
प्रतिपक्षभावन (Pratipaksha bhavana)
ज्यावेळी चित्तामध्ये अहिंसा इत्यादी यमांच्या साधनेला प्रतिकूल विचार उत्पन्न होतो त्यावेळी त्या विचाराला छेद देणाऱ्या सकारात्मक विषयावर ध्यान करणे याला ...

प्रत्यय (Knowledge)
सर्वसामान्यपणे मराठीमध्ये प्रत्यय या शब्दाचा अर्थ ‘जाणीव’ असा होतो. परंतु, योगदर्शनानुसार चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यय होय ...

प्रत्याहार (Pratyahara)
‘प्रत्याहार’ या शब्दाची फोड प्रति + आ + हृ अशी आहे. ‘हृ’ या धातूचा अर्थ ‘हरण करणे’ असा आहे. प्रति ...

प्रमाण (Valid knowledge)
‘प्रमा’ म्हणजे यथार्थ ज्ञान व ज्या साधनाद्वारे ज्ञान प्राप्त होते त्याला ‘प्रमाण’ असे म्हणतात. योगदर्शनानुसार कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी चित्ताची ...

प्राण (योगविज्ञान)
प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे पाच प्रमुख प्राण तसेच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण मानवी ...

प्रातिभ (ज्ञान)
विश्वातील सर्व वस्तूंचे योग्याला होणारे ज्ञान म्हणजे प्रातिभ ज्ञान होय. हे प्रातिभ ज्ञान योग्याला विवेकख्यातीच्या अनुषंगाने विनासायास होते, त्यासाठी कोणतेही ...

बंध
अविद्येमुळे चैतन्यस्वरूप पुरुष (आत्मा) चित्ताशी तादात्म्याचा अनुभव करतो व स्वत:ला चित्ताद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा कर्ता समजतो. या कर्तृत्वाच्या अभिमानामुळे ...

ब्रह्मचर्य (Celibacy)
पतंजलींनी अष्टांगयोगात प्रतिपादन केलेल्या पाच यमांपैकी ब्रह्मचर्य हा चवथा यम आहे (अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा:| योगसूत्र २.३०). ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांवरील संयम. व्यासभाष्यात ...

भूतजय
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच महाभूतांवर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे भूतजय नावाची सिद्धी होय. ‘भूत’ या शब्दाचा ...

मकरासन (Makarasana)
एक आसनप्रकार. ‘मकर’ या शब्दाचा अर्थ मगर. ज्याप्रमाणे मगर पाण्यातून बाहेर येऊन किनाऱ्यावरील वाळूत पोटावर शांत पडून राहते, त्याप्रमाणे या ...

मंत्रयोग (Mantra Yoga)
मंत्रसाधनेद्वारे अंतिम सत्याची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हणजे मंत्रयोग होय. नाम व रूप याद्वारे व्यक्त होणाऱ्या शब्द आणि भाव यांवर ...

मुद्रा (Mudra)
मुद्रा ह्या शब्दाचे सामान्य अर्थ चिह्नांकित खूण, नाव कोरलेली अंगठी, मोहरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारा शिक्का वा तत्सम वस्तू असे बरेच ...

योग दर्शन (Yoga Darsana)
योग दर्शन हे भारतीय दर्शनांच्या परंपरेतील वेदांना प्रमाण मानणाऱ्या सहा प्रमुख आस्तिक दर्शनांपैकी एक दर्शन आहे. ‘दृश्यते अनेन इति दर्शनम्’ ...

योगचूडामणि उपनिषद् (Yogachudamani upanishad)
योगचूडामणि हे योगशास्त्रातील एक महत्त्वाचे उपनिषद् आहे. ते सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात १२१ श्लोक असून बह्वंशी भाग पद्यात आणि ...

योगशास्त्रानुसार मौनाचे प्रकार
महर्षि पतंजलींनी योगशास्त्रात नियमांचा उल्लेख योगाचे एक अंग म्हणून केला आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान यांचा अंतर्भाव नियमांत होतो ...

योगशिखा-उपनिषद्
योगशिखा-उपनिषद् (योगशिखोपनिषद्) हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् पद्य शैलीत असून योगविषयक उपनिषदांमध्ये त्याची गणना केली जाते. प्रस्तुत उपनिषदामध्ये गुरू (महेश्वर) आणि ...

योगसारसंग्रह
योगसारसंग्रह हा आचार्य विज्ञानभिक्षूंनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यांनी लिहिलेल्या योगवार्त्तिक या व्यासभाष्यावरील विस्तृत टीकेनंतर योगमताचे सार म्हणून योगसारसंग्रह हा ग्रंथ ...

राग (Attachment)
राग म्हणजे ‘आसक्ती’ होय. मराठीमध्ये राग या शब्दाचा अर्थ ‘क्रोध’ असा होतो, परंतु संस्कृतमध्ये प्रिय वस्तूंप्रति असणारी आसक्ती म्हणजे राग ...

विकल्प (Vikalpa)
योगदर्शनानुसार चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी विकल्प ही एक प्रकारची वृत्ती आहे. विकल्प या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ ‘पर्याय’ असा आहे. परंतु, योगशास्त्रात ...

विक्षेप-सहभू (Factors accompaning distraction)
महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (योगसूत्र १.३०) योगाभ्यासात येणारी नऊ विघ्ने सांगितली आहेत. या विघ्नांना त्यांनी अंतराय अशी संज्ञा वापरली आहे ...