(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
माणसाच्या उदयापासून तो प्रगती करीत आहे. ही प्रगती म्हणजेच विज्ञान. मग तो अग्नीचा शोध असो, की वल्कलाचा शोध असो, की गुहेत राहण्याचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्याच्या प्राप्तीसाठी व त्यातील सुधारणांसाठी मानवाने अनेक शोध लावले.चाकाचा शोध हा त्यातील एक क्रांतीकारक शोध.चरक आणि सुश्रुताने जगाला आयुर्वेदाची देणगी दिली.तशीच गणितातील शून्याचा शोधही तितकाच क्रांतीकारक मानला जातो. हे शोध भारताच्या नावावर आहेत.ग्रीक लोकांनीसुध्दा पायथागोरस सिद्धांत व गणितात इतर बरेच शोध लावले. मात्र त्यानंतर पाश्चात्य देशांनी विज्ञानात मोठीच आघाडी घेतली.

हे शोध लावणा-या जगातल्या संशोधकांची चरित्रे संक्षेपाने या ज्ञानमंडळाच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत.संशोधकांशिवाय हे ज्ञानमंडळ संशोधन करणा-या जगातील विविध संस्थांविषयीही माहिती देणार आहे.हे संशोधक आणि संशोधन करणा-या संस्था या भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित, भूशास्त्र, मानववंशशास्त्र, अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अभियांत्रिकी, शेती, पर्यावरण अशा नाना प्रकारच्या विज्ञान विषयातील असणार आहेत.

विज्ञानात रोज नवनवीन विषय निर्माण होत आहेत.मुळात माणसाला नाविन्याची आवड असल्याने कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन आणि सुधारीत गोष्ट त्याला हवी असते.हा हव्यासाच त्याला संशोधन करायला भाग पाडतो.अशी संशोधने आता वैयक्तिकस्तरावर लागण्याचा काळ मागे पडला असून संशोधने आता सांघिक स्तरावर होतात अथवा ती संस्थात्मक पातळीवर होतात.

ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला,ज्यांना नोबेल समकक्ष असलेले आबेल, फिल्ड्स, जल अथवा तत्सम पुरस्कार मिळाले,ज्यांना आपापल्या देशातील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत,ज्यांच्या संशोधनामुळे समाजावर परिणाम घडवून आला आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय समित्यांवर अथवा मासिकांवर सभासदत्त्व मिळाले आहे,ज्या संस्था सातत्याने संशोधन करीत आहेत, जी मासिके संशोधनपर लेख आणि निबंध छापत आहेत, टाटां-हेन्री फोर्डसारखे जे महत्त्वाचे उद्योगपती आहेत,भाभा-नारळीकर-अब्दुस सलाम यासारख्या ज्या ज्या वैज्ञानिकांनी विज्ञानसंस्था स्थापन केल्या आहेत आणि जे विज्ञान प्रसारक आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांवर या कोशात नोंदी लिहिल्या आहेत त्यांपैकी काहींनी एक अथवा एकापेक्षा अधिक गोष्टीतील पात्रता संपादन केली आहे.

श्रीधर हरिदास कस्तुरे (Shridhar Haridas Kasture)

श्रीधर हरिदास कस्तुरे

कस्तुरे, श्रीधर हरिदास  (९ मे १९३६ – ३ जुलै २०१४). भारतीय वैद्यक. कस्तुरे यांनी महर्षी यूरोपियन रिसर्च युनिव्हार्सिटीद्वारे (एमयूआरयू; MERU) ...
श्रीराम शंकर अभ्यंकर (Shreeram Shankar Abhyankar)

श्रीराम शंकर अभ्यंकर

अभ्यंकर, श्रीराम शंकर : (२२ जुलै १९३० – २ नोव्हेंबर २०१२). भारतीय-अमेरिकन गणिती. बीजगणित व बैजिक भूमिती या क्षेत्रांत ...
श्रॉटर, जोसेफ (Schroter, Joseph)

श्रॉटर, जोसेफ

श्रॉटर, जोसेफ : ( १४ मार्च, १८३७ – १२ डिसेंबर, १८९४ ) जोसेफ श्रॉटर हे जर्मन शास्त्रज्ञ एक नावाजलेले बुरशीतज्ज्ञ ...
श्लाईख, योर्ग (Schlaich Jorg)

श्लाईख, योर्ग

श्लाईख, योर्ग :  (१७ ऑक्टोबर १९३४ – ) योर्ग श्लाईख या जर्मन अभियंत्याचा जन्म जर्मनीतील बादेन-ब्युटेंबर्गमधील केर्नेन येथे झाला. त्यांनी ...
श्वान, थिओडोर ( Schwann,Theodor)

श्वान, थिओडोर 

श्वान, थिओडोर( ७ डिसेंबर, १८१० – ११ जानेवारी, १८८२ ) एलिझाबेथ आणि लिओनार्ड श्वान यांचा थिओडोर हा  मुलगा होता. यांचा ...
सतमंगलम् रंगा अय्यंगार श्रीनिवास वर्धन (Sathamangalam Ranga Iyengar Srinivasa Varadhan)

सतमंगलम् रंगा अय्यंगार श्रीनिवास वर्धन

वर्धन, सतमंगलम् रंगा अय्यंगार श्रीनिवास : ( २ जानेवारी १९४० ) सतमंगलम् रंगा अय्यंगार श्रीनिवास वर्धन यांचा जन्म मद्रास (चेन्नई) ...
सतीश चंद्र माहेश्वरी (Satish Chandra Maheshwari)

सतीश चंद्र माहेश्वरी

माहेश्वरी, सतीश चंद्र : (४ ऑक्टोबर १९३३ – १२ जून २०१९ ) सतीश चंद्र माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानमधील  जयपूर येथे झाला ...
सर (फ्रँक) मॅकफार्लेन बर्नेट (Sir Frank Macfarlane Burnet)

सर

बर्नेट, सर (फ्रँक) मॅकफार्लेन : (३ सप्टेंबर १८९९ — ३१ ऑगस्ट १९८५). ऑस्ट्रेलियन वैद्यक, प्रतिरक्षाशास्त्रज्ञ आणि विषाणुविज्ञ. त्यांना उपार्जित प्रतिक्षमताजन्य ...
सर आर्थर हार्डन (Sir Arthur Harden)

सर आर्थर हार्डन

हार्डन, सर आर्थर : (१२ ऑक्टोबर १८६५ – १७ जून १९४०). ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी शर्करेच्या किण्वण (फर्मेंटेशन; fermentation) क्रियेवर आणि ...
सर एडविन मेल्लोर सदर्न (Sir Edwin Mellor Southern)

सर एडविन मेल्लोर सदर्न

सदर्न, सर एडविन मेल्लोर  ( ७ जून, १९३८). इंग्लिश रेणवीय जीवशास्त्रज्ञ. ते लास्कर  पारितोषिक  विजेते  आहेत. निवृत्तीनंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात ...
सर एर्न्स्ट बोरिस चेन (Ernst Boris Chain)

सर एर्न्स्ट बोरिस चेन

चेन, सर एर्न्स्ट बोरिस : (१९ जून १९०६ —१२ ऑगस्ट १९७९). जर्मन-ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी सन १९२८ साली सर अलेक्झांडर फ्लेमिंग ...
सर जोझेफ जॉन टॉमसन (Sir Joseph John Thomson)

सर जोझेफ जॉन टॉमसन

टॉमसन, सर जोझेफ जॉन  (१८ डिसेंबर १८५६ – ३० ऑगस्ट १९४०). ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. अणूमध्ये केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षांमधून फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनांचा ...
सर टिमोथी जॉन बर्नर्स-ली (Sir Timothy John Berners-Lee)

सर टिमोथी जॉन बर्नर्स-ली

बर्नर्स-ली, सर टिमोथी जॉन : (८ जून १९५५). इंग्रज संगणक अभियंता. टिम बर्नर्स-ली (Tim Berners-Lee) या नावानेही ते ओळखले जातात ...
सर सिरिल ॲस्टली क्लार्क (Sir Cyril Astley Clarke)

सर सिरिल ॲस्टली क्लार्क

क्लार्क, सर सिरिल ॲस्टली : (२२ ऑगस्ट १९०७ — २१ नोव्हेंबर २०००). ब्रिटीश वैद्यक, जनुकशास्त्रज्ञ आणि पतंग व फुलपाखरे यांचा अभ्यास ...
सर हान्स आडोल्फ क्रेब्ज (Sir Hans Adolf Krebs)

सर हान्स आडोल्फ क्रेब्ज

क्रेब्ज, सर हान्स आडोल्फ : (२५ ऑगस्ट १९०० – २२ नोव्हेंबर १९८१)
जर्मनीत जन्मलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ. त्यांनी सजीवांमध्ये घडणाऱ्या ट्रायकार्बॉक्झिलिक ...
साक, जोनास ( Salk, Jonas)

साक, जोनास

साक, जोनास : ( २९ ऑक्टोबर, १९१४ – २३ जून, १९९५) न्यूयॉर्क शहरात जोनास साक यांचा जन्म झाला. जोनास महाविद्यालयात गेले ...
सान्तियागो रामोन काहाल (Santiago Ramón Cajal)

सान्तियागो रामोन काहाल

काहाल, सान्तियागो रामोन :  (१ मे १८५२ – १७ ऑक्टोबर १९३४)  सान्तियागो रामोन इ काहाल, यांचा जन्म ईशान्य स्पेनमधील, पेटिय्या ...
साबिन, अल्बर्ट ( Sabin, Albert)         

साबिन, अल्बर्ट

साबिन, अल्बर्ट : ( २६ ऑगस्ट, १९०६ – ३ मार्च, १९९३) पोलंड देशातील बियालीस्टॉक (Bialystock) या गावी एका ज्यू कुटुंबात ...
साल्वाडोर एडवर्ड लूरिया (Salvador Edward Luria)

साल्वाडोर एडवर्ड लूरिया

लूरिया, साल्वाडोर एडवर्ड : (१३ ऑगस्ट १९१२ – ६ फेब्रुवारी १९९१) साल्वाडोर एडवर्ड लूरिया यांचा जन्म इटलीतील टुरिन या गावी ...
सिग्मंड फ्रॉईड (Sigmund Freud)

सिग्मंड फ्रॉईड

फ्रॉईड, सिग्मंड  : (६ मे १८५६ – २३ सप्टेंबर १९३९) ऑस्ट्रियन साम्राज्यातील मोरेव्हियातील फ्रायबर्ग गावात, सिग्मंड फ्रॉईड यांचा जन्म झाला. सिग्मंड ...