(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
जीवशास्त्र/जीवविज्ञान या विज्ञानशाखेत सर्व जीवांसंबंधीच्या संपूर्ण माहितीचे संकलन आणि त्या माहितीचा व्यावहारिक उपयोग करण्यासंबंधीचे मार्गदर्शन यांचा अंतर्भाव होतो. मनुष्यासह सर्व जीवांविषयी संपूर्ण ज्ञान मिळविणे हे जीवविज्ञानाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ही विज्ञानशाखा सर्व विज्ञानशाखांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अधिक विशिष्ट, सखोल व चिकित्सापूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने जीवविज्ञानाची अनेक उपविभाग व शाखा यांमध्ये वर्गवारी केली जाते. या प्रत्येक शाखेत प्राणी वा वनस्पती यांचा भिन्न दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासाची माहिती अनुक्रमे ‘वनस्पतिविज्ञान’ आणि ‘प्राणिविज्ञान’ या दोन प्रमुख मोठ्या शाखांमध्ये दिली जाते. शाखाविस्तार लक्षात घेऊन वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांची स्वतंत्र ज्ञानमंडळे तयार करण्यात आली आहेत. ‘जीवशास्त्र-प्राणिविज्ञान’ या ज्ञानमंडळांतर्गत प्राणिविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

प्राण्यांचा सर्वांगीण अभ्यास केल्या जाणाऱ्या प्राणिविज्ञान या विज्ञानशाखेच्या शारीर, शरीरक्रियाविज्ञान, आकारविज्ञान, कोशिकाविज्ञान, प्राणिभूगोल इत्यादी विविध उपशाखा आहेत. या उपशाखांच्या अनुषंगाने विविध अभ्यासपद्धतींचा अवलंब केला जातो. मानवी वैद्यक, पशुवैद्यक, सार्वजनिक आरोग्य, कृषिविज्ञान, प्राणिजातींचे संरक्षण व संवर्धन ह्या सर्वांसाठी प्राणिविज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सूक्ष्मजीवांची ओळख, त्यांचे वर्गीकरण, संरचना व कार्य तसेच सूक्ष्मजीवांचा इतर सृष्टीवर होणारा परिणाम इत्यादींचा अभ्यास सूक्ष्मजीवविज्ञान या शाखेत केला जातो. सूक्ष्मजंतुविज्ञान, आदिजीवविज्ञान, विषाणुविज्ञान या सूक्ष्मजीवविज्ञानाच्या प्रमुख उपशाखा आहेत. चयापचय, प्रकाशसंश्लेषण, जनुकक्रिया इत्यादींसारख्या मूलभूत जैव प्रक्रियांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांना मूलभूत प्रायोगिक साधन म्हणून मुख्यत सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो.

जीवरसायनशास्त्र हे जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान या विषयांशी निगडित असलेले शास्त्र असून त्यामध्ये सजीव घटकांच्या रासायनिक विश्लेषण व रासायनिक स्थित्यंतर यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सजीव सृष्टीचा अभ्यास करताना या शास्त्रातील नवनवीन संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. जैवतंत्रज्ञान ही वेगाने विकसित होत असलेली आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे. यात सजीवांमधील जैविक तत्त्वे आणि प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जाते. रेणू पातळीवर आधारित असलेले हे शास्त्र मुख्यत्वेकरून कृषि, आरोग्य व पर्यावरण या विज्ञानशाखांशी संबंधित आहे. या शाखांशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे क्रांतिकारक बदल घडून येत आहेत. एकूणच मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी या सर्व विषयांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. यासाठी जीवशास्त्र-प्राणिविज्ञान या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून या ज्ञानशाखांची माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

 अंत:प्रजनन / अंतर्जनन (Inbreeding)

 अंत:प्रजनन / अंतर्जनन

प्रजनन ही सर्व सजीवांमधील एक मूलभूत जीवनप्रक्रिया आहे. बहुतेक सजीवांमध्ये प्रजनन आणि प्रजोत्पादन हे दोन्ही शब्द समानार्थी वापरले आहेत. प्रजनन ...
अकालजनन (Heterochrony / Heterochronism)

अकालजनन

शावकरूपजनन (Paedomorphosis) ही काही उभयचर प्राण्यांमध्ये आढळून येणारी एक अवस्था. यास अकालजनन असेही म्हणण्याची पद्धत आहे. या प्रकारात सामान्य वयात  ...
अजगर (Python)

अजगर

सरीसृप वर्गातील स्क्वॅमाटा गणातील पायथॉनिडी (Pythonidae) कुलात अजगराचा समावेश होतो. हा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प (साप) आहे. तो मुख्यत्वेकरून आशिया, ...
अंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum)

अंतर्द्रव्य जालिका

दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये (Eukaryotic cells) आढळून येणारे अंतर्द्रव्य जालिका हे एक पेशीअंगक (Cell organelle) आहे. परस्परांना जोडलेल्या अनेक सूक्ष्म पोकळ नलिका ...
अधश्चेतक (Hypothalamus)

अधश्चेतक

अधश्चेतक ग्रंथी (अधोथॅलॅमस) अंत:स्त्रावी ग्रंथी-प्रणालीचा (Endocrine system) मध्यबिंदू मानली जाते. ही ग्रंथी चेतासंस्था (Nervous system) व अंत:स्त्रावी ग्रंथी-प्रणाली यांच्यामधील दुवा म्हणून ...
अँफिऑक्सस (Amphioxus / Lancelet)

अँफिऑक्सस

रज्जुमान (Chordata) संघातील ज्या प्राण्यांच्या डोक्याकडील भागात मेरूरज्जू असतो, त्याचा सेफॅलोकॉर्डेटा उपसंघ बनवला आहे. या उपसंघात अँफिऑक्सस या प्राण्याचा समावेश ...
अमीबा (Amoeba)

अमीबा

सगळ्या जिवंत प्राण्यांत अगदी साधी शरीररचना असणारा हा प्राणी आहे. आधुनिक वर्गीकरणानुसार दृश्यकेंद्रकी अधिक्षेत्रामधील (Eukaryotic Domain) अमीबोझोआ संघातील (Amoebozoa Phylum) ...
अलर्क रोग  (Rabies diseases)

अलर्क रोग  

मध्यवर्ती मज्जासंस्थेचा एक असाध्य विषाणुजन्य रोग. हा रोग लासाव्हायरस (Lyssavirus) या विषाणूमुळे होतो. या विषाणूचा समावेश मोनोनिगॅव्हायरॅलीज् (Mononegavirales) या गणातील ...
अवशेषांगे (Vestigial organs)

अवशेषांगे 

सजीवाच्या उत्क्रांतीमध्ये कमी विकसित किंवा कार्यक्षमता कमी झालेल्या शरीरातील काही अवयवांना अवशेषांगे (Vestigial organs) म्हणतात. लॅटिन भाषेमध्ये vestigium म्हणजे वाळूतून ...
अवस्वनिक ध्वनी संप्रेषण  (Infrasound communication / subsonic communication)

अवस्वनिक ध्वनी संप्रेषण

अधिवासातील नैसर्गिक घटकांची माहिती मिळवणे व ती आपल्या प्रजातीमधील अन्य सजीवांपर्यंत पोहोचवणे या क्रिया सजीवांना टिकाव धरण्यासाठी आवश्यक असतात. विशिष्ट ...
असिपुच्छ मासा (Green swordtail Fish)

असिपुच्छ मासा

या माशाचा समावेश सायप्रिनोडोन्टीफॉर्मिस (Cyprinodontiformes) गणातील पॉइसिलीडी (Poeciliidae) कुलात होतो. त्याच्या शेपटीला असलेल्या तलवारीसारख्या विस्तारामुळे ह्याला असिपुच्छ मासा असे म्हटले ...
अस्थिमत्स्य (Osteichthyes)

अस्थिमत्स्य

ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल हाडांनी म्हणजे अस्थींनी बनलेला असतो, त्यांना अस्थिमत्स्य (Osteichthyes Or Bony fish) असे म्हणतात. मत्स्य अधिवर्गाचा अस्थिमत्स्य ...
आंधळा साप / वाळा (Blind Snake)

आंधळा साप / वाळा

आंधळा साप (इंडोटिफ्लॉप्स ब्रॅमिनस) आंधळा साप : खवल्यांनी झाकलेले डोळे. हा साप सरीसृप (Reptilia) वर्गाच्या स्क्वामाटा (Squamata) गणातील टिफ्लोपिडी (Typhlopidae) ...
आर्गली (Argali)

आर्गली

पृष्ठवंशी संघातील स्तनी (mammalia) वर्गाच्या खुरी अधिगणाच्या समखुरी गणातील (Artiodactyla) सर्वांत मोठी वन्य मेंढी आहे. हिचे शास्त्रीय नाव ओव्हिस ॲमॉन (Ovis ...
आर्डवुल्फ (Aardwolf)

आर्डवुल्फ

हा मांसाहारी (Carnivora) गणातील आफ्रिकेत आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो हायानिडी (Hyaenidae) कुलातील प्रोटिलीनी (Protelinae) उपकुलात अस्तित्वात असलेला एकमेव प्राणी ...
आर्डव्हॉर्क (Aardvark)

आर्डव्हॉर्क

आर्डव्हॉर्क (ओरिक्टेरोपस ॲफर) या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या ट्युबिलिडेंटाटा (Tubulidentata)गणातील ओरिक्टेरोपोडिडी (Orycteropodidae) या कुलात होतो. या कुलातील आर्डव्हॉर्क ही एकमेव ...
आहारातील आवश्यक खनिजे (Essential minerals in the diet)

आहारातील आवश्यक खनिजे

शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी खनिजांची आवश्यकता असते. हाडे आणि दात यांच्या निर्मितीमध्ये, शरीरातील आवश्यक द्रव्यांमध्ये, ऊतींमध्ये तसेच अनेक विकर ...
इग्वाना (Iguana)

इग्वाना

पृष्ठवंशी संघाच्या सरीसृप वर्गाच्या (Reptilia) स्क्वॅमाटा-सरडा (Squamata-Lijzard) गणातील इग्विनिआ (Iguania) उपगणातील इग्वानिडी (Iguanidae) कुलातील सरड्यासारखा दिसणारा परंतु, त्याच्यापेक्षा मोठा प्राणी ...
उत्परिवर्तके : जैविक (Biological mutagens)

उत्परिवर्तके : जैविक

जैविक उत्परिवर्तके हा जनुकाच्या संरचनेत किंवा डीएनए क्रमामध्ये होणारे बदल घडवणाऱ्या घटकांचा एक प्रकार आहे. भौतिक उत्परिवर्तके आणि रासायनिक उत्परिवर्तके हे ...
उत्परिवर्तके : भौतिक (Physical mutagens)

उत्परिवर्तके : भौतिक

उत्परिवर्तक : प्रकार ज्या नैसर्गिक किंवा कृत्रिम घटकामुळे जनुकाच्या संरचनेत किंवा त्याच्या क्रमात किंवा डीएनएमध्ये  बदल/उत्परिवर्तन घडून येते अशा घटकांना ...