(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : स्नेहा खोब्रागडे
भौतिकीमध्ये प्रामुख्याने पदार्थांच्या स्थिती-गतीचा आणि त्यातील बदलांचा विचार केला जातो. तसेच पदार्थांच्या विविध गुणधर्मांचा शोध घेतला जातो. सदर कार्यकारणभावाच्या विवेचनातून या शास्त्राचा पाया घातला गेला. हा ज्ञानविकास होताना साधारणतः निरीक्षण ते सिद्धांत हे अनुक्रमे प्रारंभिक व अंतिम टप्पे मानले जातात. या दरम्यान निरीक्षणाबाबत उपपत्ती,प्रयोग, अनुमान असे टप्पे घेत हा प्रवास पूर्ण होतो. अर्थात प्रत्येक वेळेस अशाच मार्गाने भौतिकीमध्ये ज्ञानाची निर्मिती झाली असे मानण्याचे कारण नाही.

भौतिकीच्या प्रगतीत इतर विज्ञानाप्रमाणे, आधुनिक विज्ञान आणि प्राचीन विज्ञान असे दोन भाग पडतात. जगातल्या महत्वाच्या संस्कृतींनी भौतिकीबाबत विकसित विचार केल्याची उदाहरणे आढळतात. भारतीय संदर्भात खगोलशास्त्राचा विकास हा महत्वाचा टप्पा आहे. मात्र प्रयोग करून उपपात्तींची सत्यता तपासणे हा आधुनिक विज्ञानातला महत्वाचा घटक प्राचीन विज्ञानात अभावानेच आढळतो.
भौतिकी या विषयाचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. सैद्धांतिक –प्रायोगिक किंवा मुलभूत- उपयोजित असे याकडे बघता येईल.तसेच ज्या ज्या परिणामांचे स्पष्टीकरण शोधण्यात आले त्या प्रमाणे वर्गीकरण करता येईल. उदाहरणार्थ – विद्युतप्रवाहाचे परिणाम ‘ विद्युत चुंबकत्व’ या शाखेमध्ये अभ्यासले जातात तसेच पदार्थांच्या उष्माविषयक गुणधर्मांची चिकित्सा ‘उष्मा व उष्मागातीकी’ या शाखेत होऊ शकते. तसेच ज्या प्रकारे संकल्पनांचा विकास होत गेला त्या त्या संकल्पनांच्या विकासाचा मागोवा घेता येऊ शकतो. भौतिकीच्या ज्ञानमंडळातर्फे मूलभूत भौतिकी, उपयोजित भौतिकी, खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व विश्वरचनाशास्त्र या विषयांच्या नोंदी तयार करणे अपेक्षित आहे.

या अनुषंगाने सदर विषयाची खालील दहा उपविभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे.
१. स्थितीगतीशास्त्र व वस्तूचे गुणधर्म
२. तरंग व दोलन
३. उष्मा व उष्मागतीकी
४. ध्वनी
५. विद्युत चुंबकत्व
६.न्युक्लीय व कण भौतिकी
७. आण्विक व रेणूभौतिकी
८.घन अवस्था भौतिकी
९. प्रकाशकी
१०. आंतरशाखीय भौतिकी
११.खगोलशास्त्र व खगोलभौतिकी
१२..विश्वरचनाशास्त्र व सापेक्षता
१३.पुंज भौतिकी
अर्थातच या उपविभागांचे अजून उप-उपविभाग आहेत. ह्या रचनेचे बलस्थान हे की त्यामुळे तुकड्या- तुकड्यातील ज्ञानाचा एकसंधपणा अधोरेखित होतो. अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या अथक संघर्षामुळेच भौतिकीच्या ज्ञानशाखांचा हा व्यासंग आपल्याला शक्य होतो आहे. त्यांचे ऋण मनी ठेवत भौतिकी विषयाबाबत उत्सुकता बाळगणाऱ्या सर्व जिज्ञासू वाचकांचे ज्ञानमंडळातर्फे मनःपूर्वक स्वागत!.

अनिश्चिततेचे तत्त्व (Uncertainty Principle)

अनिश्चिततेचे तत्त्व

भौतिकीतील या तत्त्वानुसार इलेक्ट्रॉनासारख्या एखाद्या सूक्ष्म कणाचा स्थितीसहनिर्देशक (जागा निश्चित करणारा अंक) व संवेग (वस्तुमान × वेग)किंवा ऊर्जा आणि काल ...
अनुराधा नक्षत्र (Anuradha Constellation)

अनुराधा नक्षत्र

अनुराधा नक्षत्र : नक्षत्र चक्रातील अनुराधा हे 17 वे नक्षत्र आहे. वृश्चिक राशीत एकूण तीन नक्षत्रांचा समावेश आहे. अनुराधा, ज्येष्ठा ...
अँपिअरमापक (Ammeter)

अँपिअरमापक

(उपकरण). प्रत्यक्ष अँपिअर या एककात विद्युत् प्रवाह मोजणारा विद्युत् प्रवाहमापक म्हणजेच अँपिअरमापक होय. निरनिराळ्या मर्यादांच्या विद्युत् प्रवाहांकरिता व कमी-जास्त अचूकतेसाठी ...
अमावास्या (Amāvásyā)

अमावास्या

अमावास्या :                       ग्रहणाचे प्रकार चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक ...
अल्फा ऱ्हास (Alpha decay)

अल्फा ऱ्हास

( rays; particle; radiation). अल्फा ऱ्हास अथवा अल्फा किरणोत्सर्ग हा किरणोत्सर्गाचा एक प्रकार आहे. या किरणोत्सर्गाच्या प्रकारात अणुकेंद्रातून अल्फा कण, ...
अल्फा ऱ्हास सिद्धांत (Theory of Alpha decay)

अल्फा ऱ्हास सिद्धांत

(, ) अणुकेंद्रकातून अल्फा कण अथवा हीलियमचे अणुकेंद्रक उत्सर्जित होऊन होणाऱ्या अणुकेंद्रकाच्या ऱ्हासास अल्फा ऱ्हास म्हणतात. या ऱ्हासाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण ...
अश्विनी-भरणी नक्षत्र (Ashwini-Bharani Constellation)

अश्विनी-भरणी नक्षत्र

अश्विनी-भरणी नक्षत्र :                             मेषेचा नकाशा अश्विनी ...
आणवीय भौतिकी (Atomic Physics)

आणवीय भौतिकी

अणूचा आकार, त्याचे वजन, त्याची गती, अणूंमधील पारस्परिक क्रिया, अणूची संरचना व त्याच्याहून लहान अशा सूक्ष्मकणांचे म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ...
आणवीय वस्तुमान एकक (Atomic Mass Unit)

आणवीय वस्तुमान एकक

आणवीय वस्तुमान एकक हे अणु, अणुकेंद्रे आणि रेणूंची वस्तुमाने मोजण्यासाठी योजलेले खास एकक आहे. या एककाची संकल्पना डाल्टन याने 1802 ...
आयनिकवृत्त आणि वैषुविकवृत्त (Ecliptic and Celestial Equator)

आयनिकवृत्त आणि वैषुविकवृत्त

आयनिकवृत्त आणि वैषुविकवृत्त (Ecliptic and Celestial Equator) : आयनिकवृत्त पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. परंतु, पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्यच आकाशात पश्चिमेकडून पूर्वेकडे ...
आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती (Ecliptic Coordinate System)

आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती

आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती : आकाशगोलावरील वस्तूंच्या या स्थाननिर्देशक पद्धतीत ‘आयनिकवृत्त’ (Ecliptic) हे संदर्भ वर्तुळ आणि वसंत संपात बिंदू हा आरंभ ...
आर्किमिडीज तत्त्व (Archimedes Principle)

आर्किमिडीज तत्त्व

एखादा पदार्थ द्रायूत (द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात) बुडविला असता त्यावर खालून वर असे  एक बल लागू होते. त्याला उत्प्रणोदन (upthrust) असे ...
आर्द्रा नक्षत्र (Ardra Constellation)

आर्द्रा नक्षत्र

आर्द्रा नक्षत्र : आर्द्रा हे नक्षत्र चक्रातील सहावे नक्षत्र आहे. आर्द्रा आणि पुनर्वसू या दोन नक्षत्रांचा मिथुन (Gemini) राशीत अंतर्भाव ...
आश्लेषा नक्षत्र (Ashlesha Constellation)

आश्लेषा नक्षत्र

आश्लेषा नक्षत्र : आश्लेषा हे नक्षत्र-चक्रातील नववे नक्षत्र आहे. वासुकी म्हणजे हायड्रा (Hydra Constellation) या तारकासमूहात या नक्षत्रातील तारे येतात ...
उतरण (Inclined Plane)

उतरण

(नत प्रतल). यांत्रिक लाभ (कमी बल लावून जास्त वजन उचलले जाणे) देणारे हे एक सोपे साधन आहे. याचा उपयोग विशेषतः ...
उन्नतांश (Altitude)

उन्नतांश

उन्नतांश : उन्नतांश ( उन्नत+अंश = वरच्या दिशेने स्थानाची कोनात्मक उंची दर्शविणे). उन्नतांश हा क्षितिज किंवा स्थानिक सहनिर्देशक पद्धतीतील एक ...
ऊर्जा शोषण (Energy absorption)

ऊर्जा शोषण

विज्ञानामध्ये शोषण ही संज्ञा प्रामुख्याने वस्‍तुमानाचे शोषण आणि ऊर्जेचे शोषण (तरंगरूपी ऊर्जेचे) या दोन अर्थांनी वापरली जाते. रासायनिक प्रक्रिया उद्योगामध्ये ...
एडिसन परिणाम (Edison effect)

एडिसन परिणाम

तापायनिक उत्सर्जनाचे उदाहरण म्हणून या परिणामाकडे बघावे लागेल. एखाद्या निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यात तापणार्‍या तारेच्या वरच्या बाजूस काही अंतरावर एक ...
एन्ट्रॉपी (Entropy)

एन्ट्रॉपी

ऊष्मागतिकीची एक संकल्पना. एन्ट्रॉपी मोजण्यास साधी उपकरणे नाहीत, जशी तापमान किंवा दाब मोजण्यासाठी आहेत. एन्ट्रॉपीची संकल्पना ही ऊष्मागतिकीच्या नियमांवर आणि ...
कार्य, शक्ति व ऊर्जा (Work, Power and Energy)

कार्य, शक्ति व ऊर्जा

कार्य ही एक अदिश राशी (Scalar quantity) असून त्याची एकके अर्ग (Erg), फूट-पौंड (Foot-Pound) व जूल (Joule) ही आहेत. शक्तीचे ...