अकल्पिता वृत्ति
अकल्पिता वृत्तीचे दुसरे नाव महाविदेहा असे आहे. महाविदेहा ही योगशास्त्रात सांगितलेल्या सिद्धींपैकी एक असून योगसूत्रातील विभूतिपादामध्ये हिचे वर्णन आलेले आहे ...
अंतराय
योगमार्गातील विघ्ने. महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (१.३०) योगाभ्यासात विघ्न आणणाऱ्या नऊ अंतरायांची गणना केलेली आहे. या अंतरायांना योगाच्या परिभाषेत चित्तविक्षेप, ...
अंतर्धान
अंतर्धान ही एक सिद्धी असून पातंजल योगसूत्राच्या विभूतिपादात हिचा उल्लेख आहे. पतंजली महर्षींनी ‘कायरूपसंयमात् तद्ग्राह्यशक्तिस्तम्भे चक्षुष्प्रकाशासम्प्रयोगे अंतर्धानम्’ (३.२१) सूत्रात या ...
अतीन्द्रिय
ज्या वस्तूंचे ज्ञान पाच ज्ञानेंद्रियांच्याद्वारे होऊ शकत नाही, त्या वस्तूंना अतीन्द्रिय असे म्हणतात. या विश्वात अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तूंचे स्वरूप ...
अद्वयतारकोपनिषद्
अद्वयतारकोपनिषद् शुक्लयजुर्वेदाशी संबंधित आहे. या उपनिषदामध्ये राजयोगाचे वर्णन आले आहे. या उपनिषदात वर्णन केलेल्या योगाला तारकयोग असे नाव आहे. प्रस्तुत ...
अपरिग्रह
मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी ...
अमृतनादोपनिषद्
अमृतनादोपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाच्या परंपरेतील गौण उपनिषद् आहे. ज्या उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत त्या उपनिषदांना मुख्य उपनिषदे आणि इतर उपनिषदांना ...
अमृतबिन्दु उपनिषद्
अमृतबिन्दु उपनिषद् हे कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद् आहे. ह्या उपनिषदामध्ये मन, ब्रह्म, आत्म्याचे एकत्व, शब्दब्रह्म इत्यादी संकल्पनांचा विचार केला आहे. या ...
अरिष्ट
अरिष्ट म्हणजे मरणसूचक चिन्ह. भारतीय तत्त्वज्ञान व आयुर्वेद शास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू या अपघाताने होणाऱ्या किंवा आकस्मिक होणाऱ्या घटना नसून ...
अष्टवक्रासन
एक आसनप्रकार. अष्टवक्रासन म्हणजेच आठ कोन असणारे किंवा आठ जागेत शरीराला वाकवणारे आसन. हे आसन अष्टवक्र नावाच्या महर्षींना समर्पित आहे ...
असम्प्रज्ञात समाधि
योगदर्शनानुसार ज्या अवस्थेमध्ये चित्ताच्या कोणत्याही वृत्ति नसतात व पुरुषाला (आत्म्याला) कोणत्याही विषयाचे ज्ञान होत नाही, अशी अवस्था म्हणजे असम्प्रज्ञात समाधि ...
अहिंसा
पतंजली मुनींनी अष्टांगयोगामध्ये वर्णिलेल्या पहिल्या अंगातील पाच यमांपैकी अहिंसा हा पहिला यम आहे (पातञ्जल योगसूत्र २.३०).‘हिंसेचा अभाव’ असा या संज्ञेचा ...