(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे. त्याची आज जागतिक स्तरावरही दखल घेतली जाते. हे शास्त्र जीवनविषयक आणि आरोग्यविषयक; कफ, वात, पित्त यांसारख्या मूलभूत सिद्धांतांवर आधारित आहे. आयुर्वेदाचा परिचय करून घेण्याकरिता या सिद्धांतांची ओळख होणे आवश्यक असते. याचबरोबर आयुर्वेदाची विशिष्ट अशी ‍चिकित्सा आणि उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये विविध औषधी वनस्पती, प्राणिज पदार्थ, खनिज पदार्थ आणि विविध प्रक्रियांद्वारे निर्माण केलेल्या औषधांचा उपयोग केला जातो. संगणकाचा वापर सुरू झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये प्रकृती परिक्षण, आयुर्वेदीय निदान, आयुर्वेदीय चिकित्सा याविषयांवर सॉफ्टवेअर निर्मितीचे प्रयोग केले. याचबरोबर नाडी परीक्षेसारख्या आयुर्वेदाच्या विशिष्ट परिक्षणासाठी विविध उपकरणांची निर्मिती केली आहे. आयुर्वेदाच्या आधुनिक पद्धतींनी अभ्यास करण्यासाठी Ayurgenomics, Ayurvedic Biology, Traditional Knowledge Digital Library (TKDL) आदी ज्ञानशाखांचा विकास झालेला आहे.

आयुर्वेद ज्ञानमंडळामध्ये आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांत, चिकित्सा व उपचार पद्धती त्याचबरोबर महत्त्वाचे उपयोजन, आयुर्वेदाच्या अभ्यासाची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत, महत्त्वाचे ग्रंथ इत्यादींचा परिचय करून दिला जाईल. याचबरोबर आयुर्वेद ही औषध पद्धती बरोबर जीवन पद्धती म्हणूनही विकसित झाल्याने त्यातील अनेक शब्द बोलीभाषेतही वापरले जातात. त्यांचा बोलीभाषेतील अर्थ आणि आयुर्वेदातील शास्त्रीय अर्थ वेगळा असतो. त्याचबरोबर वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक, विविध वाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींमध्ये आयुर्वेदाबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती दिली जाते. या लेखनामध्ये जे शब्द वारंवार वापरले जातात अशा शब्दांचा मूलभूत शास्त्रीय अर्थ देणाऱ्या नोंदींचाही अंतर्भाव या ज्ञानमंडळात केला आहे.

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस (National Ayurveda Day)

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस

आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला ...
रौप्य/रजत भस्म (Raupya/Rajat Bhasma)

रौप्य/रजत भस्म

रौप्य भस्म हे आयुर्वेदात वापरले जाणारे महत्त्वाचे औषध आहे. चांदीला संस्कृतमध्ये रौप्य, रजत, रूप्यक, तारा, पांढरा, वसुत्तम, रुप्य, चंद्रहास तर ...
वातदोष (Vata Dosha)

वातदोष

शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे वात. वातालाच वायू असेही म्हणतात. वात आवश्यक प्रमाणात शरीरात असताना शरीरातील विविध व्यापार सुरळीत ...
विपाक (Vipaka-Ayurveda)

विपाक

विपाक ही आयुर्वेदातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. अन्न व औषधे कशाप्रकारे कार्य करतात हे सांगण्यासाठी विपाक सांगितले आहेत. खाल्लेल्या अन्नावर ...
विरेचन (Virechan)

विरेचन

विरेचन हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. विरेचन म्हणजे विशेष प्रकारचे रेचन अर्थात शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धी करणे ...
वीर्य

वीर्य हा शब्द सामर्थ्य, पराक्रम, शक्ती, पुरुषामधील शुक्र (Semen) या अर्थांनी वापरला जातो. औषधांच्या संदर्भात ‘ज्याच्यामुळे वनस्पती किंवा औषधी आपले ...
व्यायाम (Physical Exercise)

व्यायाम

व्यायाम म्हणजे शरीराची अशी विशिष्ट हालचाल जी केल्यामुळे शरीराचे बल वाढते व सोबतच शरीराचे संतुलन साधले जाते. व्यायामाचे हे लाभ ...
शुक्रधातु (Shukra Dhatu)

शुक्रधातु

आयुर्वेदानुसार शरीरातील सात धातूंपैकी हा शेवटचा धातू. आहारापासून सर्वप्रथम रसधातूची व यानंतर क्रमाक्रमाने पुढील धातूंची निर्मिती होते. यानुसार अस्थिधातूपासून शुक्रधातूची ...
षट्क्रियाकाल (Shatkriyakala)

षट्क्रियाकाल

आयुर्वेद शास्त्रानुसार दोष, धातु आणि मल यांची शरीरातील विषमता म्हणजे शरीरामध्ये त्यांचे प्रमाण वाढणे अथवा कमी होणे किंवा त्यांच्यामध्ये काही ...
षड्रस चिकित्सा

रस म्हणजे चव होय. आयुर्वेदानुसार रसना म्हणजे जीभ. जीभ या इंद्रियाने ज्या अर्थाचे (विषयाचे) ज्ञान होते त्याला रस म्हणतात. रस ...
सारता

सारत म्हणजे धातुघटकांच्या ऊतकांचे उत्तम बल, त्यांचे योग्यप्रमाण व गुणवत्ता होय; तर सारता म्हणजे धातूंची विशुद्धता होय. आयुर्वेदशास्त्राने नेहमीच शरीरातील ...
सुवर्ण भस्म (Swarna Bhasma)

सुवर्ण भस्म

सुवर्ण भस्म हे आयुर्वेदात वापरले जाणारे महत्त्वाचे औषध आहे. आयुर्वेदामध्ये विविध मौल्यवान धातू, उपधातू तसेच रत्नांचा वापर औषधी स्वरूपात केला ...
सुवर्णप्राशन (Suvarnaprashan)

सुवर्णप्राशन

सुवर्ण म्हणजे सोने. प्राशन करणे म्हणजे पिणे अथवा पाजणे. सुवर्ण प्राशनाचा अंतर्भाव लेहन या प्रकारात होतो. लेहन म्हणजे चाटवणे. काश्यपसंहितेनुसार ...
सूतिकागार

अपरापतनानंतर म्हणजेच वार पडून गेल्यानंतर प्रसव प्रक्रिया पूर्ण होते, त्यानंतर त्या स्त्रीला सूतिका असे संबोधले जाते. पूर्वी योग्य प्रसव होण्यासाठी ...
सोमरोग (Som rog)

सोमरोग

शरीरामध्ये असणाऱ्या आप धातूला सोम असे म्हणतात. सोम म्हणजे पांढरा तसेच सोम म्हणजे चंद्र. चंद्र हे तेजाचे प्रतीक आहे. म्हणूनच ...
स्त्रोतस

आयुर्वेदातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना. याला रसायनी, नाडी, पंथ, मार्ग, शरीर छिद्र, संवृत, असंवृत, स्थान, आशय आणि निकेत असे पर्यायी शब्द ...
स्नेहन (Snehan-Ayurveda)

स्नेहन

स्नेहन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची तांत्रिक प्रक्रिया आहे व वाढलेला वातदोष कमी करण्याचीही प्रक्रिया आहे. स्नेह म्हणजे स्निग्धपदार्थ. ज्यामुळे शरीराला ...
स्वेदन (Swedan-Ayurveda)

स्वेदन

‘स्वेदन’ ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची, स्नेहनानंतर करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया आहे. तसेच वातदोष आणि कफदोष ह्यांनी होणाऱ्या रोगांमधे चिकित्सा म्हणून ...
Loading...