(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : वर्षा सु. देवरुखकर
संगीत हा विषय आवड म्हणून जरी उत्तम असला, तरी त्याची विश्वभरामध्ये पसरलेली विविध रूपे, प्रकार, शाखा-उपशाखा आणि या सर्वांमध्ये झालेले कार्य तसेच कालचक्राप्रमाणे होत आलेली परिवर्तने, या साऱ्यांचा मागोवा घेऊन तो मराठी रसिकांसमोर नेमक्या रंजकपणे आणि वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ नेऊन मांडणे हे शिवधनुष्यच आहे. प्राचीन काळापासून भारतात आणि इतरत्रही संगीतशास्त्राचा संचार आणि संसार अव्याहतपणे सुरू आहे, मात्र हिंदुस्थानात पूर्वीच्या मौखिक परंपरेला चिकटून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे मोजकेच दप्तर हाती लागते. “बदलते तीच कला” या नात्याने काही शोधण्याचा प्रयत्न करू गेल्यास आधुनिक कालखंडातील संगीतवैभवाचा मागोवा घेता येतो; पण कालौघात लुप्त झालेल्या आणि त्या त्या वेळी महत्त्वपूर्ण टप्पे ठरलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यायचाही हा प्रयत्न आहे. केवळ भारतापुरताच विचार करायचा तर वेदांच्या ऋचांपासून सुरू झालेला हा प्रवास वेगवेगळी मनोहर वळणे घेत, कधी भौतिक तर कधी आध्यात्मिक अंगे स्वीकारत दर्जा, विस्तार आणि वैविध्य अशा सर्व बाजूंनी वृद्धिंगत होत गेला.

भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा प्रमुख संगीतपद्धती आपआपली आगळीवेगळी वैशिष्ट्ये जपत व जोपासत प्राचीन काळापासून विकसित होत गेल्या. त्यांच्या गायन, वादन, नृत्य इत्यादी उपविभागांचा आणि या प्रत्येकाची घराणी होऊन त्यांतील प्रत्येकाचा पुन्हा वेगळा ठसा उमटवणारा प्रवास सुरू झाला आणि परंपरेच्या पायावर नवविचारांची उभारणी करत तो अखंड प्रवाहीत राहिला.

पाश्चात्त्य संगीत जे सामान्यत: यूरोप, अमेरिकेतील लोकांचे संगीत म्हणून ओळखले जाते, याच्या अभिजात वा कलासंगीत व लोकप्रिय संगीत या दोन शाखा आहेत. यांमध्ये सिंफनी रचना, ऑपेरा, बॅले, ग्रामीण व लोकसंगीत, जॅझ, रॉक, चित्रपट आणि सुखात्मिका यांकरिता केलेल्या संगीतरचनांचा समावेश होतो.

संगीतक्षेत्रामध्ये इतरत्रही अशाच प्रकारची प्रक्रिया सुरू राहिली. गायन, वादन, नर्तन, संगीतसंयोजन इत्यादींमध्ये असंख्य कलाकारांनी तसेच संगीतातील काही प्रमुख घराण्यांनी आपापली परंपरा आणि स्वअभ्यास या सर्वांचा अजोड मेळ घालत अलौकिक रचनांची निर्मिती केली आणि या सर्वांनी मिळून अखिल मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर आवश्यक असणारे मानसिक स्थैर्य आणि समाधान देण्याचे अतिशय मोलाचे कार्य संगीताद्वारे केले……. तेही अव्याहतपणे! या सगळ्याचा धांडोळा घेण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न.

गीत (Song)

गीत

भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे ...
गीत (भारतीय संगीत) Geet (Bhartiya Sangeet)

गीत

भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत या दोन्हीही संगीतप्रकारांत गीत या संज्ञेचा अंतर्भाव होतो. मात्र दोन्हीची उत्पत्ती आणि व्याख्या स्वतंत्र आहे ...
गोखले घराणे (Gokhale Gharane)

गोखले घराणे

हिंदुस्थानी संगीतातील एक गायक घराणे. याला बडे मियाँ घराणे असेही संबोधले जाते. ख्याल संगीत विश्वामधील एक महत्त्वपूर्ण असे घराणे. आज ...
गोविंदराव टेंबे (Govindrao Tembe)

गोविंदराव टेंबे

टेंबे, गोविंदराव सदाशिव : (५ जून १८८१–९ ऑक्टोबर १९५५). प्रख्यात महाराष्ट्रीय हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायकनट व साहित्यिक. त्यांचा जन्म सांगवडे, जि ...
ग्राम - मूर्च्छना (Gram-Murchana)

ग्राम – मूर्च्छना

ग्राम : संगीतातील पारिभाषिक संज्ञा. ‘ग्राम’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘समूह’ असा होतो व त्याच अर्थाने त्याचा संगीतात प्रयोग केला ...
घराणी, संगीतातील (Gharana, Bhartiya Sangeet)

घराणी, संगीतातील

हिंदुस्थानी संगीतात ज्या काही थोड्या संकल्पना वादविषय ठरत आल्या आहेत, त्यांत ‘घराणे’ ही प्रमुख संकल्पना होय. धृपद, ख्याल, ठुमरी यांसारखे ...
चतुरंग (Chaturanga)

चतुरंग

उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील एक जुना गायनप्रकार. बाराव्या शतकापासून तो रूढ असल्याचे दिसते. ‘चतुर्मुख’ या नावाने त्याचा निर्देश सोमेश्वरलिखित मानसोल्लास  वा अभिलषितार्थचिंतामणि ...
चतुर्दण्डिप्रकाशिका (Chaturdandiprakashika)

चतुर्दण्डिप्रकाशिका

सतराव्या शतकातील संगीतशास्त्रावरील एक प्रसिद्ध ग्रंथ. संगीतकार गोविंद दीक्षितांचा द्वितीय पुत्र पंडित व्यंकटमखी यांनी तो लिहिला असून ते उच्च कोटीचे ...
चित्रवीणा (Chitravina)

चित्रवीणा

प्राचीन काळापासून वापरले जाणारे दक्षिण भारतीय तंतुवाद्य. त्याला गोटूवाद्यम् आणि महानाटक वीणा, वीणा हनुमद या नावानेही ओळखले जाते. हे एकवीस ...
छोटा गंधर्व (Chhota Gandharva)

छोटा गंधर्व

छोटा गंधर्व : (१० मार्च १९१८– ३१ डिसेंबर १९९७). मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट. ‘सौदागर’ ह्या नावानेही परिचित. संपूर्ण नाव ...
जगन्नाथबुवा पुरोहित (Jagannathbuwa Purohit)

जगन्नाथबुवा पुरोहित

पुरोहित, जगन्नाथ जनार्दन (गुणीदास) : (१२ मार्च १९०४ – २० ऑक्टोबर १९६८). महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व ...
जाति गायन (Jati Gayan)

जाति गायन

स्वरतालांच्या रचनेचे गायन. संगीताचे सिद्धांत गेय म्हणजे गायल्या जाणाऱ्या पद्यांमध्ये दिसून येणाऱ्या तत्त्वांवर आधारीत असतात. गेय पद्यांच्या चाली ठरलेल्या असतात ...
जितेंद्र अभिषेकी (Jitendra Abhisheki)

जितेंद्र अभिषेकी

अभिषेकी, जितेंद्र : (२१ सप्टेंबर १९२९ / १९३२ ॽ – ७ नोव्हेंबर १९९८). एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ. त्यांचे ...
जी. हरिशंकर (G. Harishankar)

जी. हरिशंकर

जी. हरिशंकर : (१० जून १९५८ – ११ फेब्रुवारी २००२). गोविंद राव हरिशंकर. कर्नाटक संगीतक्षेत्रामधील थोर खंजिरावादक. हे वाद्य वाजवताना ...
जोहरा सहगल (Zohra Sehgal)

जोहरा सहगल

सहगल, जोहरा : (२७ एप्रिल १९१२—१० जुलै २०१४). नृत्यक्षेत्रात आणि चित्रपटक्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका. नृत्य ...
ज्ञानप्रकाश घोष (Dnyanprakash Ghosh)

ज्ञानप्रकाश घोष

घोष, ज्ञानप्रकाश : (८ मे १९०९–१८ फेब्रुवारी १९९७). प्रसिद्ध भारतीय तबलावादक व हार्मोनियमवादक. त्यांचा जन्म संगीताचा समृद्ध वारसा असलेल्या घराण्यात ...
ज्योत्स्ना भोळे (Jyotsna Bhole)

ज्योत्स्ना भोळे

भोळे, ज्योत्स्ना केशव : (११ मे १९१४ – १ ऑगस्ट २००१). शास्त्रीय व उपशास्त्रीय गीतप्रकार आणि भावगीत गायिका व मराठी ...

टप्पा

हिंदुस्थानी संगीतातील एक ललित गायनप्रकार. तो मियाँ शौरी यांनी (सु. १८१०) प्रवर्तित केला. ‘टप्पा’ हा शब्द ‘टप्’ (लघू किंवा लहान) ...
ट्रिनिटी क्लब, मुंबई (Trinity Club, Mumbai)

ट्रिनिटी क्लब, मुंबई

संगीताचा प्रचार व प्रसार याकरिता कार्यरत असणारे मंडळ. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या हस्ते ट्रिनिटी क्लबची सुरुवात १९०८ साली मुंबई येथील ...
ठाकूर जयदेव सिंह (Thakur Jaidev Singh)

ठाकूर जयदेव सिंह

ठाकूर जयदेव सिंह : (१९ सप्टेंबर १८९३—२७ मे १९८६). भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय संगीत यांचा सखोल व्यासंग करून आणि त्यात ...