(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

ठुमरी

अभिजात हिंदुस्थानी संगीतातील एक गायनप्रकार. तो सुगम शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत विभागात गणला जातो. ठुमरी (ठुंबरी) या नावावरूनच तो नृत्याशी ...
डबल बेस (Double Bass)

डबल बेस

डबल बास वाद्य या वाद्यास डबल बास असेही म्हणतात. पाश्चात्त्य वाद्यवृंदातील व्हायोलिनगटातील (फॅमिली) सर्वांत मोठे व खालच्या पट्टीचे एक तंतुवाद्य ...
डी. के. दातार (D. K. Datar)

डी. के. दातार

दातार, दामोदर केशव : (१४ ऑक्टोबर १९३२ –१० ऑक्टोबर २०१८). गायकी अंगाने शांत आणि विलंबित व्हायोलिनवादन करणारे कलाकार. त्यांचा जन्म ...
तानसेन सन्मान, मध्य प्रदेश (Tansen Samman, Madhya Pradesh)

तानसेन सन्मान, मध्य प्रदेश

या पुरस्काराचे संपूर्ण नाव ‘राष्ट्रीय तानसेन सम्मान’ असे आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील हा एक मानाचा पुरस्कार असून तो मध्यप्रदेश शासनाकडून ...
ताळ्ळपाक अन्नमाचार्य (Tallapaka Annamacharya)

ताळ्ळपाक अन्नमाचार्य

ताळ्ळपाक अन्नमाचार्य : (सु. १४०८–१५०३). प्रख्यात कीर्तनरचनाकार, गायक, संगीतकार व तेलुगू कवी. अन्नमाचार्यांना ‘गीतसाहित्य-पितामह’, ‘वाग्गेयकार’, ‘संकीर्तनाचार्य’ इत्यादी सार्थ बिरुदे लावली जातात ...
तोडी थाटातील राग (Todi Thaat)

तोडी थाटातील राग

भातखंडे वर्गीकरणपद्धतीनुसार या थाटातील मुख्य राग फक्त तीन होत : तोडी, गुजरी आणि मुलतानी. त्यांतही तोडी व गुजरी यांत फक्त ...
थविल (Thavil)

थविल

दाक्षिणात्य संगीतातील एक तालवाद्य. थविल हे वाद्य नादस्वरम् (सनईसारखे वाद्य) या वाद्याबरोबर वाजवले जाते आणि दोन्ही बाजूंनी वाजवता येते. थविल ...
थेरेमिन (Theremin)

थेरेमिन

विद्युत्चलित वाद्यांपैकी एक आद्य आणि महत्त्वपूर्ण वाद्य. थेरेमिन हे स्पर्शही न करता ध्वनित होणारे वाद्य आहे. रशियामध्ये १९१९ च्या सुमारास ...
दत्तात्रेय विष्णु काणे (काणेबुवा) Dattatray Vishnu Kane (D. V. Kanebua)

दत्तात्रेय विष्णु काणे

काणे, दत्तात्रेय विष्णु : ( २३ फेब्रुवारी १९१९ – १२ ऑक्टोबर १९९७). हिंदुस्थानी संगीतातील एक ख्यातकीर्त गायक. त्यांचा जन्म इचलकरंजी ...
दत्तात्रेय विष्णु पलुस्कर (Dattatreya Vishnu Paluskar)

दत्तात्रेय विष्णु पलुस्कर

पलुस्कर, डी. व्ही. : (१८ मे १९२१ – २६ ऑक्टोबर, १९५५). महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म गायनाचार्य विष्णु दिगंबर ...
दिनकर कायकिणी (Dinkar Kaikini )

दिनकर कायकिणी 

 कायकिणी, दिनकर  दत्तात्रय : (२ ऑक्टोबर १९२७ – २३ जानेवारी २०१०). हिंदुस्थानी संगीतातील आग्रा घराण्याचे शैलीदार गायक, गुरू, वाग्गेयकार, संगीतज्ज्ञ ...
देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक (Deodhar's School of Indian Music)

देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक

संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी एक ख्यातनाम संस्था. या संस्थेची स्थापना संगीतज्ञ बी. आर. देवधर यांनी १ जुलै १९२५ रोजी मुंबईत केली ...
धोंडूताई कुलकर्णी (Dhondutai Kulkarni)

धोंडूताई कुलकर्णी

कुलकर्णी, धोंडूताई : ( २३ जुलै १९२७ – १ जून २०१४ ). भारतीय अभिजात संगीत शैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या व्रतस्थ व ...
नत्थू खाँ (Nathu Khan)

नत्थू खाँ

नत्थू खाँ : (१८७५ – १९४०). हिंदुस्थानी संगीतातील दिल्ली घराण्याचे ख्यातकीर्त तबलावादक. त्यांच्या जन्म मृत्यूच्या निश्चित तारखा ज्ञात नाहीत. त्यांचा ...
नरहर विष्णु जोशी (Narhar Vishnu Joshi)

नरहर विष्णु जोशी

जोशी, नरहर (बाबूराव) विष्णु : (३१ डिसेंबर १९०८ – ११ नोव्हेंबर १९८४) महाराष्ट्रातील एक संगीतज्ञ व प्रसिद्ध विधिज्ञ. त्यांचा जन्म ...
नाद (Naad)

नाद

साऱ्या संगीत विश्वाची निर्मिती ज्यावर सर्वस्वी अवलंबून आहे तो नाद. यावाचून गीत, नृत्य, स्वर काहीच शक्य नसल्याने याला नादब्रह्म असेही ...
नारदीय शिक्षा (Nardiya Shiksha)

नारदीय शिक्षा

संगीतशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथ. यासनारदी शिक्षा असेही म्हणतात. त्याचा लेखनकाल व कर्ता याविषयी मतभिन्नता असून निश्चित माहिती ज्ञात नाही. काही ...
नारायण तीर्थ (Narayan Teerth)

नारायण तीर्थ

नारायण तीर्थ (श्रीसंत) स्वामिगळ :  (१६७५-१७४५ किंवा १६१०-१७०५). श्रीकृष्ण लीला तरंगिणी  या ग्रंथाचे लेखक, कर्ते व कर्नाटक संगीत रचनाकार भागवत ...
नारायण मोरेश्वर खरे (Narayan Moreshwar Khare)

नारायण मोरेश्वर खरे

खरे, नारायण मोरेश्वर : (? १८८९ – ६ फेब्रुवारी १९३८). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संगीतकार व संगीतशास्त्रावरील साक्षेपी लेखक. त्यांचा जन्म ...
निखिल घोष (Nikhil Ghosh)

निखिल घोष

घोष, निखिल अक्षयकुमार : (२८ डिसेंबर १९१८—३ मार्च १९९५). ख्यातकीर्त तबलावादक, संगीतज्ञ, लेखक, सक्षम गुरु आणि “संगीत महाभारती” या संस्थेचे ...