (Gramgeeta)

ग्रामगीता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी (१९०९–१९६८) रचलेले प्रसिद्ध काव्य. ग्रामविकासाच्या उत्कटतेतून ते प्रकट झाले आहे. विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर, वि. स. खांडेकर, ...
चार्ल्स सँडर्स पर्स (Charles Sanders Peirce)

चार्ल्स सँडर्स पर्स

पर्स, चार्ल्स सँडर्स : (१० सप्टेंबर १८३९—१९ एप्रिल १९१४). प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ आणि फलप्रामाण्यवाद ह्या तत्त्वज्ञानातील विचारपंथाचा एक संस्थापक. जन्म ...
चित्रपटांचे तत्त्वज्ञान (Philosophy of Film)

चित्रपटांचे तत्त्वज्ञान

चित्रपटाचे तत्त्वज्ञान हे समकालीन कला तत्त्वज्ञानाचे उपक्षेत्र आहे. तसेच सौंदर्यशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण संशोधनाचा विषय म्हणूनही त्यास ओळखले जाते. सध्याच्या काळात ...
चिद्वाद, पाश्चात्त्य (Idealism, Western)

चिद्वाद, पाश्चात्त्य

चैतन्य हे विश्वाचे अधिष्ठान आहे, चैतन्य हेच प्राथमिक किंवा मूलभूत अस्तित्व आहे; तर जडवस्तू, भौतिक सृष्टी, निसर्ग यांचे अस्तित्व दुय्यम, ...
जे. एल. ऑस्टिन (J. L. Austin)

जे. एल. ऑस्टिन

ऑस्टिन, जॉन लँगशॉ : (२६ मार्च १९११‒८ फेब्रुवारी १९६०). इंग्रज तत्त्ववेत्ते. जन्म लँकेस्टर येथे. शिक्षण बेलियल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. १९५२ ...