(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

१९६२ च्या पराभवाचे विश्लेषण (Analysis of the defeat of 1962)

१९६२ च्या पराभवाचे विश्लेषण

प्रामुख्याने भारताच्या अग्रवर्ती धोरणाला प्रतिसाद म्हणून चिनी सैन्याने २० ऑक्टोबर १९६२ रोजी तवांग विभागात केलेल्या हल्ल्याने आरंभ झालेल्या भारत-चीन युद्धाची ...
अजातशत्रू (Ajatshatru)

अजातशत्रू

अजातशत्रू : (इ.स.पू.सु. ४९५—४६२). अजातशत्रू हा बिंबिसार राजाचा मुलगा. कोसल आणि वैशाली या राज्यांवर विजय मिळवून आपल्या पित्याने स्थापन केलेल्या ...
अटलांटिक सनद (Atlantic Charter)

अटलांटिक सनद

अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरात न्यू फाउंडलंडजवळ एका बोटीवर विचार विनिमय करून ...
अण्वस्त्रप्रसारबंदी करार (Treaty on Non-Proliferation of Nuclear Weapons)

अण्वस्त्रप्रसारबंदी करार

अण्वस्त्रांचा, अणुतंत्रज्ञानाचा प्रसार रोखणे, अणूऊर्जेचा वापर शांततेसाठी करण्यास प्रोत्साहन देणे, आण्विक निःशस्त्रीकरण आणि पूर्ण निःशस्त्रीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ...
अधरकुमार चॅटर्जी (Adhar Kumar Chatterji)

अधरकुमार चॅटर्जी

चॅटर्जी, अधरकुमार : (२२ नोव्हेंबर १९१४—६ ऑगस्ट २००१). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. कटक, बारीसाल व कलकत्ता येथे शिक्षण घेतल्यानंतर शाही हिंदी नौसेनेत ...
अरुणकुमार श्रीधर वैद्य (Arunkumar Sridhar Vaidya)

अरुणकुमार श्रीधर वैद्य

वैद्य, अरुणकुमार श्रीधर : (२७ जानेवारी १९२६ ‒ १० ऑगस्ट १९८६). भारताचे दहावे सरसेनापती (१९८३–८६). त्यांचा जन्म अलिबाग येथे झाला ...
अर्जन सिंग (Arjan Singh)

अर्जन सिंग

सिंग, अर्जन : (१५ एप्रिल १९१९ — १६ सप्टेंबर २०१७). भारताचे माजी वायुसेनाप्रमुख. जन्म ल्यालपूर येथे. वडिलांचे नाव किशन सिंग. माँटगोमेरी ...
अर्थतज्ज्ञांचे योगदान (Contributions of Economist)

अर्थतज्ज्ञांचे योगदान

ॲडम स्मिथ (१७२३–१७९०) हे संरक्षण अर्थशास्त्रात योगदान देणारे पहिले अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी संरक्षण खर्चाचे समाजावर व अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात ...
अलगतावाद (Separatism)

अलगतावाद

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे एक सूत्र. आपल्या परराष्ट्र नीतीचा पाया म्हणून अलगतेचा अंगीकार अमेरिकेने प्रथमपासून केला व पहिल्या महायुद्धापर्यंत यशस्वी रीतीने ...
अशोक सम्राट (Ashoka Emperor)

अशोक सम्राट

वैशाली (बिहार) येथील अशोकस्तंभ. सम्राट अशोक : (इ.स.पू. ?३०३—?२३२). सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्य याचा नातू आणि बिंदुसार याचा मुलगा ...
असलउत्तरची लढाई  (Battle of Asaluttar)

असलउत्तरची लढाई

भारत- पाकिस्तान १९६५ च्या युद्धामधील एक लढाई. पार्श्वभूमी : पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील खेमकरन या गावापासून पाच किमी. दूर असलेले असलउत्तर हे ...
आंतरराष्ट्रीय व्यवस्था (International Order)

आंतरराष्ट्रीय व्यवस्था

मॉर्टन कॅप्लन, केनेथ वॉल्ट्झ, ह्यूगो ग्रोशियस, जोसेफ फ्रँकेल यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची व्याख्या करण्यात आणि या संकल्पनेचा विस्तार करण्यात मोठे योगदान ...
आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षा (Disaster Management and National Security)

आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षा

प्रस्तावना : मानव संसाधन, राष्ट्रीय संपत्ती, आणि अर्थव्यवस्था हे तीन घटक राष्ट्रीय सुरक्षेचे अतिशय महत्त्वाचे घटक मानले जातात. त्यामुळे  या ...
आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (Disaster Management Act, 2005)

आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५

भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो. भारतातील आपत्तींचे ...
आपत्ती व्यवस्थापन क्षमता (Capacities in Disaster Management)

आपत्ती व्यवस्थापन क्षमता

विद्यार्थ्यांना आपत्तीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक क्षमता बांधणी प्रशिक्षण देताना प्रशिक्षक-मार्गदर्शक प्रस्तावना : क्षमता म्हणजे समुदाय, समाज किंवा संघटना यांत उपलब्ध ...
आपत्ती व्यवस्थापन चक्र (Disaster Management Cycle)

आपत्ती व्यवस्थापन चक्र

अनंत काळापासून पृथ्वीतलावर आपत्ती कोसळत आल्या आहेत. वारंवार येणाऱ्या आपत्तींपैकी काही नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात. आपत्तींमुळे होणारी जीवित ...
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (Disaster Management Authority)

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

प्रस्तावना : आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) हा भारतीय संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर ...
आपत्ती शमन (Disaster Mitigation)

आपत्ती शमन

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील डोंगराला बसविलेली जाळी प्रस्तावना : आपत्तींचा प्रभाव कमी करून जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करणे ...
आपत्तींची वर्गवारी (Category of Disasters)

आपत्तींची वर्गवारी

ज्या नैसर्गिक व मानवी दुर्घटनांमुळे सर्वसाधारण जनजीवनात गंभीर समस्या निर्माण होतात, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते आणि पर्यावरणावर दूरगामी ...
आंरी तूरेन (Henri Turenne)

आंरी तूरेन

तूरेन, आंरी : (११ सप्टेंबर १६११‒२७ जुलै १६७५). प्रसिद्ध फ्रेंच युद्धनीतिज्ञ व सेनापती. बूयाँच्या जहागिरदार घराण्यात सडॅन येथे जन्म. वयाच्या चौदाव्या वर्षी ...