(प्रस्तावना) | संपादकीय सहायक : शिल्पा चं. भारस्कर
आयुर्वेद हे भारतीय शास्त्र आहे. त्याची आज जागतिक स्तरावरही दखल घेतली जाते. हे शास्त्र जीवनविषयक आणि आरोग्यविषयक; कफ, वात, पित्त यांसारख्या मूलभूत सिद्धांतांवर आधारित आहे. आयुर्वेदाचा परिचय करून घेण्याकरिता या सिद्धांतांची ओळख होणे आवश्यक असते. याचबरोबर आयुर्वेदाची विशिष्ट अशी ‍चिकित्सा आणि उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये विविध औषधी वनस्पती, प्राणिज पदार्थ, खनिज पदार्थ आणि विविध प्रक्रियांद्वारे निर्माण केलेल्या औषधांचा उपयोग केला जातो. संगणकाचा वापर सुरू झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये प्रकृती परिक्षण, आयुर्वेदीय निदान, आयुर्वेदीय चिकित्सा याविषयांवर सॉफ्टवेअर निर्मितीचे प्रयोग केले. याचबरोबर नाडी परीक्षेसारख्या आयुर्वेदाच्या विशिष्ट परिक्षणासाठी विविध उपकरणांची निर्मिती केली आहे. आयुर्वेदाच्या आधुनिक पद्धतींनी अभ्यास करण्यासाठी Ayurgenomics, Ayurvedic Biology, Traditional Knowledge Digital Library (TKDL) आदी ज्ञानशाखांचा विकास झालेला आहे.

आयुर्वेद ज्ञानमंडळामध्ये आयुर्वेदातील मूलभूत सिद्धांत, चिकित्सा व उपचार पद्धती त्याचबरोबर महत्त्वाचे उपयोजन, आयुर्वेदाच्या अभ्यासाची पारंपरिक आणि आधुनिक पद्धत, महत्त्वाचे ग्रंथ इत्यादींचा परिचय करून दिला जाईल. याचबरोबर आयुर्वेद ही औषध पद्धती बरोबर जीवन पद्धती म्हणूनही विकसित झाल्याने त्यातील अनेक शब्द बोलीभाषेतही वापरले जातात. त्यांचा बोलीभाषेतील अर्थ आणि आयुर्वेदातील शास्त्रीय अर्थ वेगळा असतो. त्याचबरोबर वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक, विविध वाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींमध्ये आयुर्वेदाबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती दिली जाते. या लेखनामध्ये जे शब्द वारंवार वापरले जातात अशा शब्दांचा मूलभूत शास्त्रीय अर्थ देणाऱ्या नोंदींचाही अंतर्भाव या ज्ञानमंडळात केला आहे.

धातु (आयुर्वेद) (Dhatu-Ayurveda)

धातु 

आयुर्वेदानुसार ‘धातु’ या शब्दाचा अर्थ शरीराला धारण करणारे घटक असा होतो. ‘धातु’ शब्दातील ‘धृ-धारयति’ या क्रियापदाचा अर्थ धारण करणे, पोषण ...
नस्य (Nasya)

नस्य

नस्य हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे. आयुर्वेदानुसार गळ्याभोवतालच्या हाडाच्या वरील भागात असलेल्या ...
निद्रा (आयुर्वेद)

निद्रा

निद्रा म्हणजे झोप. वात, पित्त व कफ याप्रमाणेच आहार, निद्रा व ब्रह्मचर्य यांनाही आयुर्वेदात फार महत्त्वाचे स्थान आहे. आहार, निद्रा ...
नेत्रतर्पण ( Netra Tarpana)

नेत्रतर्पण

नेत्र म्हणजे डोळे व तर्पण म्हणजे तृप्ती. डोळ्यांवर बाहेरून करण्याची ही उपचार पद्धती आहे. यामुळे डोळ्यांना व दृष्टीलाही आरोग्य प्राप्त ...
पंचविध कषायकल्पना

ज्यावेळी वनस्पतिज किंवा प्राणिज पदार्थ आहे त्या स्वरूपात शरीरात वापरता येऊ शकत नाही, त्यावेळी तो शरीराकरिता योग्य अशा स्वरूपात परिवर्तित ...
पित्तदोष (Pitta Dosha)

पित्तदोष

शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे पित्त. जर पित्त आवश्यक प्रमाणात शरीरात उपस्थित असेल तर ते शरीरातील विविध व्यापार सुरळीतपणे ...
पुरीष (Purish / Stool)

पुरीष 

पुरीष म्हणजे विष्ठा. शरीरात तयार होणाऱ्या तीन मलांपैकी एक मल म्हणजे पुरीष. खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर त्याचे दोन भाग होतात ...
प्रकृती (दोष प्रकृती) (Prakruti /Doshaprakruti)

प्रकृती

वात, पित्त व कफ यांना आयुर्वेदात त्रिदोष म्हणतात. हे तीन घटक मानवी शरीराच्या अंतर्बाह्य अस्तित्वाला व क्रियांना कारणीभूत असतात. गर्भनिर्मितीच्या ...
प्रज्ञापराध

प्रज्ञापराध हा शब्द प्रज्ञा (बुद्धिमत्ता) + अपराध या शब्दांपासून तयार होतो. एखाद्या गोष्टीबाबत जसे वर्तन अपेक्षित आहे त्याच्या विपरीत वर्तन ...
बस्ति (Vasti / Enema)

बस्ति

बस्ती हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. शरीरात गुदमार्गाने औषध प्रवेशित करण्याच्या क्रियेस बस्ती असे म्हणतात. बस्ती हा ...
भस्म प्रक्रिया

आयुर्वेदामध्ये विविध धातू, उपधातू, प्राण्यांची शिंगे, समुद्रातील कवचवर्गीय पदार्थ इत्यादींना औषध म्हणून वापरताना त्यांची भस्म करून वापरायला सांगितली आहेत. सोने, ...
भस्मे, आयुर्वेदीय

निसर्गातील खनिजे, प्राणिज, वनस्पतिज इत्यादी पदार्थांची वेगवेगळ्या प्रक्रियांनी केलेली एक प्रकारची सेंद्रिय राख म्हणजे भस्मे होय. उदा., सुवर्ण भस्म, लोह ...
मज्जाधातु (Majja Dhatu)

मज्जाधातु

शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. धातू निर्मितीचा क्रम पाहिल्यास मज्जा हा सहाव्या क्रमांकाचा धातू आहे. मज्जाधातू ...
मांसधातु (Mamsa Dhatu)

मांसधातु

शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी मांस हा तिसऱ्या क्रमांकाचा धातू आहे. रक्ताच्या सार ...
मूत्र

अग्नीच्या म्हणजेच चयापचयाच्या विविध क्रियेने निर्माण होणाऱ्या त्याज्य घटकांचे वहन करून हे त्याज्य घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम मूत्राद्वारे होते. या ...
मेदधातु (Meda Dhatu)

मेदधातु

शरीराला धारण करणाऱ्या सात धातूंपैकी एक धातू. धातुपोषण क्रमात मेद धातू चौथा आहे. आयुर्वेदानुसार एका धातूच्या सार भागापासून पुढच्या धातूची ...
योनिधावन (Vaginal wash )

योनिधावन

औषधी द्रव्यांनी योनीमार्ग, गर्भाशयमुख धुऊन काढणे (प्रक्षालन करणे) म्हणजे योनिधावन होय. हा एक स्थानिक चिकित्सेचा प्रकार असल्यामुळे सर्वदैहिक परिणाम यामध्ये ...
रक्तधातु (Rakta Dhatu)

रक्तधातु

शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी रक्त हा दुसऱ्या क्रमांकाचा धातू आहे. शुध्द रक्ताचा ...
रक्तमोक्षण (Raktamokshana)

रक्तमोक्षण

एखाद्या रोगाच्या उपचारासाठी शरीरातून त्वचेच्या मार्गाने रक्त बाहेर काढणे म्हणजे रक्तमोक्षण होय. वात, पित्त व कफ हे तीन दोष आवश्यक ...
रसधातु (Rasa Dhatu)

रसधातु

आयुर्वेदानुसार शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना धातू असे म्हणतात. एकूण सात धातूंपैकी रस हा प्रथम क्रमांकाचा धातू आहे. येथे रस ...