सांख्यिकीमधील विदाचे प्रकार (Types of Data in Statistics)  

सांख्यिकी मध्ये कोणत्याही दृक् घटनेबद्दल निरीक्षणे नोंदवित असताना जी माहिती गोळा करावी लागते तिला विदा (data) असे म्हणतात. अभ्यासात ज्या कोणत्या गुणधर्मांवर निरीक्षणे नोंदवावयाची असतात त्यांना लक्षण (characteristics) असे म्हटले…

ओगुरा हयाकुनिनइश्श्यु (Ogura HyakuninIsshu)

ओगुरा हयाकुनिनइश्श्यु : अभिजात जपानी साहित्यातील प्राचीन संकलित काव्यसंग्रह. कामाकुरा कालखंडातील प्रसिद्ध कवी आणि विद्वान फुजिवारा नो तेइकाने या कवितासंग्रहाचे संकलन केले. प्रसिद्ध फुजिवारा घराण्यामध्ये जन्म झालेल्या तेइकाचे वडील सुद्धा…

काँक्रीट (Concrete)

काँक्रीट हे जगातील सर्वाधिक आणि सर्वत्र सामान्यपणे वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य आहे. सर्वसाधारणपणे काँक्रीट लहान किंवा मोठ्या आकाराचे दगड / खडी, वाळू, सिमेंट आणि पाणी यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते.…

षड्रस चिकित्सा

रस म्हणजे चव होय. आयुर्वेदानुसार रसना म्हणजे जीभ. जीभ या इंद्रियाने ज्या अर्थाचे (विषयाचे) ज्ञान होते त्याला रस म्हणतात. रस ही संकल्पना फक्त पदार्थाची चव इतकीच मर्यादित नसून शरीरातील धातुघटक,…

परिचर्या संशोधन : प्रकार (Nursing Research : Types)

परिचर्या संशोधन हे परिचारिकांनी करण्याच्या वेगवेगळ्या सेवाक्रिया व उपचार पद्धतीसाठी शास्त्रीय पुरावा निर्माण करून परिचर्या व्यवसायात शास्त्रीय ज्ञानाची भर घालते. परिचर्या संशोधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. परिमाणात्मक संशोधन (Quantitative research)…

अत्युच्च भार किंमत निश्चिती (Peak Load Pricing)

अत्युच्च भार किंमत निश्चिती ही किंमत ठरविण्याची अशी व्यूहरचना आहे की, ज्यामध्ये वस्तू व सेवा यांची मागणी जास्त असताना जास्त किंमत आकारली जाते आणि वस्तू व सेवांची मागणी कमी असताना…

भूतजय

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांवर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे भूतजय नावाची सिद्धी होय. ‘भूत’ या शब्दाचा अर्थ येथे महाभूत असा आहे. पाच महाभूते अचेतन आहेत; परंतु…

उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार (North American Free Trade Agreement NAFTA)

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यामध्ये झालेला जगातील आंतरराष्ट्रीय व्यापारातील सर्वांत मोठ्या करारांपैकी एक करार. १० जून १९९० रोजी या तीन राष्ट्रांमध्ये मुक्त व्यापाराबाबत करार करण्यासाठी सहमती झाली. त्यानुसार ५ फेब्रुवारी…

सन्तोलनासन

एक आसनप्रकार. हे आसन तोलासन या नावानेही ओळखले जाते. विभिन्न परंपरांमध्ये शरीराचा तोल सांभाळणारे अनेक आकृतिबंध तोलासन या नावाने ओळखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृती : पद्मश्री योगाचार्य सदाशिव…

रासायनिक चिकित्सेचे दुष्परिणाम (Side effects of chemotherapy)

रासायनिक चिकित्सा ही कर्करोगावरील एक उपचार पद्धती आहे. या चिकित्सेअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या औषधांचे काही ना काही दुष्परिणाम होत असतात. प्रत्येक औषधांचे वेगवेगळे परिणाम असू शकतात. तसेच एकाच वेळी सर्व परिणाम…

रासायनिक चिकित्सा (Chemotherapy)

कर्करोगावर उपचार करण्यात येणाऱ्या औषधी उपचारांना रासायनिक चिकित्सा असे म्हणतात. औषधे ही सामान्यत: रसायनांपासून बनविलेली असतात म्हणून या उपचारांना रसायनोपचार असे देखील म्हणतात. यासंदर्भातील केमोथेरपी हा शब्द प्रचलित आहे. कर्करोग…

परिचारिका : आरोग्य संघाचा एक घटक (Nurse : A Component of Health Team)

समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य टिकविणे, वृद्धिंगत करणे, रोग होऊ न देणे, आजार झाला असल्यास बरा करणे व त्याचे पुनर्वसन करणे यासाठी ज्या लोकांचा समूह कार्य करीत असतो त्यास “आरोग्य संघ”…

वितरण प्रणाली प्रचालक (Distribution System Operator – DSO)

विद्युत निर्मिती क्षेत्रात परंपरागत वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे उपलब्ध साठे मर्यादित आहेत आणि या इंधनाच्या वापराने कार्बन डाय-ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येक…

क्लेश

योगशास्त्रात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पाचांना ‘क्लेश’ अशी संज्ञा आहे (अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशा: क्लेशा:| योगसूत्र २.३). ते नाना प्रकारच्या दु:खांना कारणीभूत होतात, परिणामी जीवाला क्लेश देतात म्हणून ‘क्लेश’ ही…

योनिधावन (Vaginal wash )

औषधी द्रव्यांनी योनीमार्ग, गर्भाशयमुख धुऊन काढणे (प्रक्षालन करणे) म्हणजे योनिधावन होय. हा एक स्थानिक चिकित्सेचा प्रकार असल्यामुळे सर्वदैहिक परिणाम यामध्ये अपेक्षित नाही. प्रक्षालनाबरोबरच रुक्षण (कोरडेपणा आणणे), स्तंभन (स्त्राव थांबवणे), अल्प…