(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
विश्वकोशाच्या यापूर्वी प्रसिध्द झालेल्या खंडांत युद्धशास्त्र या विषयाचा आवाका मर्यादित होता. गेल्या तीन चार दशकांत सामरिक नीतीच्या स्वरूपात लक्षणीय बदल झाल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती घडून आल्याने या विषयाच्या स्वरूपात मूलग्राही बदल करणे आवश्यक होते. युद्धशास्त्र या सदराखालील बहुतांश नोंदी कालबाह्य झाल्या होत्या. बऱ्याच नोंदींमध्ये पुनर्संशोधन करणे आणि त्याबरोबरच त्या नोंदींचे कृतीक्षेत्र वाढवणे अपरिहार्य होते. त्यानुषंगानेच ‘युद्धशास्त्र’ या विषयनामाऐवजी ‘सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयनामाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा निगडित अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा या ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. सामरिकशास्त्राच्या अभ्यासकाला भू-राजनीती आणि सामरिक भूगोलाची जुजबी ओळख असणे आवश्यक आहे. त्या आधारावरच आंतरराष्ट्रीय संबंध, विविध देशांमधील कलह आणि सीमा तंट्याचा तो मागोवा घेऊ शकेल. सामरिक नीती, डावपेच आणि सामरिक पुरवठा व्यवस्थेचे ज्ञान हे युद्धप्रक्रियेचे पायाभूत घटक आहेत. त्यात विविध युद्धतंत्रांचा समावेश होतो. सामुद्रिक सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा ही या प्रक्रियेची आणखी दोन परिमाणे आहेत. दिवसेंदिवस हितशत्रूंच्या उत्तेजनाने वाढत जाणाऱ्या पंचमस्तंभी कारवायांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. त्याच्या पैलूंची दखल घेणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या संरक्षणाची गुणवत्ता सबळ अर्थपुरवठ्यावर निर्भर असल्याने संरक्षणसंबंधित अर्थनीतीचा अभ्यास करणे जरुरी आहे. भारतीय संरक्षणाचा डोलारा संरक्षण मंत्रालयापासून सैन्यदलांच्या तीन अंगांच्या तृणमूलापर्यंत विविध संघटनांवर उभा आहे. या संघटनवृक्षाच्या शाखांची माहिती असणे आवश्यक आहे. युद्ध आणि विज्ञान यांची युती अभेद्य आहे, यामुळे तंत्रज्ञानातील विविध अविष्कार आणि त्यांच्याकरवी शस्त्रस्पर्धेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आवश्यक आहे. युद्धेतिहासाच्या अध्ययनाकरवी त्याचबरोबर विविध सेनापती, युद्धनेते व संरक्षण तत्त्वज्ञ यांच्या जीवनातून अनेक महत्त्वाचे धडे शिकणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन हे राष्ट्रीय सुरक्षिततेविषयक नवीन क्षेत्र प्रगत होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संघर्ष व्यवस्थापन हे जागतिक योगक्षेमाचे गमक आहे. सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील या आणि अशा विविध पैलूंचा परामर्श घेण्याचे उद्दिष्ट ज्ञानमंडळाने आपल्यापुढे ठेवले आहे.

आर्क्टिक परिषद (Arctic Council)

आर्क्टिक परिषद

आर्क्टिक परिषद हा आर्क्टिक देश, आर्क्टिक मूलनिवासी समुदाय आणि इतर आर्क्टिक रहिवासी यांच्यातील ‘शाश्वत विकास’ आणि ‘पर्यावरणीय संरक्षण’विषयक सहकार्याला आणि ...
आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग (Asia Africa Growth Corridor)

आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग

आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांमध्ये संपर्क आणि सहयोग वृद्धीसाठी तसेच खंडांतर्गत विकास साधता यावा यासाठी भारत आणि जपान यांनी ...
इंग्रज-शीख युद्ध, पहिले (First Anglo-Sikh War)

इंग्रज-शीख युद्ध, पहिले

भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्भवलेले दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी १८४५-४६ साली झालेले ...
इतिहासाचा अंत (End of History)

इतिहासाचा अंत

द नॅशनल इंटरेस्ट या परराष्ट्र धोरणासंबंधित नियतकालिकाच्या १९८९च्या उन्हाळी आवृत्तीत अमेरिकन नवरूढिवादी राज्यशास्त्रज्ञ फ्रान्सिस फुकुयामा यांनी लिहिलेला ‘इतिहासाचा अंत’ (एंड ...
इद्रिस हसन लतिफ (Idris Hassan Latif)

इद्रिस हसन लतिफ

लतिफ, इद्रिस हसन : ( ९ जून १९२३—३० एप्रिल २०१८). भारताचे भूतपूर्व हवाई दल प्रमुख. जन्म हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे. शिक्षण हैदराबादच्या निजाम ...
उच्च राजकारण (High Politics)

उच्च राजकारण

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या वास्तववादी दृष्टिकोनाचे समर्थक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उच्च राजकारण व निम्न राजकारण असे विभाजन करतात. राष्ट्राच्या सुरक्षिततेशी जोडलेल्या विषयांचा समावेश ...
उदारमतवाद (Liberalism)

उदारमतवाद

उदारमतवादाची गृहीतके : आंतरराष्ट्रीय संबंध हे अभ्यासाचे एक वेगळे क्षेत्र म्हणून उदयास येण्यापूर्वीच उदारमतवादी विचारधारा अस्तित्त्वात होती. १६८८ मध्ये इंग्लंडमध्ये ...
एरिख फोन मान्‌स्टाइन (Erich Von Manstein)

एरिख फोन मान्‌स्टाइन

मान्‌स्टाइन, एरिख फोन : (२४ नोव्हेंबर १८८७ ‒ ११ जून १९७३). जर्मन फील्डमार्शल. पूर्व प्रशियातील लेविन्स्की या खानदानी घराण्यात बर्लिन येथे जन्म. याची ...
एस. एम. श्रीनागेश (S. M. Srinagesh)

एस. एम. श्रीनागेश

श्रीनागेश, एस. एम. : (११ मे १९०३ ‒ २७ डिसेंबर १९७८). स्वतंत्र भारताचे दुसरे भूसेनाध्यक्ष. नायडू या लष्करी परंपरा असलेल्या ...
ओपेक (Opec)

ओपेक

पार्श्वभूमी : खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणारी ही एक बहुराष्ट्रीय संघटना आहे . तेरा सभासद देश असलेल्या  ‘ऑर्गनायझेशन ऑफ ...
ओम प्रकाश मलहोत्रा (Om Prakash Malhotra)

ओम प्रकाश मलहोत्रा

मलहोत्रा, ओम प्रकाश : (६ ऑगस्ट १९२२—२९ डिसेंबर २०१५ ). भारतीय भूसेनेचे भूतपूर्व सरसेनापती. जन्म श्रीनगर येथे. नोव्हेंबर १९४१ मध्ये ...
ओसामी नागानो (Osami Nagano)

ओसामी नागानो

नागानो, ओसामी : (१५ जून १८८०—५ जानेवारी १९४७). जपानी अ‍ॅड्‌मिरल. कोची येथे जन्म. नाविक अकादमी, स्टाफ कॉलेज व अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात ...
कनिष्क (Kanishka)

कनिष्क

कनिष्क : (कार. इ.स. ७८ ‒ १०१). कुशान वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागला. शुंग आणि ...
करम सिंग (Karam Singh)

करम सिंग

सिंग, लान्सनाईक करम : (१५ सप्टेंबर १९१५—२० जानेवारी १९९३). भारतीय लष्करातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म सेद्रना (जि ...
कांगावची लढाई (Battle of Kangaw)

कांगावची लढाई

पार्श्वभूमी : जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर हल्ला करून दुसऱ्या महायुद्धात आपला सहभाग नोंदविला होता. तोपर्यंत युरोप, रशिया आणि उत्तर ...
कारगिल युद्ध : १९९९ (Kargil War : 1999)

कारगिल युद्ध : १९९९

पार्श्वभूमी : १९४७, १९६५ आणि १९७१ या लढायांमध्ये काश्मीरला भारतापासून तोडण्याचे निष्फळ प्रयत्न पाकिस्तानने केले होते. १९८६ सालापासून सियाचीन हिमनदाच्या ...
कार्ल गुस्ताफ एमिल मानेरहेम (Carl Gustaf Emil Mannerheim)

कार्ल गुस्ताफ एमिल मानेरहेम

मानेरहेम, कार्ल गुस्ताफ एमिल :  (४  जून  १८६७ ‒ २७ जानेवारी १९५१). मार्शल, फिनलंडचा विख्यात राष्ट्रपती, सेनापती व  स्वातंत्र्ययुद्धनेता.  तुर्कू  येथे  एका उच्च  कुटुंबात जन्म. १९२० पर्यंत ...
कृष्णस्वामी सुंदरजी (Krishnaswami Sundarji)

कृष्णस्वामी सुंदरजी

सुंदरजी, जनरल कृष्णस्वामी : (३० एप्रिल १९२८‒९ फेब्रुवारी १९९९). भारताचे अकरावे सरसेनापती. जन्म चिंगलपुट (तमिळनाडू) येथे. त्यांनी बालपणापासूनच सुंदरजी हे नामाभिधान पतकरले. वडील अभियांत्रिक, तर माता ...
के. एम. करिअप्पा (K. M. Cariappa)

के. एम. करिअप्पा

करिअप्पा, कोदेंदेरा मडप्पा : (२८ जानेवारी १८९९–१५ मे १९९३). स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख. कर्नाटकातील मरकारा (कूर्ग) येथे जन्म. प्रारंभीचे ...
के. व्ही. कृष्ण राव (K. V. Krishna Rao)

के. व्ही. कृष्ण राव

राव, के. व्ही. कृष्ण : (१६ जुलै १९२३ —३० जानेवारी २०१६). भारताचे माजी भूसेनाध्यक्ष. जन्म लुकुलम (आंध्र प्रदेश) येथे. वडिलांचे ...