(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

ऐहिकवाद आणि चर्च (Secularism and The Church)

ऐहिकवाद आणि चर्च

भारताला राष्ट्र म्हणून टिकून राहायचे असेल, तर धर्मनिरपेक्षतेविना पर्याय नाही. धार्मिक परंपरांची विविधता हे भारतीय समाजांचे एक ठळक वैशिष्ट्य आहे ...
ऑगस्टीनियन (Augustinian)

ऑगस्टीनियन

एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. यास ऑगस्टीनवाद असेही म्हटले जाते. मूळचा निधर्मी असलेला संत ऑगस्टीन (इ.स. ३५४–४३०) हा झाला ख्रिस्ती धर्मीयांचा ...
ऑर्गनन (Organon)

ऑर्गनन

विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलने तर्कशास्त्रावर लिहिलेल्या ग्रंथांचा संग्रह. ॲरिस्टॉटलने अनुभववादाचा (Empiricism) पाया घातला. तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करताना त्याने तर्कशास्त्राचा पाया ...
ओरायन (Orion)

ओरायन

ग्रीक मिथकांनुसार ओरायन हा एक अत्यंत भव्य शिकारी देवता होता. ओरायनविषयी अनेक मिथककथा आहेत. त्यांपैकी त्याच्या जन्माविषयीच्या दोन आणि मृत्यूविषयीच्या ...
ओसायरिस (Osiris)

ओसायरिस

प्राचीन ईजिप्तमधील सर्वश्रेष्ठ देव. तो असर, असीर, ओसीर किंवा उसीर (अर्थबलशाली) ह्या नावांनी ओळखला जात असे. ईजिप्शियन देवता : ओसायरिस ...
कलाम (Kalam)

कलाम

ह्या अरबी शब्दाचा मूळ अर्थ अनेक शब्दयुक्त उद्‌गार. तसेच ‘बोलणे’, ‘शब्द’ असाही ह्याचा अर्थ होतो आणि ह्या अर्थापासून कलामला कुराणावर–ईश्वरी ...
कल्याणवाद (Eudaemonism)

कल्याणवाद

आयुष्यात आपण कशाच्या तरी पाठीमागे असतो, काहीतरी शोधीत असतो. ते मिळाल्याने जीवन कृतार्थ होईल, अशी आपली धारणा असते. जीवनाच्या या ...
का / बा (Ka and Ba)

का / बा

बा प्राचीन ईजिप्शियन मानवी शरीराचे पाच भाग मानत असत. भौतिक शरीर, नाव, सावली, ‘का’ आणि ‘बा’. ‘बा’ म्हणजे माणसाचा आपल्या ...
काबा (Kaaba)

काबा

इस्लाम धर्मीयांचे पवित्र उपासनागृह. मक्केच्या सर्वश्रेष्ठ मशिदीच्या मध्यभागी असलेली, भुरकट दगडी व संगमरवरात बांधलेली, १२⋅२० मी. लांब, १०⋅६५ मी. रुंद ...
काल (Time)

काल

आपल्याला घटनांचा अनुभव येतो, तेव्हा कित्येक घटना इतर काही घटनांच्या पूर्वी किंवा नंतर घडलेल्या असतात, असाही अनुभव येतो. उदा., एखादी ...
कॅथलिक धर्मपीठाचा श्रेणीबंध (Hierarchy of the Catholic Church)

कॅथलिक धर्मपीठाचा श्रेणीबंध

प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेले चर्च २००० वर्षांपेक्षा अधिक वर्षे अस्तित्वात असून जगभरातील एक अब्जाहून अधिक लोक कॅथलिक ख्रिस्ती ...
कॅथलिक परंपरेतील संतपद (Saints in the Catholic Tradition)

कॅथलिक परंपरेतील संतपद

परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा व येशू ख्रिस्त यांची माता पवित्र मरिया यांच्याबरोबरच ख्रिस्ती भक्तजन अनेक संतांचाही सन्मान ...
कॅनन लॉ (Canon Law)

कॅनन लॉ

ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या कार्याची दिशा, ख्रिस्ती धर्मगुरूंचे आचार, विचार व वर्तन, तसेच त्यांचे परस्परांतील व बाहेरील जगाबरोबर येणारे संबंध यांचे दिग्दर्शन ...
क्यूपिड (Cupid)

क्यूपिड

एक रोमन देव. त्याला प्रेमाची देवता मानली जाते. एरॉस या ग्रीक देवतेच्या समकक्ष त्याला समजले जाते. तो युद्धाचा देव एरिस ...
क्वेत्झलकोएत्ल (Quetzalcoatl)

क्वेत्झलकोएत्ल

मेक्सिको खोर्‍यातील ॲझटेक संस्कृतीतील एक प्रमुख देवता व पौरोहित्य राजा. केत्सालकोआत्ल असाही त्याचा उच्चार होतो. त्याच्यासंबंधी पुरातनकालीन मिथ्यकथा, आख्यायिका, दंतकथा ...
ख्नूम (Khnum)

ख्नूम

ईजिप्तमधील सर्वांत प्राचीन देवतांपैकी एक. नाईल नदीचा रक्षकदेवता. त्याचा काळ साधारणतः इ.स.पू. २९२५‒२७७५ असा सांगितला जातो. त्याला नाईल नदीचा स्रोत; ...
ख्रिस्तमंदिराची रचना (Design of Church)

ख्रिस्तमंदिराची रचना

ख्रिस्ती लोकांचे उपासनामंदिर ‘चर्च’ म्हणून ओळखले जाते. चर्च हे ख्रिस्ती ऐक्याचे प्रतिक आहे. चर्चच्या समोरील भागाला ‘Facade’ असे म्हणतात. १) ...
ख्रिस्ती धर्म, भारतातील (Christanity in India)

ख्रिस्ती धर्म, भारतातील

‘जगाच्या अंतापर्यंत जा आणि संपूर्ण सृष्टीला माझा संदेश द्या’ (बायबल, मार्क १६:१५) येशू ख्रिस्ताने दिलेली ही आज्ञा त्याच्या बारा प्रेषितांनी ...
ख्रिस्ती धर्मपंथ (Christian Cult)

ख्रिस्ती धर्मपंथ

येशू ख्रिस्त यांच्या व्यक्तिमत्त्वात व शिकवणीत ख्रिस्ती धर्म केंद्रित झाला आहे. ख्रिस्ती धर्मातील पंथोपपंथांचे पुढीलप्रमाणे तीन मुख्य विभाग आहेत : ...
ख्रिस्ती मिशनरींचे भारतातील योगदान (Contribution of Christian Missionaries to India)

ख्रिस्ती मिशनरींचे भारतातील योगदान

मिशनरी हा शब्द ‘मित्तेरे’ (Mittere) म्हणजे पाठविणे या लॅटिन धातूपासून आलेला आहे. विशिष्ट कार्यासाठी पाठविलेली व्यक्ती म्हणजे मिशनरी होय. न्याय, ...