(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

जॉन आणि चार्ल्स वेस्ली (John and Charles Wesley)

जॉन आणि चार्ल्स वेस्ली

वेस्ली बंधू : वेस्ली, जॉन (१७ जून १७०३‒२ मार्च १७९१), वेस्ली, चार्ल्स (१८ डिसेंबर १७०७‒२९ मार्च १७८८) : हे दोघे ...
जॉन कॅल्व्हिन (John Calvin)

जॉन कॅल्व्हिन

कॅल्व्हिन, जॉन : ( १० जुलै १५०९—२७ मे १५६४ ). मार्टिन ल्यूथरप्रणीत विचारसरणीचे फ्रेंच धर्मशास्त्रवेत्ते व धर्मसुधारक. त्यांचा धर्मविचार ‘कॅल्व्हिनवाद’ ...
जोसेफ बटलर (Bishop Joseph Butler)

जोसेफ बटलर

बटलर, जोसेफ : (१८ मे १६९२—१६ जून १७५२). अठराव्या शतकातील प्रसिद्ध आणि प्रभावी ब्रिटिश नीतिमीमांसक व ख्रिस्ती धर्मविद्यावेत्ते. जन्म वाँटिज, बार्कशर ...
जोसेफ बॅप्टिस्टा (Joseph Baptista)

जोसेफ बॅप्टिस्टा

बॅप्टिस्टा, बॅरिस्टर जोसेफ ऊर्फ काका : (१७ मार्च १८६४—१८ सप्टेंबर १९३०). भारतीय राजनीतिज्ञ व भारतातील होमरूल लीग चळवळीचे नेते. काका ...
जोहॅनीझ स्कॉटस एरियूजेना (Johannes Scotus Eriugena)

जोहॅनीझ स्कॉटस एरियूजेना

एरियूजेना, जोहॅनीझ स्कॉटस : (सु. ८१०—८७७?). आयरिश तत्त्ववेत्ता, ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ता, नव-प्लेटोवादी, भाषाकोविद आणि कवी. जोहनीझ स्कोटस किंवा जॉन स्कॉटस एरिजेना ...
ज्ञानोदय (Enlightenment)

ज्ञानोदय

सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये यूरोपमध्ये घडून आलेली बौद्धिक चळवळ ज्ञानोदय ह्या नावाने ओळखली जाते. ह्या काळात ईश्‍वर, विवेक (Reason), निसर्ग ...
झरथुष्ट्र (Zarathushtra)

झरथुष्ट्र

झोरोॲस्टर (ग्रीक उच्चार) : पारशी (जरथुश्त्री) धर्माचा संस्थापक. झरथुष्ट्राच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. तथापि अवेस्ता या धर्मग्रंथाच्या आधुनिक संशोधनावरून ...
झ्यूस (Zues)

झ्यूस

झ्यूसला ग्रीक देवतांपैकी सर्वाधिक महत्त्वाचा देव मानला जातो. रोमन दैवतशास्त्रामध्ये त्याचे नाव ज्यूपिटर झालेले दिसते. वैदिक देवतांपैकी द्यावा-पृथिवी या देवतायुग्मातील, ...
डायना (Diana)

डायना

रोमन देवतासमूहातील एक ख्यातकीर्त स्त्रीदेवता. मूळात ती एक वनदेवता मानली जाई. ती चंद्र आणि मृगया यांची देवता असून ग्रीक देवता ...
डी ॲनिमा (De Anima)

डी ॲनिमा

विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ. मूळ ग्रीक ग्रंथाचे हे लॅटिन नाव असून यामध्ये त्याने सजीव-सृष्टीच्या गुणांबद्दलचे ...
डीमीटर (Demeter)

डीमीटर

ग्रीक दैवतशास्त्रातील सुप्रसिद्ध मातृदेवता. रोमन आणि इटालियन पुराकथेतिहासामध्ये डीमीटर ही ‘सेरेस’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ईजिप्शियन पुराकथेतिहासामध्ये प्रख्यात असलेल्या इसिसनामक ...
डीमॉक्रिटस (Democritus)

डीमॉक्रिटस

डीमॉक्रिटस : (इ.स.पू. ४६०—इ.स.पू. ३७०). प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि ग्रीक अणुवादाचा संस्थापक व प्रवर्तक. त्याने आपल्या काळात मांडलेले सिद्धांत हे ...
डेसिडेरिअस इरॅस्मस (Desiderius Erasmus)

डेसिडेरिअस इरॅस्मस

इरॅस्मस, डेसिडेरिअस : ( २८ ऑक्टोबर १४६६—१२ जुलै १५३६ ). प्रबोधनकाळातील एक डच विद्वान व कॅथलिक धर्मसुधारक. त्यांचा जन्म रॉटरडॅम ...
डॉमिनिकन (Dominican)

डॉमिनिकन

एक ख्रिस्ती धार्मिक संघ. इ.स. १२१६ या वर्षी डॉमनिक नावाच्या एका धार्मिक माणसाने देवाच्या सेवेसाठी एक नवीन संघ स्थापन केला ...
ड्रुइड (Druid)

ड्रुइड

एक प्राचीन ड्रुइड गॉल (सध्याचा फ्रान्स), ब्रिटन आणि आयर्लंड यांमधील प्राचीन केल्ट लोकांच्या धर्मगुरूंना वा पुरोहित वर्गाला अनुलक्षून ‘ड्रुइड’ ही ...
तामुझ (Tammuz)

तामुझ

तामुझ हा मेसोपोटेमियन देव असून तो सुमेरियन दुम्यूझी (Dumuzi) म्हणून ओळखला जातो. हा प्रजननाचा देव मानला गेला आहे. त्याचप्रमाणे वसंत ...
तूरिनचे प्रेतवस्त्र (Shroud of Turin)

तूरिनचे प्रेतवस्त्र

उत्तर इटलीतील तूरिन येथे १६६८ ते १६९४ या काळात गुआरीनो गुआरिनी या वास्तुतज्ज्ञाने सेंट जॉन द बॅप्टिस्ट हे चर्च उभारले ...
तेझ्कात्लिपोका (Tezcatlipoca)

तेझ्कात्लिपोका

ही ॲझटेक संस्कृतीतील एक प्रमुख देवता आहे. तेझ्कात्लिपोका ह्या नावाचा अर्थ धूर सोडणारा किंवा चमकणारा आरसा असा होतो. त्यास सूर्याची ...
त्लालोक (Tlaloc)

त्लालोक

त्लालोक ही मेक्सिकोमधील अ‍ॅझटेक व तोल्तेक ह्या संस्कृतींची एक प्रमुख आणि प्राचीन देवता आहे. हा ओमेतेकुह्त्ली व ओमेतिकुहात्ल या विश्वनिर्मात्या ...
थेलीझ (Thales)

थेलीझ

थेलीझ, मायलीटसचा : (इ.स.पू. सातवे-सहावे शतक). ग्रीक तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणिती व ग्रीसमधील सात विद्वानांपैकी एक. त्याला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक ...