(प्रस्तावना) पालकसंस्था : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक | समन्वयक : कविता साळुंके | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
शिक्षणशास्त्र या विषयाचा संबंध अनेक विषयांशी प्रत्यक्षात अथवा अप्रत्यक्षात आहे. त्यामुळे अधिकाधिक घटकांना स्पर्श करण्याचा शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकाला तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या दोन्ही विषयांची ओळख असणे आवश्यक असते. त्या आधारावरच शिक्षणातील प्रमुख घटक अध्ययन-अध्यापन आणि अभ्यासक्रम यांचा मागोवा घेता येतो आणि त्या दृष्टिकोनातून विविध अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा लागतो. भारतातील शिक्षण पद्धतींचा विचार करताना गुरुकुल पद्धतीपासून आधुनिक शिक्षण पद्धतींपर्यंतच्या स्थित्यंतरांचा मागोवा अपरिहार्य ठरतो.

आधुनिक शिक्षणात मानव्यविद्या शाखेतील विशेषत: सामाजिक विज्ञानांबरोबरच तंत्रविद्या व विज्ञान शाखेतील विषयांच्या अभ्यासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षणशास्त्रात संगणकासारखा विषय यापुढे अग्रक्रमाने अभ्यासाचा विषय असेल ! त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शिक्षणाला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. साहजिकच आज शिक्षणाकडे पाहावयाच्या मूलगामी दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामध्ये शिक्षणाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम, सार्वत्रिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, सामाजिक शिक्षण, दुर्बल घटकांचे शिक्षण, प्रज्ञावान व गतिमंद शिक्षण, निरंतर शिक्षण, तंत्रशिक्षण व विज्ञान इत्यादी क्षेत्रांत नवीन शैक्षणिक विचारांची कालमानानुसार भर पडली आहे. तसेच भारतीय शिक्षणपद्धतीवर भारतीय विचारवंतांच्या प्रभावाबरोबरच पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव असल्यामुळे भारतीय शिक्षणपद्धतीत प्रयोगशीलता प्रविष्ट झाली आहे. विज्ञाननिष्ठ व संशोधनात्मक शिक्षणपद्धतीला आपातत: महत्त्व प्राप्त झाले आहे. तत्त्वज्ञानाचे विविध प्रणाली/विचारधारा आहेत. या विविध पंथात शिक्षणतज्ज्ञांनी वैचारिक भर टाकलेली आहे. प्रत्येक विचारवंतांच्या विचारावर तत्कालीन व आधुनिक कालखंडातील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा प्रभाव असतो. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांच्या विचारांना विशिष्ट प्रणालीत समाविष्ट करतांना फार सावधगिरी बाळगावी लागते. अन्यथा त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज परिवर्तनात शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षणशास्त्रात संरक्षण, संक्रमण आणि संवर्धन यांचा साकल्याने विचार केला जातो. एवढेच नव्हे, तर शिक्षणशास्त्र विषयामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन ते देशाचे सुजाण नगरिक बनतात. त्यासाठी शिक्षण देणाऱ्या विविध संशोधनात्मक व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे स्थापन झाली आहेत. त्यांतून विविध विषयांचे मार्गदर्शन, अध्यापन व संशोधन करण्यात येते.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आणि महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून विषयात संदर्भांकित माहितीचे संकलन करून योग्य अशी माहिती समाजापर्यंत पोहचविणे, हे शिक्षणशास्त्र ज्ञानमंडळाचे उद्दिष्ट आहे.

विशेष शिक्षण (Special Education)

विशेष शिक्षण

शारीरिक, मानसिक, दुर्बलता इत्यादीने ग्रस्त असणाऱ्या आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचार करून त्यांना त्यांच्या क्षमतेनुरूप दिली जाणारी शिक्षणाची एक ...
विष्णु गोविंद विजापूरकर (Vishnu Govind Vijapurkar)

विष्णु गोविंद विजापूरकर

विष्णु गोविंद विजापूरकर : (२६ ऑगस्ट १८६३−१ ऑगस्ट १९२६). धर्मसुधारक, थोर विचारवंत व राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे ...
वुडचा अहवाल (Wood’s Report)

वुडचा अहवाल

भारतातील शिक्षणासंबंधीचा एक अहवाल. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी भारतात राज्य स्थापन केले. ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील शैक्षणिक कार्याबाबत घेतलेली दखल या ...
वेल्थी हॉनसिंगेर फिशर (Welthy Honsinger Fisher)

वेल्थी हॉनसिंगेर फिशर

फिशर, वेल्थी हॉनसिंगेर : (१८ सप्टेंबर १८७९–१६ डिसेंबर १९८०). भारतात प्रौढ साक्षरताप्रसाराचे कार्य करणाऱ्या अमेरिकन कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि रामॉन मागसायसाय ...
व्यावसायिक विकास (Professional Development)

व्यावसायिक विकास

व्यावसायिक विकास म्हणजे व्यक्तीने आपली जीवन कारकीर्द सतत उंचावत ठेवण्यासाठी सतत घेत असलेले शिक्षण व प्रशिक्षण होय. भारताचा सांस्कृतिक वारसा ...
शारीरिक क्षमता (Physical Fitness-Physical Ability)

शारीरिक क्षमता

एखाद्या व्यक्तीकडून एखादे शारीरिक कार्य पार पाडताना ते कार्य त्याच्याकडू होणार की, नाही हे त्याच्या शारीरिक क्षमतेवरून सिद्ध होत असते ...
शारीरिक शिक्षण (Physical Education)

शारीरिक शिक्षण

मानवाचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठीच्या शिक्षण प्रक्रियेस शारीरिक शिक्षण म्हणतात. या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त योग, प्राणायाम, व्यायाम, विविध खेळ आणि ...
शालेय शिक्षण सुधार समिती, १९८४ (School Education Reform Committee, 1984)

शालेय शिक्षण सुधार समिती, १९८४

पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक धोरणांस मजबुती आणण्याच्या दृष्टीने स्थापण्यात आलेली एक समिती. वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू ...
शाश्वत विकासासाठी शिक्षण (Education for Sustainable Development)

शाश्वत विकासासाठी शिक्षण

संयुक्त राष्ट्र संघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेची शैक्षणिक विकासार्थ एक महत्त्वपूर्ण योजना. मानव होण्यासाठी अध्ययनाची आवश्यकता असून शिक्षणाचा मुख्य ...
शिक्षक शिक्षण (Teacher Education)

शिक्षक शिक्षण

शिक्षक शिक्षण ही तुलनेने अलीकडील कल्पना असली, तरी शिक्षक व्यवसाय हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पूर्वीच्या काळी अध्यापन व्यवसायात ...
शिक्षक संघटना (Teacher’s Union)

शिक्षक संघटना

प्राचीन भारतीय संस्कृतीत गुरुला समाजामध्ये, राजदरबारी इत्यादी स्तरांवर मानाचे स्थान होते. त्यांना राजाश्रय व समाजसाहाय्य होते. स्वतंत्र गुरुकुलात किंवा आश्रमात ...
शिक्षण (Education)

शिक्षण

शिक्षणाचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. सुरुवातीच्या काळात कुटुंब हे शिक्षणाचे केंद्र व आईवडील, विशेषत: आई, हे बालकाचे गुरू होते. पुढे ...
शिक्षण व्यवस्थापन प्रणाली (Learning Management System)

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली

आंतरजालाचा वापर करून आभासी अभ्यासक्रम निर्माण करण्याची आणि त्याचे प्रसारण व्यवस्थापन करणारी एक संगणक प्रणाली म्हणजे शिक्षण व्यवस्थापन प्रणाली होय ...
शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act)

शिक्षण हक्क कायदा

६ ते १४ वयोगटातील बालकांचा प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा समावेश असलेला आणि त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे ...
शिक्षणातील अर्थशास्त्र (Economics in Education)

शिक्षणातील अर्थशास्त्र

शिक्षण प्रक्रियेमध्ये आर्थिक तत्त्वे, संकल्पना, नियम, सिद्धांत, वित्तपुरवठा, विविध शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी शिक्षणासंबंधी आर्थिक मुद्द्यांचा अभ्यास आणि उपयोजन करणे म्हणजे ...
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University, Kolhapur)

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत राजाराम छत्रपती, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण आणि डॉ. सी. आर. तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाची कल्पना ...
शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ काश्मीर (Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology of Kashmir)

शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ काश्मीर

जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानमंडळातील ऑगस्ट १९८२ च्या आधिनियमानुसार १९८२ मध्ये या विद्यापीठाची स्थापना ...
शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ जम्मू (Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology of Jammu)

शेर-ए-काश्मीर कृषिविज्ञान व तंत्रविद्या विद्यापीठ जम्मू

जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. काश्मीर विभागाच्या तुलनेत जम्मू विभागातील पशुधन, कृषिप्रकार, पिकांचे स्वरूप इत्यादींमध्ये तफावत असून तेथील समस्यांचे ...
शैक्षणिक नैदानिक चाचणी (Educational Diagnostic test)

शैक्षणिक नैदानिक चाचणी

सर्वसामान्यपणे शिक्षकाने एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा ...
शैक्षणिक परिपाठ (Academic Routine)

शैक्षणिक परिपाठ

प्राथमिक शिक्षण हे बालकांच्या भविष्याचा पाया आहे. प्राथमिक शिक्षण व मूल्य शिक्षण यांमुळे बालकांवर प्रत्यक्षपणे चांगले संस्कार घडत असतात. त्यामुळे ...