विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग तिसरा पांगारा ते लाजाळू (सु. २५१ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
कोणत्याही परिसंस्थेतील प्रत्येक पोषणपातळीवरील जैववस्तुमान किंवा जैववस्तुमानाची उत्पादकता, सजीवांची संख्या, ऊर्जा-विनिमयाची पातळी यांसंबंधीची माहिती ही आलेख स्वरूपात मांडली जाते, तिला ...
पावशा पक्ष्याचा समावेश क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी पक्षिकुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव हायरोकॉक्सिक्स व्हेरिअस आहे. तो आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, ...
पिसे ही पक्ष्यांच्या बाह्यत्वचेवरील वाढ असून त्यांचे शरीरावर वैशिष्ट्यपूर्ण आवरण असते. पिसांमुळे पक्ष्यांचे शरीर झाकले जाते आणि शरीराला विशिष्ट आकार ...
प्राचीन काळातील म्हणजे होलोसीन कालखंडाच्या सुरुवातीपर्यंत (सु. ११,७०० वर्षांपूर्वी) अस्तित्वात असलेले प्राणी, वनस्पती आणि अन्य सजीवांचा अभ्यास ज्या शाखेत केला ...
पुष्पविन्यास म्हणजे फुलांची अक्षावरील मांडणी. काही वनस्पतींमध्ये फुले एकेकटी येतात; उदा., गुलाब, जास्वंद. अनेक वनस्पतींमध्ये फुले एकत्र किंवा समूहाने येतात; ...