विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग दुसरा घटसर्प ते पॅरामिशियम (सु. २९५ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
सरीसृप वर्गाच्या व्हायपरिडी कुलातील एक विषारी साप. या वर्गातील डायोप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील सर्पेंटिस उपगणात जगातील सर्व सापांचा समावेश केला ...
सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील व्हॅरॅनिडी कुलातील सरडयासारखा दिसणारा परंतु त्याच्याहून आकाराने पुष्कळच मोठा प्राणी. उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आफ्रिका, भारत, ...