(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे. त्याची आज जागतिक स्तरावरही दखल घेतली जाते. हे शास्त्र जीवनविषयक आणि आरोग्यविषयक; कफ, वात, पित्त यांसारख्या मूलभूत सिद्धांतांवर आधारित आहे. आयुर्वेदाचा परिचय करून घेण्याकरिता या सिद्धांतांची ओळख होणे आवश्यक असते. याचबरोबर आयुर्वेदाची विशिष्ट अशी ‍चिकित्सा आणि उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये विविध औषधी वनस्पती, प्राणिज पदार्थ, खनिज पदार्थ आणि विविध प्रक्रियांद्वारे निर्माण केलेल्या औषधांचा उपयोग केला जातो. संगणकाचा वापर सुरू झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये प्रकृती परिक्षण, आयुर्वेदीय निदान, आयुर्वेदीय चिकित्सा याविषयांवर सॉफ्टवेअर निर्मितीचे प्रयोग केले. याचबरोबर नाडी परीक्षेसारख्या आयुर्वेदाच्या विशिष्ट परिक्षणासाठी विविध उपकरणांची निर्मिती केली आहे. आयुर्वेदाच्या आधुनिक पद्धतींनी अभ्यास करण्यासाठी Ayurgenomics, Ayurvedic Biology, Traditional Knowledge Digital Library (TKDL) आदी ज्ञानशाखांचा विकास झालेला आहे.

आयुर्वेद ज्ञानमंडळामध्ये आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांत, चिकित्सा व उपचार पद्धती त्याचबरोबर महत्त्वाचे उपयोजन, आयुर्वेदाच्या अभ्यासाची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत, महत्त्वाचे ग्रंथ इत्यादींचा परिचय करून दिला जाईल. याचबरोबर आयुर्वेद ही औषध पद्धती बरोबर जीवन पद्धती म्हणूनही विकसित झाल्याने त्यातील अनेक शब्द बोलीभाषेतही वापरले जातात. त्यांचा बोलीभाषेतील अर्थ आणि आयुर्वेदातील शास्त्रीय अर्थ वेगळा असतो. त्याचबरोबर वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक, विविध वाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींमध्ये आयुर्वेदाबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती दिली जाते. या लेखनामध्ये जे शब्द वारंवार वापरले जातात अशा शब्दांचा मूलभूत शास्त्रीय अर्थ देणाऱ्या नोंदींचाही अंतर्भाव या ज्ञानमंडळात केला आहे.

अगदतंत्र / विषतंत्र (Toxicology & forensic medicine)

अगदतंत्र / विषतंत्र

विषतंत्राला आयुर्वेदीय परिभाषेत ‘अगदतंत्र’ असे म्हटले आहे. अगद म्हणजे ‘विषनाशन’ होय.  अशाप्रकारे विष आणि त्यांची औषधे इत्यादींचे अभ्यास करणारे शास्त्र ...
अगस्त्य हरितकी (Agastya Haritaki)

अगस्त्य हरितकी

अगस्त्य हरितकी हे आयुर्वेदातील श्रेष्ठ रसायन कल्प असून महर्षी अगस्त्य यांनी प्रतिपादित केलेले एक अवलेह कल्प आहे. हे औषध मुख्यत: ...
अग्नि (आयुर्वेद) Agni (Ayurveda)

अग्नि

एक शारीर घटक (तत्त्व). शरीरात बाह्य पदार्थ आल्यानंतर शरीर घटकांशी ते आत्मसात व्हावे म्हणून त्याचे पचन करण्याचे काम अग्नी तत्त्व ...
अभयारिष्ट (Abhayarishta)

अभयारिष्ट

अभयारिष्ट हे आयुर्वेदातील पारंपरिक अरिष्ट प्रकारचे द्रवरूप औषध आहे. या औषधाचा उपयोग प्रामुख्याने पचनासंबंधीच्या समस्यांमध्ये केला जातो. घटक : ‘अभया’ ...
अरविंदासव (Aravindasava)

अरविंदासव

अरविंदासव हे आयुर्वेदातील आसव प्रकारातील द्रवरूप औषध आहे. हे प्रामुख्याने बालकांसाठी शक्तीवर्धक औषध (Tonic) म्हणून उपयुक्त आहे. यास ‘बालपोषक आसव’ ...
अस्थिधातु (Asthi Dhatu)

अस्थिधातु

शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. धातू पोषण क्रम विचारात घेतल्यास, एकूण सात धातूंपैकी अस्थीधातू हा पाचव्या ...
आचार रसायन

आचार म्हणजे आचरण व रसायन म्हणजे उत्तम दर्जाचे, गुणवत्तेचे शरीर घटक आणि धातू उत्पत्तीसाठीची विशेष चिकित्सा होय. वास्तविक पाहता रसायन ...
आम

आम ही आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. आम याचा शब्दश: अर्थ अर्धवट पचलेले किंवा कच्चे असा आहे. शरीराचे पोषण होण्यासाठी घेतलेल्या ...
आयुष : चिकित्सा प्रणाली (Ministry of AYUSH)

आयुष : चिकित्सा प्रणाली

आयुष चिकित्सा प्रणाली अंतर्गत भारतीय चिकित्सा पद्धतींचा समावेश होतो. प्रामुख्याने आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या शास्त्रांमधील अभ्यासक्रम ...
आसव-अरिष्ट (Asava Arishta)

आसव-अरिष्ट

औषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक ...
उत्तरबस्ती (Uttarbasti)

उत्तरबस्ती

एक उपचार पद्धती. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाने व अपत्यमार्गाने, तर पुरुषांमध्ये मूत्रमार्गाने दिल्या जाणाऱ्या बस्तीस उत्तरबस्ती असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये उत्तरबस्ती हा शब्दप्रयोग ...
ऋतुचर्या (Ritucharya)

ऋतुचर्या

व्यक्तीला स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने आहार आणि विहार यांचे योग्य पालन करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. हे नियम देश, काल, ...
औषध सेवन काल (Time of Drug administration)

औषध सेवन काल

कोणत्याही रोगाची चिकित्सा करताना औषधांच्या निवडी इतकेच औषध घेण्याच्या वेळेला महत्त्व आहे. त्यालाच ‘औषध सेवन काल’ किंवा ‘भेषज काल’ असे ...
औषधीय खनिज : अभ्रक (Medicinal Mineral : Mica)

औषधीय खनिज : अभ्रक

अभ्रक हे आयुर्वेद महारसातील महत्त्वाचे खनिज आहे. इ. स. पू. ४ थ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रात वज्राभ्रक नावाने अभ्रकाचा उल्लेख आढळतो ...
कफदोष (Kapha Dosha)

कफदोष

शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे कफ. कफाला श्लेष्मा असेही म्हणतात. कफ आवश्यक प्रमाणात शरीरात असताना शरीरातील व्यापार सुरळीत चालण्यास ...
कर्णपूरण (Karna Purana)

कर्णपूरण

कर्ण म्हणजे कान व पूरण म्हणजे भरणे. कानात एखादे पातळ औषध किंवा औषधीयुक्त तेल टाकण्याच्या क्रियेला कर्णपूरण म्हणतात. यास कर्णतर्पण ...
गंडूष व कवल (Gandusha and Kaval)

गंडूष व कवल

गंडूष म्हणजे तोंडात औषध धरून ते न गिळता केली जाणारी उपचारात्मक क्रिया. गंडूषासोबत कवल या क्रियेचा विचार ग्रंथांत नेहमी एकत्रितपणे ...
गुण

सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट लक्षण असते ज्यामुळे आपल्याला त्या वस्तूच्या स्वरूपाचे किंवा त्याच्या कामाचे ज्ञान होते. वस्तूच्या या विशिष्ट ...
जारण

आयुर्वेदात विविध धातूंचा उपयोग औषधी स्वरूपात केला जातो. हे धातू वेगवेगळ्या पद्धतींनी शुद्ध करून ते शरीरात कुठल्याही प्रकारची हानी उत्पन्न ...
ताम्र भस्म (Tamra Bhasma)

ताम्र भस्म

ताम्र भस्म हे ताम्र (तांबे) या धातूपासून आयुर्वेदीय भस्म पद्धतीने तयार केले जाते. आयुर्वेदानुसार ताम्र धातूचे नेपाल व म्लेंच्छ असे ...
Loading...