(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : आनंद गेडाम
मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.

भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.

सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.

थॉमस अक्वायनस (Thomas Aquinas)

थॉमस अक्वायनस

अक्वायनस, सेंट थॉमस : (१२२४/२५—७ मार्च १२७४). मध्ययुगीन कालखंडातील एक धर्मशास्त्रज्ञ आणि राजकीय तत्त्ववेत्ता. त्याने स्थापन केलेला तात्त्विक प्रवाह ‘थॉमिझम’ ...
थोथ (Thoth)

थोथ

एक महत्त्वाचा प्राचीन ईजिप्शियन देव. तो सत्य, सचोटी, प्रामाणिकपणा, बुद्धी आणि लिखाणाचा देव म्हणून ओळखला जातो. थोथ (टोट) आणि माआट ...
थोथचे पुस्तक (The Book of Thoth)

थोथचे पुस्तक

ईजिप्शियन चंद्रदेव थोथ हा विज्ञान, कला आणि इतिहास इत्यादींची नोंद ठेवणारा देवांचा लेखनिक होता. त्याने लिहिलेल्या ग्रंथाला थोथचे पुस्तक  म्हणतात. ईजिप्शियन ...
देवदूत (Angel)

देवदूत

देवदूताची कल्पना हिंदू, यहुदी (ज्यू), ख्रिस्ती, इस्लाम, पारशी (झोरोस्ट्रिअन) इत्यादी प्रमुख धर्मांत आढळते. मात्र या नोंदीत ख्रिस्ती धर्माच्या अनुषंगानेच ‘देवदूत’ ...
धर्मन्यायालय (Inquisition)

धर्मन्यायालय

ख्रिस्ती धर्मातील न्यायमंडळाचे नाव. चर्चचा पाया हा जरी येशूच्या मूळ शिकवणुकीवर आधारित असला व तो तसा राहावा, अशी येशूची इच्छा ...
नट (Nut)

नट

प्राचीन ईजिप्शियन आकाशदेवता. प्रारंभी नाईल नदीच्या खोऱ्यातील भटक्या जमातीतील लोकांकडून हिचे पूजन केले गेले. ईजिप्तच्या निम्न प्रदेशातील रहिवासी आकाशगंगेला नटचे ...
नमाज (Namaz)

नमाज

नमाज म्हणजे इस्लामची उपासनापद्धती. कुणी याला ‘नमाज’ म्हणतात, तर कुणी ‘सलात’ म्हणतात. कारण दोन्ही शब्द समानार्थी आहेत. फरक इतकाच आहे ...
नाईकी (Nike)

नाईकी

ग्रीक पुराकथेतिहासामध्ये नाईकी ही विजयाची देवता म्हणून प्रचलित आहे. टायटन पॅलेस आणि सरिद्देवता स्टिक्स यांच्या पाच अपत्यांपैकी एक होय. ही ...
नागार्जुन (Nagarjuna)

नागार्जुन

नागार्जुन : (दुसरे शतक). एक श्रेष्ठ बौद्ध आचार्य, माध्यमिक संप्रदायाचा प्रवर्तक व तत्त्ववेत्ता. सातवाहन राजा यज्ञश्री गौतमीपुत्र (कार.१६६–९६) हा नागार्जुनाचा ...
नाताळ (Christmas)

नाताळ

नाताळ किंवा ख्रिस्मस हा ख्रिस्ती धर्मीयांचा आनंदाचा आणि उल्हासाचा सण. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून तो जगभर २५ डिसेंबर ...
निरोप्या (Niropya)

निरोप्या

एक ख्रिस्तीधर्मीय मराठी मासिक. स्वातंत्र्यपूर्वकाळात, ब्रिटिश सत्तेच्या राजवटीत, प्रामुख्याने दैनिके, साप्ताहिके, मासिके व तत्सम नियतकालिके मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून ...
नीथ (Neith)

नीथ

प्राचीन ईजिप्शियन स्त्रीदेवता. ती मस्तकावर दक्षिण ईजिप्तचा लाल मुकुट धारण केलेली, हातात ढाल आणि बाण घेतलेली एक स्त्रीदेवता असून तिला ...
नेफ्थिस (Nephthys)

नेफ्थिस

नेफ्थिस ही प्राचीन ईजिप्शियन मृत्यूदेवता असून ती गेब आणि नट देवतांची मुलगी, अभद्र आणि दुष्टतेची देवता मानल्या जाणाऱ्या सेत(थ)ची पत्नी, ...
नेवार बौध्द धर्म (Newar Buddhism)

नेवार बौध्द धर्म

वज्रयान पंथाची एक शाखा. नेपाळच्या काठमांडू खोऱ्यात प्राचीन काळापासून (इ.स.पू.सु. सहावे शतक) राहणाऱ्या इंडो-मंगोलियन वंशाच्या लोकांना ‘नेवार’ असे म्हणतात. नेवार ...
न्यायनिवाड्याचा दिवस (Judgment Day)

न्यायनिवाड्याचा दिवस

ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम व पारशी या धर्मांतील ही एक संकल्पना. मात्र या ठिकाणी ज्यू व ख्रिस्ती धर्मांच्याच अनुषंगाने ऊहापोह केले ...
पदार्थप्रकार (Categories)

पदार्थप्रकार

पदार्थप्रकाराविषयीच्या उपपत्तीचा स्पष्ट प्रारंभ ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४‒३२२) याच्या तत्त्वज्ञानात आढळतो. आपण वेगवेगळे शब्द किंवा शब्दप्रयोग एकत्र जोडून विधाने बनवितो. अशा ...
पपया (Papaya)

पपया

हटीअन मूळ असणारी एक हिटाइट देवता. ही देवता नेहमी इस्तुस्तया या देवतेसोबत कायम गणली जाते. ह्या दोन्ही देवता हिटाइट मिथकांमध्ये ...
परिवर्तन (Change)

परिवर्तन

एक तात्त्विक संकल्पना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रारंभापासून विश्वाच्या दोन वैशिष्ट्यांना तात्त्विक विचारात मध्यवर्ती स्थान लाभले आहे. वस्तूंमध्ये होणारे परिवर्तन किंवा बदल ...
पर्सेफोनी (Persephone)

पर्सेफोनी

एक ग्रीक देवता. ही झ्यूस आणि डीमीटर यांची अतिशय सुंदर आणि एकुलती एक मुलगी असून हेडीसनामक पाताळातील देवाची ती पत्नी ...
पवित्र त्रैक्य (Trinity)

पवित्र त्रैक्य

ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा धर्मसिद्धांत. हा धर्मसिद्धांत परमेश्वराचे त्रिविध स्वरूप समजावून सांगतो. पित्याच्या स्वरूपातील देव, पुत्राच्या स्वरूपातील देव आणि पवित्र ...