(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

निखिल बॅनर्जी (Nikhil Banerjee)

निखिल बॅनर्जी

बॅनर्जी, निखिल : (१४ ऑक्टोबर १९३१ – २७ जानेवारी १९८६ ). मैहर घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे एक सुप्रसिद्ध भारतीय सतारवादक. त्यांचा ...
निझामुद्दीन खॉं (Nizamuddin Khan)

निझामुद्दीन खॉं

खॉं, निझामुद्दीन : (? १९२७ — २२ जून २०००). भारतातील तबलावादनाच्या लालियाना घराण्यातील एक श्रेष्ठ व उच्चकोटीचे तबलावादक. त्यांचा जन्म ...
निवृत्तीबुवा सरनाईक (Nivruttibua Sarnaik)

निवृत्तीबुवा सरनाईक

सरनाईक, निवृत्तीबुवा : (४ जुलै १९१२ – १६ फेब्रुवारी १९९४). हिंदुस्थानी रागसंगीताच्या क्षेत्रातील जयपूर-अत्रौली गायकीशी संबंधित एक अग्रगण्य गायक. त्यांचा ...
पन्नालाल घोष (Pannalal Ghosh)

पन्नालाल घोष

घोष, पन्नालाल : (२४ जुलै १९११—२० एप्रिल १९६०). प्रख्यात बासरीवादक. त्यांचा जन्म बारिसाल (बांगला देश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार ...
पालघाट टी. एस. मणी अय्यर (Palghat T. S. Mani Iyer)

पालघाट टी. एस. मणी अय्यर

मणी अय्यर, पालघाट टी. एस. : (१२ जून १९१२ – ३० मे १९८१). स्वत:ची वेगळी वादन शैली निर्माण करून मृदंग ...
पी. सांबमूर्ती (P. Sambamoorthi)

पी. सांबमूर्ती

पिचू सांबमूर्ती : (१४ फेब्रुवारी १९०१ — २३ ऑक्टोबर १९७३). ज्येष्ठ संगीततज्ज्ञ, लेखक, संगीताचे प्राध्यापक आणि कर्नाटक संगीताबरोबरच पाश्चात्य संगीताची ...
पुणे भारत गायन समाज (Pune Bharat Gayan Samaj)

पुणे भारत गायन समाज

पुणे भारत गायन समाज : हिंदुस्थानी संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ आणि संगीतप्रशिक्षण यासाठी कार्यरत असलेली एक जुनी संगीतसंस्था. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी ...
पुरंदरदास (Purandaradasa)

पुरंदरदास

पुरंदरदास : (सु. १४८४ – सु. १५६४). कर्नाटकातील एक थोर संतकवी, शास्त्रीय संगीतकार व रचनाकार. हे वसिष्ठ गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण ...
पूर्वी थाटातील राग (Poorvi Thaat)

पूर्वी थाटातील राग

भातखंडे पद्धतीनुसार पूर्वी थाटात पुढील रागांचा समावेश होतो : (१) पूर्वी, (२) श्री, (३) गौरी, (४) रेवा, (५) मालवी, (६) ...
प्रबंध गायन (Prabandh Gayan)

प्रबंध गायन

संगीतातील बंदिस्त नियमबद्ध रचनेचे गान म्हणजे प्रबंध गायन होय. संगीत कला स्वभावतः प्रगमनशील असल्यामुळे आजच्या संगीताचे स्वरूप शंभर वर्षांपूर्वीच्या संगीतापेक्षा ...
प्रयाग संगीत समिती (Prayag Sangeet Samiti)

प्रयाग संगीत समिती

प्रयाग संगीत समितीच्या मुख्य इमारतीचे छायाचित्र संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ स्थापन झालेली अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील एक ख्यातकीर्त संगीतसंस्था. गायनाचार्य विष्णु दिगंबर ...
फरीदसाहेब सतारमेकर (Faridsaheb Sitarmaker)

फरीदसाहेब सतारमेकर

फरीदसाहेब सतारमेकर : (१८२७ – १८९७). महाराष्ट्रातील तंतुवाद्यांचे एक आद्य प्रवर्तक. त्यांच्या जन्ममृत्यूच्या निश्चित तारखा उपलब्ध नाहीत. त्यांचा जन्म शिकलगार ...
फ्ल्यूट (Flute)

फ्ल्यूट

फ्ल्यूटचे विविध प्रकार सुषिर वाद्यवर्गातील एक प्रमुख पाश्चात्त्य वाद्य. तोंडाने हवा फुंकून वाजविण्याच्या या दंडगोलाकार वाद्याचे अनेक प्रकार आहेत. हे ...
बडे गुलाम अलीखाँ (Bade Ghulam Ali Khan)

बडे गुलाम अलीखाँ

बडे गुलाम अलीखाँ : ( २ एप्रिल १९०२ – २३ एप्रिल १९६८ ). अखिल भारतीय कीर्तीचे पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक ...
बसवराज राजगुरू (Basavaraj Rajguru)

बसवराज राजगुरू

राजगुरू, बसवराज महंतस्वामी : (२४ ऑगस्ट १९१७—२१ जुलै १९९१). कर्नाटक व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रसिद्ध गायक. त्यांचा जन्म उत्तर कर्नाटकमधील ...
बसून (Bassoon)

बसून

कॉन्ट्रा बसून पाश्चात्त्य संगीतपरंपरेतील ओबो वाद्यकुलातील, कंपित-वायुस्तंभ-वर्गातील एक वाद्य. त्यास जर्मन ‘फॅगॉट’ व इटालियन ‘फागोत्तो’ अशा संज्ञा आहेत. याशिवाय याचे ...
बाळूभाई रूकडीकर (Balubhai Rukadikar)

बाळूभाई रूकडीकर

बाळूभाई रूकडीकर : (२८ डिसेंबर १८८८ – २२ ऑक्टोबर १९६२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे खरे ...
बिलावल थाटातील राग (Bilawal Thaat)

बिलावल थाटातील राग

हिंदुस्थानी संगीतशास्त्रातील भातखंडेप्रणीत राग-वर्गीकरण पद्धतीनुसार आद्य महत्त्वाचा व सर्व स्वर शुद्ध असलेला थाट. त्यात तिसांहून अधिक राग अंतर्भूत आहेत. या ...
बिस्मिल्लाखाँ (Bismillah Khan)

बिस्मिल्लाखाँ

बिस्मिल्लाखाँ : ( २१ मार्च १९१६ – २१ ऑगस्ट २००६ ). अखिल भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सनईवादक व भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ...
बी. आर. देवधर (B. R. Deodhar)

बी. आर. देवधर

देवधर, बाळकृष्ण रामचंद्र : (११ सप्टेंबर १९०१ – १० मार्च १९९०). प्रसिद्ध भारतीय संगीतज्ञ, संगीत शिक्षक व शास्त्रीय गायक आणि ...