विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयागरात सदोदित भ्र टाकत आहे. परंतु गरुडझेपाने उंचावणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी-कधी धोक्याचे ठरत आहे. पर्यावरणातील जागतिक तापन, हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, जैविक संरक्षण व संवर्धन इ.च्या अनुषंगाने शाश्वत विकास व अजेंडा २१ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्वाारच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा भाग तिसरा पांगारा ते लाजाळू (सु. २५१ नोंदी) हा ज्ञान-ऐवज कुमारांसाठी मराठी विश्वकोश घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मीत करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना होणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह, ध्वनिमुद्रित स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
पृष्ठवंश असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशी म्हणतात. पृष्ठवंश मणक्यांनी बनलेला असून पाठीच्या बाजूला असतो. म्हणून त्याला पाठीचा कणा असेही म्हणतात. प्राणिसृष्टीच्या रज्जुमान ...
पिलासह एंपरर पेंग्विन (ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी) अंटार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते ...
इंग्रजी भाषेत पॅरट, लोरिकीट आणि पॅराकीट अशी सामान्य नावे असलेल्या पक्ष्यांना मराठी भाषेत ‘पोपट’ म्हणतात. पक्षिवर्गाच्या सिटॅसिफॉर्मिस गणात (शुक गण) ...
मुलामुलींचे बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण कालावधीला सामान्यपणे पौगंडावस्था म्हणतात. किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या ...
एक जैवरासायनिक प्रक्रिया. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत वनस्पती आणि अन्य काही सजीव प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात. ही रासायनिक ऊर्जा कर्बोदकांच्या ...
शरीरावरील रोग तसेच अन्य घातक आक्रमणे यांच्यापासून शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशी, ऊती आणि रेणू यांच्या समूहाला ‘प्रतिक्षम संस्था’ किंवा ‘रोगप्रतिकारशक्ती’ ...
प्रतिजैविके ही जिवंत जीवाणूंपासून तयार झालेली किंवा मानवनिर्मित रासायनिक संयुगे असतात. ती जीवाणूंचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात ...
प्रथिने ही संज्ञा व्यावहारिक भाषेत अन्नातील एक मुख्य घटक दाखविण्यासाठी वापरली जाते. कर्बोदके, मेद, जीवनसत्त्वे, खनिजे यांप्रमाणे प्रथिने सजीवांच्या अन्नाचा ...
हवा प्रदूषण (दिल्ली) सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मृदा ...