विसावे शतक विज्ञानाचे असले, तरी एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा स्पर्श जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाला झाला आहे. पृथ्वीवरील चराचर सृष्टीला व्यापणारी आपली पंचसृष्टी जीवसृष्टीच्या किमयेत सदोदित भर टाकत आहे. परंतु प्रचंड वेगाने पुढे जाणारे विज्ञान-तंत्रज्ञान हे जेवढे मानवी प्रगतीच्या दृष्टीने हिताचे, तेवढेच पर्यावरणीय दृष्टीने कधी कधी धोक्याचे ठरत आहे. हवामान बदल, पर्यावरणातील जागतिक तापन, जैविक संरक्षण व संवर्धन, कचरा व्यवस्थापन इत्यादींच्या अनुषंगाने शाश्वत विकास व ‘अजेंडा-२१’ या बाबी समाजात प्रकर्षाने महत्त्वाच्या ठरत आहेत. या सर्व बाबी अंतर्भूत करणारा ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या खंडाचा १९५ नोंदींचा चौथा भाग (लिंबू ते ज्ञानेंद्रिये) आता मराठी विश्वकोश कुमारांसाठी घेऊन येत आहे.
जीवसृष्टी आणि पर्यावरणातील विस्मित करणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा आकलनापर्यंतचा अद्भूत व रोमांचकारी प्रवास कुमार विश्वकोशाच्या स्वरूपात कुमारांना घडणार आहे. कुमार विश्वकोशाचा हा ज्ञान-ऐवज कुमारांच्या पिढीला ज्ञानसमृद्ध करायला आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यास मदत करणारा आहे. यातील नोंदी कुमारांसाठी सोप्या, सुटसुटीत, रंगीत चित्रांसह विश्वसनीय आणि रोचक स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
(प्लांट). जीवसृष्टीतील हरितद्रव्ययुक्त आणि बहुपेशीय सजीवांचा समूह. वनस्पती स्वयंपोषी असून त्या स्वत:चे अन्न स्वत: निर्माण करतात. त्यांच्या पेशी दृश्यकेंद्रकी असून ...
(बोटॅनिकल गार्डन). वैज्ञानिक संशोधन आणि सर्वसामान्यांसाठी बहुविध वनस्पतींची लागवड, त्यांचा संग्रह तसेच नाव वर्णनासहित प्रदर्शन ज्या उद्यानांमध्ये केलेले असते, त्याला ...
(मुव्हमेंट ऑफ प्लांट्स). सजीव आणि निर्जिव यांच्यातील मुख्य फरक म्हणजे हालचाल. वनस्पती सजीव असल्यामुळे त्यांच्यामध्येही हालचाल दिसून येते. सजीवांच्या पेशीतील ...
(प्लांट कम्युनिकेशन). सामान्यपणे वनस्पतींना प्राण्यांप्रमाणे बुद्धिमान समजले जात नाही. कारण वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे स्पर्श, दृष्टी, श्रवण इ. क्षमतांसाठी कोणतेही इंद्रिय नसते, ...
(ॲनेलिडा). अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघातील प्राण्यांचे शरीर अनेक वलयांनी म्हणजेच खंडांनी बनलेले असते. शरीर लांबट असून त्यांच्या शरीरावरील ...
वाम (म्युरिनीसॉक्स सिनेरिअस) (ईल). सापासारखा दिसणारा एक मासा. वाम माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरिनीसॉसिडी कुलात केला जातो. या ...
(एजिंग). सजीवांमध्ये वाढत्या वयानुसार शरीरक्रियात्मक बदलांमुळे जीर्णता उद्भवते म्हणजे सजीवांमधील जैविक प्रक्रियांचा वेग कमी होऊ लागतो आणि चयापचय क्रियांवर येणारे ...
(डेझर्ट इकोसिस्टिम). वाळवंटी परिसंस्था ही पृथ्वीवरील एक प्रमुख परिसंस्था आहे. ती मोठ्या शुष्क क्षेत्रात पसरलेली आहे. वाळवंटी परिसंस्थेतील वनस्पती व ...