(प्रस्तावना) पालकसंस्था : के. जे. सोमैय्या भारतीय संस्कृतिपीठम्, विद्याविहार (पूर्व), मुंबई | समन्वयक : रूद्राक्ष साक्रीकर | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
भारताच्या समृद्ध संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे योग. आधुनिक काळामध्ये उत्तम स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी आसने, प्राणायाम आणि विविध क्रिया या स्वरूपात योगाचा जगभरात प्रसार झालेला असला तरी योगाचे मूळ प्राचीन वैभवशाली परंपरेत दडलेले आहे. योगाचे तत्त्वज्ञान आणि योगामधील मानसशास्त्र अगाध आहे, तर योगामधील विविध परंपरांचा विस्तार एखाद्या वटवृक्षाप्रमाणे प्रचंड आणि नित्य नूतन आहे. परिणामी योगाच्या परिभाषांना विस्तृत परिमाण लाभले आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ऐतिहासिक स्थळी उत्खनन केल्यानंतर ज्या प्रतिमा मिळाल्या, त्यापैकी काही प्रतिमांच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यावर त्यांचे योगातील मुद्रांशी साधर्म्य दिसून आले आहे. दर्शन म्हणून योगाचा उदय पतंजलीच्या काळात झाला असला, तरीही योगाच्या तत्त्वज्ञानाची बीजे वैदिक साहित्यात दिसून येतात. उपनिषदांमध्येही योगसाधना स्फुट रूपात विखुरलेली आहे. रामायण, महाभारत व पुराणे यामधील विविध आख्यानांच्या अनुषंगाने येणारी योगविषयक चर्चा अतिशय विस्तृत आहे. महाभारतातील भगवद्गीता व अन्य गीता यामध्ये योगतत्त्वज्ञान विस्ताराने सांगितले आहे. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षी पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे योगदर्शनाचा मूलभूत पाया आहेत व आजही ती प्रमाणभूत मानली जातात. योगासूत्रावरील भाष्ये, वार्त्तिक आणि विवरणात्मक अन्य ग्रंथांची संख्या अगणित आहे. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, सिद्धसिद्धान्त पद्धती यासारख्या ग्रंथांनी योगसाधनेचा मार्ग प्रशस्त केला. बौद्ध दर्शन तसेच जैन दर्शन यामध्ये साधनेच्या अनुषंगाने योगाचे विवेचन आढळते. वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत योगविषयक ग्रंथरचना पाहिल्यास एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की योगाचे ज्ञान हे केवळ ग्रंथांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये वर्णित साधना, उपासना आणि क्रिया यांद्वारे समाजात प्रचलित होते. आधुनिक काळातही प्रादेशिक भाषांमध्ये योगविषयक मौलिक साहित्याची निर्मिती झालेली आहे. योगाभ्यासाची उद्दिष्टे कालानुरूप बदलल्यामुळे योगाचे अनेक संप्रदाय उदयाला आले. विसाव्या शतकामध्ये अनेक योगधुरिणांनी योग-परंपरा पुनरुज्जीवित केली व त्यामुळे योगाभ्यासाला एक नवीन आयाम प्राप्त झाला.

सदर योगविषयक ज्ञानकोशाच्या माध्यमातून योगामध्ये अनुस्यूत असणाऱ्या सर्व विषयांचे ज्ञान वाचकाला प्राप्त होईल.

आलंबन

आलंबन

आलंबन या शब्दाचा सामान्य अर्थ म्हणजे ज्याच्या आश्रयाने वस्तू स्थिर राहते, ते स्थान होय. योगदर्शनामध्ये ‘ध्यान किंवा समाधीमध्ये चित्त ज्या ...
इंद्रियजय

इंद्रियजय

पातंजल योगसूत्राच्या विभूतिपाद या तिसऱ्या पादात ‘संयम’ या योगसाधनेची संकल्पना आढळते. धारणा, ध्यान व समाधी या अंतरंग योगाच्या तीनही अंगांचे ...
इंद्रिये

इंद्रिये

ज्ञानाचे किंवा कर्माचे साधन म्हणजे इंद्रिय होय. सांख्य आणि योग दर्शनांमध्ये एकूण तेरा इंद्रिये स्वीकारली आहेत. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये ही ...
ईश्वर (Ishwar)

ईश्वर (Ishwar)

योगमत हे आस्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे आहे. त्याला सेश्वर सांख्य म्हणतात. सांख्यदर्शन ईश्वर या विषयावर मौन बाळगते. परंतु, सांख्यांच्या ...
ईश्वरप्रणिधान (Ishvarapranidhana)

ईश्वरप्रणिधान (Ishvarapranidhana)

ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. योगसूत्रांमध्ये ‘ईश्वरप्रणिधानाद्वा|’ (पातञ्जल योगसूत्र  १.२३), ‘तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोग:|’ (पातञ्जल योगसूत्र  २.१) आणि ‘शौचसन्तोष तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा:|’ (पातञ्जल योगसूत्र  ...
उज्जायी प्राणायाम (Ujjayi Pranayama)

उज्जायी प्राणायाम (Ujjayi Pranayama)

हठयोगातील ग्रंथात आढळणाऱ्या प्राणायामांपैकी उज्जायी हा एक सुलभ प्राणायाम आहे. या प्राणायामाचे वैशिष्ट्य असे की यामध्ये इतर प्राणायामांपेक्षा बंधने कमी ...
उत्कटासन (Utkatasana)

उत्कटासन (Utkatasana)

उत्कटासन हे शरीर संवर्धनात्मक आसन आहे. कारण यामध्ये मांड्या व पोटऱ्यांवर ताण येऊन तेथील स्नायू सुदृढ बनतात. या आसनाची कृती ...
उपायप्रत्यय

उपायप्रत्यय

योग म्हणजे चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध होय. ज्यावेळी चित्तातील सर्व वृत्ती शांत होतात व चित्त निर्विचार अवस्थेला प्राप्त होते, त्यावेळी ...
उष्ट्रासन (Ustrasana)

उष्ट्रासन (Ustrasana)

एक आसन प्रकार. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकार उंटाप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला उष्ट्रासन असे म्हणतात. उष्ट्रासन कृती ...
ऋतंभरा प्रज्ञा

ऋतंभरा प्रज्ञा

ऋतंभरा या शब्दाची व्युत्पत्ती ‘ऋतं बिभर्ति’ अर्थात् वैश्विक सत्य धारण करते ती प्रज्ञा अशी आहे. वेदानुसार ऋत ही वैश्विक सत्याची ...
एस. एन. गोयंका (S. N. Goenka)

एस. एन. गोयंका (S. N. Goenka)

गोयंका, सत्यनारायण : (३० जानेवारी १९२४ — २९ सप्टेंबर २०१३). भारतातील विपश्यना संकल्पनेचे पुनर्प्रवर्तक, थोर आचार्य आणि एक प्रसिद्ध व्यापारी ...
कर्म

कर्म

सामान्यपणे ‘कर्म’ हा शब्द ‘शरीराद्वारे होणारी कोणतीही क्रिया’ या अर्थाने समजला जातो. परंतु, दर्शनांमध्ये कर्म हा शब्द विशेषत: चित्ताद्वारे होणाऱ्या ...
कर्माशय

कर्माशय

कर्म-सिद्धांत हा भारतीय दर्शनांमधील अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. या सिद्धांतानुसार जीव ज्याप्रकारचे कर्म करतो, त्यानुसार त्या कर्माचे फळ त्याला प्राप्त ...
कल्पिता (विदेहा) वृत्ति

कल्पिता (विदेहा) वृत्ति

कल्पिता वृत्तीचे दुसरे नाव विदेहा असे आहे. ‘वि-देहा’ म्हणजे देहाबाहेर मनाची स्थिती. ह्याच स्थितीला कल्पिता असेही म्हणतात. विदेहा ही संकल्पना ...
काल – योगदर्शनानुसार (Time – According to Yoga)

काल – योगदर्शनानुसार (Time – According to Yoga)

वर्तमान, भूत, भविष्य, तास, मिनिट, सेकंद, वर्ष, महिने, दिवस इत्यादी अनेक शब्दांद्वारे आपण काळाविषयी व्यवहार करीत असतो. ‘काल’ या तत्त्वाविषयी ...
कुक्कुटासन (Kukkutasana)

कुक्कुटासन (Kukkutasana)

एक आसनप्रकार. कुक्कुट म्हणजे कोंबडा. या आसनामध्ये शरीराची अंतिम स्थिती कोंबड्याप्रमाणे दिसते, म्हणून या आसनाला कुक्कुटासन असे म्हणतात. कृती : ...
कुंडलिनी (Kundalini)

कुंडलिनी (Kundalini)

हठयोगात कुंडलिनी शक्तीला आत्यंतिक महत्त्व आहे. घेरण्डसंहिता आणि हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये कुंडलिनी शक्तीचे वर्णन आढळते. कुंडलिनी शक्तीची ईश्वरी, कुंडली, बालरंडा, ...
कूर्मासन (Kurmasana)

कूर्मासन (Kurmasana)

एक आसनप्रकार. कूर्म म्हणजे कासव. या आसनामध्ये शरीराची अंतिम स्थिती कासवासारखी दिसते म्हणून या आसनाला कूर्मासन असे म्हणतात. कृती : ...
केवली प्राणायाम (Kevali Pranayama)

केवली प्राणायाम (Kevali Pranayama)

घेरण्डसंहितेत निर्दिष्ट केलेल्या आठ प्रकारच्या कुंभकांपैकी ‘केवलकुंभक’ हा शेवटचा व प्रमुख कुंभक होय. केवलकुंभक म्हणजेच केवली प्राणायाम. तो ‘पूरक-रेचका’शिवाय होतो, ...
कैवल्य

कैवल्य

दर्शनाचा उगम दु:खाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी या हेतूने झाला आहे. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात रोग, रोगाचे कारण, रोगाचा नाश आणि रोग नष्ट ...